Ahmednagar News : ‘शासनाचा आदेश जिल्हा बँकेने डावलला, शेतकऱ्यांकडून वसूल केले पीककर्जाचे व्याज ! आता लोक आक्रमक झाल्यावर व्याज परताव्याची नामुष्की’

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेने मार्च अखेर वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली केली. शेतकऱ्यांनीही भरणा केला. परंतु शासनाचा आदेश होता की, नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये. असे असले तरी बँकेने हा आदेश डावलला. आता शेतकरी संघटना, लोक आक्रमक झाल्यानंतर या शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज पुन्हा माघारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे व्याज … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीच्या राजकारणात ट्विस्ट ! एकमेकांचे विरोधक, एकमेकांविरोधात लढणारे दोन मातब्बर नेते एकत्र

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण हे महाराष्ट्रात नेहमीच अग्रस्थानी राहिले. याचे कारण असे की येथील राजकारण हे सहकाराभोवती, सगे सोयऱ्यांभोवती फिरत राहिले. तसेच येथील राजकीय विरोधक देखील एकमेकांचे कट्टर विरोधक होते. पक्षनिष्ठता होती. असे असले तरी राजकारणात सुसंस्कृतपणा होता. परंतु आता काळाच्या ओघात अनेक गणिते बदलली आहेत. दरम्यान आता लोकसभेच्या अनुशंघाने विविध राजकीय घडामोडी … Read more

Ahmednagar Politics : डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही – डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत. कोणतेही सर्व्हे येवू द्यात,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात … Read more

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आ. थोरातांबाबत गौप्यस्फोट ! ‘संपदा’ घोटाळ्यातील जन्मठेप झालेल्यांना राजाश्रय होता ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळा महाराष्ट्रभर गाजला. त्यानंतर यातील काही आरोपीना जन्मठेप झाली तर काहींना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झाल्या. पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी जन्मठेप होणे हा अहमदनगरधील पहिलाच प्रकार घडला, त्यामुळे हा निकालही जास्त गाजला. दरम्यान आता या संपदा गैरव्यवहारावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये शेअर बाजार, दुप्पट नफा आदींचे लोण, शेवगावंच नव्हे तर नेवासे, पारनेरमध्येही कोट्यवधींची फसवणूक

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही वर्षांचा विचार केला तर जास्त परतावा मिळावा या आमिषाने लोक विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या ऑफरला बळी पडलेले दिसतायेत. अनेकांची फसवणूक झालेली आहे. परंतु यातून लोक कुठे शहाणे होत नाहीत तोच आता शेअर मार्केट, ट्रेडिंग आदींमध्ये पैसे डबल, ट्रिपल करायच्या नावाखाली लोक पैसे गुंतवत आहेत. यातील अनेक ट्रेडर्स कोट्यवधी रुपये … Read more

पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात काल मंगळवारी (दि.१६) रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने कोरडगाव, फुंदेटाकळी, औरंगपूर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती, त्यामुळे दिवसभर भयंकर उकाडा जाणवत होता. त्यात दिवसभर विजेचा लपंडाव चालू असल्याने आजारी व्यक्ती, वृद्ध, बालके, यांना घरात बसणे मुश्किल झाले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोरडगावसह औरंगपूर … Read more

Ahmednagar News : काही न करता तासंतास पाण्यावर तरंगत राहतोय.. हा कुणी साधूबाबा नव्हे तर अहमदनगरमधील चिमुरडा !

Ahmednagar News

Ahmednagar News : एखादी कला, विद्या यामध्ये जर पारंगत व्हायचे असेल तर सराव हा महत्वाचा असतो. आपल्याकडे अनेक कला, विद्या यांचा अनमोल ठेवा होता. परंतु काळाच्या ओघात या कला नामशेष पावत गेल्या. परंतु त्यातील काही अशा कला आहेत की त्या आजही सरावाने आत्मसात करण्यात येतात. दरम्यान आता अहमदनगरमधील एका पाचवीमधील मुलाची पोहोण्याची कला पाहून सध्या … Read more

संतप्त गुंतवणूकदारांनी शेअर व्यावसायिकाचे कार्यालय फोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुका शेअर मार्केटचे हब म्हणून ओळखला जात असताना गेल्या महिन्यापासून यातील एक- एक शेअर मार्केटिंग व्यावसायिक कोट्यवधी रुपयांची माया घेऊन पलायन करताना दिसत आहे. लाडजळगाव येथील घटना ताजी असतानाच गदेवाडी येथील एका शेअर मोर्केटिंग व्यावसायिक रविवार (दि.१४) रोजी पहाटे कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून फरार झाला असताना आज (दि. १५) रोजी … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये दीड महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ! हवामान विभागाचा हाय अलर्ट, ‘इतके’ जाऊ शकते तापमान

Ahmednagar News

Ahmednagar News : वातावरणातील उष्णता वाढत चालली आहे. नगर शहरात तापमान रेकॉर्डब्रेककडे चालले आहे. मंगळवारी दुपारी नगर शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मागील दीड महिन्यांतील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. दरम्यान, दुपारी चार नंतर ढगाळ वातावरणामुळे उकाडा देखील प्रचंड वाढला होता. वाढलेल्या उकाड्यामुळे नगरकर देखील हैराण झाले होते. तर काही ठिकाणी … Read more

वन्यजीवांची चारा व पाण्यासाठी भटकंती

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पारेवाडी, साकेगाव, परिसरात वण्यप्राण्यांना खाण्यासाठी चारा व पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने वन्यप्राणी पाण्या वाचून तडफडत आहेत, त्यातच पुरेसं खाद्य मिळत नसल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. वन्यप्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून, वन्यप्राण्यांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पारेवाडी-पिंपळगाव, साकेगाव, परिसरात वन्यप्राण्यांचे प्रमाण … Read more

डॉक्टर दाम्पत्याने फुलवली गच्चीवर बाग !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनला खूप महत्त्व प्राप्त झाले. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरायला जाणे, उद्यानामध्ये फिरण्यासह योग, प्राणायम, व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवणे, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. कोपरगावातील डॉ. रमेश सोनवणे व सुनंदा सोनवणे या डॉक्टर दाम्पत्याने तब्बल १२ वर्षांपूर्वीच स्वच्छंदातून गच्चीवर बाग फुलवली असून त्यात … Read more

Ahmednagar Breaking : कुस्तीच्या सरावा दरम्यान पैलवानाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कुस्तीचा सराव सुरू असताना पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना राजूर (ता. अकोले) येथे सोमवारी सकाळी ७.३० वा. घडली. पै. मच्छिद्र लक्ष्मण भोईर (वय २४, रा. देवठाणा, ता. हिंगोली), असे मयत पैलवानाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेडेगावात कुस्तीची सुविधा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी त्याला राजूर येथील साई कुस्ती केंद्रात पाठविले होते. आपल्या मुलाला … Read more

सुसंस्कृत राजकारणामुळेच जनतेचे पाठबळ : खा. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा. डॉ विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित … Read more

विद्यार्थी शाळेत हजर पण गुरुजीच गैरहजर !

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेच्या वेळेत बदल केला असून, शाळेची वेळ सकाळी ७ ते १२ अशी केली आहे. मात्र या वेळेला विद्यार्थी शाळेत हजर राहत असून गुरूजीच उशीरा शाळेत येत आहेत. त्यामुळे या उशीरा शाळेत येणाऱ्या गुरूजींवर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्ग करत आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाच्या वाढत्या … Read more

दोन एकरात शेतकऱ्याने घेतले टरबुजाचे चार लाखांचे उत्पादन

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली, या पिकास ठिबक सिंचनाव्दारे पाणी देऊन तब्बल ४ लाखांचे विक्रमी उत्पादन घेतले. एका टरबुजाचे वजन १५ ते २० किलो भरत असून, व्यापारी शफीक भाई शेख व युसुफभाई पठाण … Read more

लोकसभा निवडणुक पक्ष फोडणाऱ्यांना आरसा दाखवेल ! महायुतीला मोठा फटका; ओपिनियन पोलमध्ये अजित पवार अन शिंदे गटाला फक्त ‘इतक्या’ जागा,

Loksabha Election

Loksabha Election : पाच वर्षांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. देशात लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 19 एप्रिल पासून 18 व्या लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील पाणीटंचाईच्या झळा तीव्र ! टँकरचा आकडा वाढणार, सध्या १८६ गावांसह ९५८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : उष्णता प्रचंड वाढली आहे. एप्रिल महिन्याचे शेवटचे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आता पाणीटंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे १८१ टँकरने जिल्ह्यातील १८६ गावे व ९५८ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा सध्या होत आहे. परंतु उपलब्ध पाणीपुरवठा पाहता ही टंचाई अत्यंत भीषण होऊ शकते असा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने निविदा काढून वर्षभर … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये नगर-मनमाड महामार्गावर अपघात, एक ठार चार जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात विविध अपघाताच्या घटना समोर आलेल्या असून यात अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. पारनेर तालुक्यातील अपघाताच्या घटना ताजा असतानाच आता नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जखमी झाले आहेत. रविवारी रात्री शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड … Read more