विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित

मुंबई – सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.  प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात 54 सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, … Read more

भाविकास गाडी चालकाकडून शिवीगाळ व धमकी

शिर्डी  – शिडी येथून श्री शनि शिंगणापूर येथे जाण्यासाठी मिनी बस नं. एमएच २० एएस ९१९९ हिच्यामध्ये प्रवासासाठी बसवून रस्त्याने गाडी जोरात चालवून फिर्यादी व गाडीतून भक्त प्रवाशांना वाईट वाईट शिवीगाळ करुन श्री शनि शिंगणापूर येथे गेल्यावर माझ्या मालकीच्या दुकानातच पूजेचे ताट घ्या असे म्हणून जबरदस्ती करुन फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करून खाली उतरवून तुला दाखवतो, … Read more

मुस्लिम समाजबांधवांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात

अहमदनगर :- कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु असताना, चांदा (ता. नेवासा) येथील मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईदनिमित्त जमा केलेली मदत मंगळवारी पाठवली. चांदा येथील मुस्लिम समाज बांधवांनी ईद साध्या पध्दतीने साजरी करीत सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. ईदच्या नमाजनंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावातून मदतफेरी काढण्यात आली होती. यावेळी मुस्लिम बांधवांसह नागरिकांना सढळ हाताने मदत … Read more

कलेतून नवनिर्मितीचा आनंद – विक्रम राठोड

नगर –  शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.  स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते. अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने  आयोजित  शालेय  चित्रकला  स्पर्धेस  मोठा  प्रतिसाद  मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले.  स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.    

कुत्र्यांच्या त्रासापासून सुटकेसाठी घरासमोर कुंकवाचे पाणी!

श्रीरामपूर : शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा रात्री-बेरात्री सुरू असलेला उपद्रव तसेच अंगणातील विष्ठेला वैतागलेल्या नागरिकांकडून नामी शक्कल लढविण्यात आली आहे. कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी कुंकवाचे पाणी भरलेल्या लाल भडक रंगाच्या बाटल्या घरासमोर नजरेस पडू लागल्या आहेत. या उपायातून काही प्रमाणात मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळाल्याचा दावाही नागरिकांकडून केला जात आहे. गल्लीबोळातील कुत्र्यांना वैतागलेल्या नागरिकांनी त्यांना … Read more

पोलिसांसमोर युवकावर गोळीबार !

नेवासा : घोडेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ नव्यानेच झालेल्या पोलीस चौकीसमोर सचिन गोरख कुऱ्हाडे या युवकावर दुचाकीवरून आलेल्या चार जणांपैकी एकाने काही कळायच्या आत सायंकाळी सहा वाजता दोन गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे पोेलिसांवर ही घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सचिनच्या उजव्या खांद्याला एक गोळी लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. … Read more

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांचा 20 ऑगस्टचा संप स्थगित

नगर – सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर20 ऑगस्ट 2019 रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचा एक दिवसीय लाक्षणिक संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.      आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार तातडीची सहविचार … Read more

त्यांनी काय दिवे लावले ?

श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले. काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते … Read more

रोहित पवारांचा धसका घेतल्याने पालकमंत्री शिंदेना मतदारसंघ सुटेना….

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. भाजप सरकार मध्ये मंत्री असूनही राज्यातील पूरग्रस्त भागात जाणे त्यांनी टाळले असून मतदार संघातच राहणे पसंत केले आहे.  कर्जत जामखेड मतदारसंघात कमी वेळ देणारे मंत्री शिंदे निवडणुका जवळ येताच मतदारसंघात रमायला … Read more

डॉक्टरांच्या मदतीमुळे वाचला गर्भवती महिलेचा जीव

राशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली. मंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. … Read more

निलेश गायकर यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर

अकोले – : ब्राम्हणवाडा विभागाचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांना युवा ध्येय प्रणीत या सामाजिक संस्थेचा यंदाचा सामाजिक कार्यकर्ता व युवा उद्योजक क्षेत्रातील राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार २०१९ जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून निलेश गायकर यांनी सामाजिक बंधीलिकीच्या माध्यमातून संगमनेर , अकोले तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमांच्या … Read more

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने ओळखीच्यानेच अल्पवयीन मुलीला पळवले

नगर – जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील डोरजा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला सकाळी ७ च्या सुमारास पळवून नेले. ढोरजा गाव शिवारात बाळू वाणी यांच्या लिंबोणीच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला सदर विद्यार्थीनी उभी असताना तेथे दोरजा गावात राहणारा आरोपी अक्षय संतोष गोरे हा आला व तो विद्यार्थीनीला शाळेत सोडतो असे म्हणत तिला दुचाकीवर बसवून … Read more

सोनई पोलिसांना सापडेनात खुनाचा प्रयत्न करणारे हल्लेखोर

नगर –नेवासा तालुक्यातील सोनई येथे अमोल राजेंद्र शेजवळ या युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी सोनई पोलिसांना शोध घेऊनही सापडेनात. या हल्ल्यात अमोल शेजवळ गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यातील एक आरोपी स्वतःहून पोलिसांपुढे हजर झालेला असून इतर हल्लेखोर मात्र फरार आहेत.  शुक्रवार दि. ९ ऑगस्ट … Read more

रेल्वे अपघातात पत्रकाराचा मृत्यू

अहमदनगर  – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना  मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने  जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले.  अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही. पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून … Read more

भंडारदरा धरणावर पाऊस सुरूच

भंडारदरा : -भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असून गुरुवारी संध्याकाळी धरण शाखेकडून प्रवरा नदीत ५७४८ क्युसेक्सने विसर्ग सुरू असून कृ ष्णवंती नदीतूनही १०२२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १०५०० दलघफू कायम ठेवून जादा … Read more

कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत !

राहाता :- डोळ्यांसमोरून हक्काचे पाटपाणी वाहून जात आहे. कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत, असे प्रतिपादन माजी आ. अशोकराव काळे यांनी केले आहे. राहाता तालुक्यातील चितळी येथे माजी आमदार काळे यांनी नुकतीच स्नेहभेट देऊन येथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर वाघ होते. … Read more

प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन ते मार्गी लावण्याचे धोरण

पारनेर – लोणी हवेली रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सोळा लाखांचा निधी मिळाल्यामुळे या रस्त्यावरील वसाहतींमधील जनतेला दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावर अनेक नव्या वसाहती झाल्या असून, रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त होते. पावसाळयात नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असे. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्षा वर्षाताई नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी जि. प.चे … Read more

डॉ. विखेंचा जयंतीदिन शेतकरी दिन म्हणून होणार साजरा

लोणी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्­हणून साजरा करण्­याचा निर्णय राज्­याच्­या कृषि, पशुसंवर्धन, दुग्­ध व्­यवसाय, विकास व मत्­सव्­यवसाय विभागाने घेतला आहे. डॉ. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरीता केलेल्­या कार्याचे स्­मरण व्­हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्­मान म्­हणुन नारळी पौर्णिमेच्­या दिवशी असलेला त्­यांचा जन्­मदिवस हा शेतकरी दिन … Read more