विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने कदापी खचणार नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- २५ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची आपल्याला सवय जडलेली असून विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने आपण कदापी खचणार नाही. मी जीवनात नेहमी संघर्ष केलेला आहे. म्हणून सामान्य जनता व कार्यकर्ते यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथे सन २०१९-२० मधील मंजूर … Read more

फूट टाळण्याचा आमदार मोनिका राजळेंचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार मोनिका राजळे यांचा निर्णय अंतिम असला, तरी सत्ताधारी आघाडीत फूट पडू नये म्हणून त्यांचेही कौशल्य पणाला लागणार आहे. नगरपालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून एकूण १७ पैकी १२ नगरसेवक सत्ताधारी गटाकडे आहेत. उपनगराध्यक्षपदाबाबत चार वर्षांपूर्वी ठरलेला फॉर्म्युला पाळत बजरंग … Read more

अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना ! प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे डोंगरगण गाव व परिसर प्रेमीयुगुलांसाठी लव्हर पॉइंट बनले आहे. या ठिकाणी सुरू असणार्‍या अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नगर-वांबोरी रोडवर असणार्‍या डोंगरगण गाव हे धार्मिकदृष्टीने महत्त्वाचे गावा आहे. या ठिकाणी सीतेची … Read more

ते पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझाकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी प्राप्त झाला इतक्या कोटींचा निधी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविकास आघडी सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफीत नगर जिल्ह्यात मंगळवारीअखेर 511 कोटींचा निधी जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आहे. हा निधी येत्या दोन दिवसांत बँकेच्या 85 हजार 579 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पात्र 1 लाख 75 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले … Read more

उसने पैसे मागितल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उसने पैसे मागितल्याच्या रागातून तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारेकर गल्लीत घडली. महेश अशोक चव्हाण (२९, आदर्श नगर, कल्याण रोड, नगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रविंद्र सुरेश बारस्कर, आशा रवींद्र बारस्कर, सागर सुरेश बारस्कर, निखिल कैलास बारस्कर, अविनाश सुरेश … Read more

अपहाराचा ठपका असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव नगरपालिकेतील मार्केट विभागाचे निलंबित लिपिक सोपान निवृत्ती शिंदे (५३ वर्षे) यांनी मंगळवारी कर्मवीरनगर येथील काटवनात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. वसुली विभागात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. शिंदे हे अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या मार्केट व वसुली विभागात काम करत होते. हजरजबाबी स्वभावाचे शिंदे प्रशासकीय कामात कुशल असल्याने राजकीय नेत्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नगरसेवकाची गुंडागिरी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले ! आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेच्या एका नगरसेवकासह पाच ते सहा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची व शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याची फिर्याद नालेगावच्या झारेकर गल्लीतील महिलेने दिली आहे.  फ्लॅट खरेदीसाठी पैसे देवूनही खरेदीची कार्यवाही न केल्याने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग येवून शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यासह 5 ते 6 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याची व … Read more

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये – प्रा. शशिकांत गाडे

पाथर्डी : राज्यात बळीराजाचे सरकार आले असून, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून दिलासा देण्याचे काम करणार असून, कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील जि. प. प्रा. शाळेत मिरी -करंजी गटातील प्राथमिक शाळांच्या वतीने आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन राहुरी … Read more

अहमदनगर बाजार भाव : 3-3-2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – १०००, फ्लावर १०० – २०००, कोबी १०० – ६००, काकडी ४०० – १३००, गवार २५०० – ८०००, घोसाळे १२०० – २५००, दोडका १५०० – २५००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २८००, वाल ५०० – १०००, बटाटे … Read more

वाढत्या चोऱ्यांबाबत मंत्रालयातील गृह विभागात बैठक घेणार

अहमदनगर : शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयातील गृह विभागात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. महापालिकेत काल सोमवारी (दि.२) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरु झाले शिवाभोजन !

अहमदनगर : शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत ९०० थाळीचे शिवभोजन सुरू होते. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली होती. या पाचही केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काल रविवारपासून शहरात ऐकून दहा केंद्रांत १ हजार … Read more

तृतीयपंथीयांच्या सहभागाचा फंडा मनपाच्या अंगलट

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तृतीय पंथीय संघटनेला विश्­वासात न घेता किंवा कुठलीही माहिती न देता मालमत्ता करवसुलीसाठी तृतीयपंथीयांचा सहभाग घेणार असल्याचे परस्पर प्रसिद्धीपत्रक काढून तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शहरातील तृतीय पंथीयांनी सोमवारी (दि.२) महापालिकेवर मोर्चा नेवून उपायुक्तांना याचा जाब विचारला. तृतीयपंथीय संघटनेचे अध्यक्ष काजलगुरू यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तृतीयपंथीयांनी महापालिकेत निदर्शने करुन उपायुक्तांना घेराव घातला. … Read more

त्या तरुणाची आत्महत्या नसून खून?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहुरी तालुक्यातील मु.पो. कोंढवड येथील शुभम किशोर बनसोडे यांची आत्महत्या नसून त्याला जिवे ठार मारल्याचा संशय बनसोडे कुटुंबीयांनी व्यक्त केला असून त्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी बनसोडे कुटूंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात नीता किशोर बनसोडे, रविना बनसोडे, जनाबाई शेजवळ, करुणा बनसोडे, सुनील चक्रनारायण … Read more

इंदोरीकर महाराजांच्या या कीर्तनाने मोडले सारे रेकोर्ड !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव : कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी ‘आजचा युवक दिशा आणि दशा’ या विषयावर इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनाने डॉ. आंबेडकर मैदानावरील गर्दीचा उच्चांक मोडला. दोन तास चाललेल्या कीर्तनात अखेरपर्यंत रस्त्याच्या चारही बाजूंनी नागरिकांचे … Read more

गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पतीपत्नीस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. जर याबाबत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा दावाही संबंधितांनी केला आहे. २०१६ मध्ये एका विवाहित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या प्रकरणाने राज्यभरात उडाली खळबळ,आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होणार चौकशी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण झाली. यानंतर सोमवारी (2 मार्च) रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ … Read more

आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ.अभय बंग यांची खंत

अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :- देशात आर्थिक सुबत्ता आहे. विकसित तंत्रज्ञान आहे, भौतिक सुविधा आहेत, आरोग्य सुविधांवर हजारो करोडो रुपये खर्च होतात तरीही दरवर्षी बारा लाख मुले कुपोषणाने दगावतात कशी? अशी खंत सर्च संस्थेचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली. प्रवरा ग्रामीण वैद्यकीय अभिमत विद्यापीठाच्या 14व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी) … Read more