भरधाव कारची धडक बसून दुचाकीस्वार ठार

नगर | नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारची समोरील दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक बसली. त्यात दुचाकीस्वार ठार झाला. इकबाल रउफ शेख (बेपारी मोहल्ला, कादरी चौक) असे त्यांचे नाव आहे. मागे बसलेली १७ वर्षांची मुलगी जखमी झाली. ही घटना चास शिवारातील डस्टर शोरूमसमोर ११ मे रोजी घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अजय वसंत दराडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद … Read more

उद्या दारूची दुकाने बंद !

राहुरी | नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी २३ मे रोजी कोरडा दिवस पाळण्याचा आदेश दिला. या दिवशी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, परवाना कक्ष, देशी-विदेशी दारु दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतील. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास … Read more

गाडीला धक्का लागल्याचा राग,दोन गटांत तुफान दगडफेक, नगरसेवकासह ९ जणांना अटक

कोपरगाव :- धक्का लागल्याचा राग येऊन स्विफ्ट कारचालकाने मोटरसायकलस्वारास मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता गांधीनगर भागात घडली. त्यानंतर दोन गट आमने-सामने येऊन प्रचंड धक्काबुक्की व दगडफेक झाली. लाकडी दांडक्याने व चाकूने वार करण्यात आले. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिस वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. शीघ्र कृतिदलाची एक तुकडी बोलवल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. … Read more

माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करणाऱ्या पतीसह तिघे अटकेत

अकोले | माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांनी मारहाण व मानसिक छळ केल्याची फिर्याद दिशा तुषार शिंदे (वय २५, केतन अनंत पाटील सोसायटी, अग्रोळी बेलापूर, नवी मुंबई, हल्ली पिसेवाडी) यांनी दिली. त्यानुसार तुषार चिमाजी शिदे, लक्ष्मी चिमाजी शिंदे, सचिन चिमाजी शिंदे (केतन अनंत पाटील सोसायटी, नवी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून ५ … Read more

महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर :- देवदर्शन करण्यासाठी सासूसह गेलेल्या महिलेस विनाकारण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सावेडी परिसरातील पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ रविवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी सुप्रिया काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राम मोकाटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया काळे या सासूसमवेत दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. आरोपी राम याने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी … Read more

ब्रेकिंग : कर्जत तालुक्यात राजकीय भूकंप

कर्जत : पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या साधना कदम यांना गळाला लावून भाजपाने राष्ट्रवादीला सुरुंग लावला. कर्जत तालुक्यात ना.प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून देत राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केले असून, सभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड असून, यावेळी बहुमतातील … Read more

पिस्तूलचा धाक दाखवत पावणेसात लाख लांबवले

काेपरगाव | लोहकणेवस्ती येथील श्रद्धा होंडा शोरुमजवळून ज्युपिटर स्कूटरवरुन जाताना ३ ते ४ भामट्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकू व पिस्तूलचा धाक दाखवत साकुरी येथील राकेश वढेर (पटेल) यांच्या गाडीच्या डिकीत ठेवलेले पावणेसात लाख लांबवले. या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १८ मे रोजी दुपारी ४ दरम्यान घडली. राकेश … Read more

रस्ता खराब असल्यामुळे झालेल्या अपघातात महिला ठार

टाकळीभान | टाकळीभान – घोगरगाव रस्त्यावर धुमाळवस्तीजवळ रविवारी सकाळी ८.३o च्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात मारियाबाई ज्ञानदेव शिरसाठ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. घोगरगावहून लग्न समारंभासाठी निघालेल्या मारिया शिरसाठ व शिरसाठ हे हीरो होंडा मोटारसायकलीवरून (एमएच १२ व्ही ३६६४) टाकळीभानच्या दिशेने चालले होते. घोगरगावकडून टाकळीभानकडे चाललेला टेम्पोची (एमएच १६ ए ई ५१०९) धुमाळवस्तीजवळ … Read more

अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून … Read more

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेले

कोपरगाव | येथील संजीवनी कारखाना परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस आकाश सुदाम वाघ (सांगवी, जि. औरंगाबाद) याने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर

अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी … Read more

विखे कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले !

पारनेर :- विखे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे सत्तर कोटी थकवले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू व प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला. राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील संस्थांत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात डॉ. अशोक विखे साेमवारपासून लोणी येथे उपोषणास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अर्धा … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या चुलतभावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नेवासे :- चुलत भावजयीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्या चुलतभावाचा खून करून विजेचा शॉक बसल्याचा बनाव करणाऱ्या बाळासाहेब बाबासाहेब भगत (धेडगे) याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देवगाव येथे २ एप्रिल १७ रोजी ही घटना घडली. आरोपी बाळासाहेबचे चुलतभाऊ शंकर भानुदास भगत (धेडगे) (वय ३०) याच्या पत्नीशी अनैतिक संबध होते. हे समजल्याने शंकर पत्नीला मारहान … Read more

उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

अहमदनगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता … Read more

विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक !

अहमदनगर :- सागर विलास कानडे या विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गौरी जगताप या महिलेला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गौरीच्या जाचाला कंटाळून सागरने २ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गौरी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. … Read more

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जामखेड :- येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षिका विजया नितीन वराट (वय ४०, माहेरचे नाव विजया सीताराम गुजर) यांनी बुधवारी मध्यरात्री तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली. अंत्यविधी गुरूवारी सकाळी झाला. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले … Read more

नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर :- बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ शेख यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोन्ही आजी- माजी नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाले. सर्जेपुरा परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या समर्थकांत राडा झाला. दगडफेेक झाल्याने परिसरात … Read more

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

कोपरगाव | खिर्डी गणेश शिवारात शेत गट नंबर ५४ मधील विहिरीत बाळासाहेब विठ्ठल शेटे (४५, बोलकी) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.