श्रीगोंदा तालुक्यात भरदिवसा घरफोडी

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरोडी येथील रहिवासी संजय भाऊ वागस्कर यांच्या घरी दि.९रोजी दिवसा दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारत, घराच्या कपाटातील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घरफोडीबाबत वागस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, … Read more

दोन-तीन दिवसांत होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक … Read more

शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्राला संधी द्या…

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना सोडून भाजपतील मोठा गट राऊत यांच्या गळाला लागल्याने मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे. उमेदवारीसाठी प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत हे दोघे दावेदार झाल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र … Read more

आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…

श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच … Read more

आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे…यशवंतराव गडाख यांचे कार्यकर्त्याना भावनिक आवाहन

नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.  माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. गडाख अलीकडेच आजारपणातून … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्या विरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे न दिल्याच्या निषेधार्थ आलेश्वर (ता.परांडा) येथील शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी हे साखर आयुक्तालय,पुणे येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्तांना शेतकर्‍यांनी दिले आहे. परांडा तालुक्यातील आलेश्वर, बंगाळवाडी, गोसावीवाडी डोंजा … Read more

माजी आ. शंकरराव गडाख ‘या’ पक्षाकडून लढणार विधानसभा !

नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्‍यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही … Read more

आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले!

नेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.  वडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला. तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक

नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला … Read more

महाजनादेश यात्रेमध्ये कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करणार ?

संगमनेर :- भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यात पुन्हा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मंडपाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अकोले येथून दुपारी १२ वाजता यात्रेचे संगमनेरमध्ये आगमन होईल. अकोले नाक्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, जाणता राजा मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

‘त्या’ पाणी योजनेशी विखेंचा संबंध नाही

संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला. त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले. अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला … Read more

राष्ट्रवादीनेच केले महाराष्ट्राचे वाटोळे!

अहमदनगर – राज्यात युती सरकारने मोठी भरीव विकास कामे केलेली आहेत. 10-15 वर्ष राज्यात सत्तेत असणार्‍यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही. साकळाई योजना फक्त विखेच करु शकतात असे सांगत विखे पाटील परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. उमेदवारीसाठी त्यांच्याकडे माणसे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉ. … Read more

विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही : आ. राजळे

शेवगाव : आपल्याविरुद्ध बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने सध्या ते सोशल मीडियावर काही लोकांमार्फत टीका -टिपण्णी करत आहेत. कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे लक्ष देऊ नये. आगामी निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची व सन्मानाची आहे, असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले. तालुक्यातील शहरटाकळी येथे दहिगाव ने पंचायत समिती गणातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्ता मेळावा … Read more

पारनेर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका !

पारनेर :- तालुक्यातील वाळू तस्करांना पारनेर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील शिरसुले, शिक्री व कान्हूर पठार या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून सुमारे ६० लाख २८ हजार ६००रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर अवैध वाळू तस्करी प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील नदीसह अनेक ओढ्या नाल्यातून देखील वाळू … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती. याचवेळी … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, तालुक्यातील भंडारदरा धरणातून ३४ हजार १२५ क्यूसेक, तर निळवंडे धरणातून २८ हजार १९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अकोले तालुक्यात पावसाची संततधार सर्वदूर सुरूच असून मुळाखोरे, आढळा खोरे, प्रवरा खोऱ्यासह भंडारदरा पाणलोट क्षेत्रात … Read more