Ahmednagar News : अहमदनगरमध्ये शेअर बाजार, दुप्पट नफा आदींचे लोण, शेवगावंच नव्हे तर नेवासे, पारनेरमध्येही कोट्यवधींची फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही वर्षांचा विचार केला तर जास्त परतावा मिळावा या आमिषाने लोक विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या ऑफरला बळी पडलेले दिसतायेत. अनेकांची फसवणूक झालेली आहे.

परंतु यातून लोक कुठे शहाणे होत नाहीत तोच आता शेअर मार्केट, ट्रेडिंग आदींमध्ये पैसे डबल, ट्रिपल करायच्या नावाखाली लोक पैसे गुंतवत आहेत. यातील अनेक ट्रेडर्स कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत.

हा सगळा प्रकार शेवगाव तालुक्यातील काही घटनांवरून उजेडात आला. परंतु हे लोण केवळ शेवगावातच नव्हे तर नेवासे, पारनेरमध्ये देखील असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

नेवासा तालुकाही पडतोय बळी

शेवगाव तालुक्यात सुरू असलेल्या शेअर मार्केट बाजाराचे लोण आता नेवासा तालुक्यातही पसरू लागले आहे. यातून धमक्या अन् तक्रारी सुरू झाल्या आहेत.

पैशांच्या आमिषाने सुरू असलेला हा बाजार लवकर उठला नाही तर गुन्हेगारीच्या घटना घडण्यास वेळ लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेकांच्या पैशांवरून एकमेकांना सम्पवण्याची भाषा आता केली जाऊ लागली आहे.

गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

शेवगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमधून पैसे कमावून देणाऱ्या दलालांचा चांगलाच गाजावाजा आहे. चांगल्या परताव्याच्या आमिषाने लोकांकडून गुंतवणूक घेतल्यानंतर काही दलालांनी पलायन केल्याने अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. पैसे परत मागणाऱ्यांना १२ ते १५ टक्केपर्यंत परतावा देऊ, असे आमिष दाखविले जात आहे.

चिलेखनवाडी, भेंडा आदी ग्रामीण भागातही लोण

भेंडा, कुकाणा, चिलेखनवाडी, गेवराईनजीक चिचोली परिसरातील अनेकांनी अशा एजंटांकडे गुंतवणूक केली आहे. काहींनी शेतमाल विकून, काहींनी सोनेतारण ठेवून कर्ज काढले, बचत गटाचे कर्ज घेऊन, बँका,

पतसंस्था यामधील मुदत ठेवीच्या पावत्या मोडून, जादा व्याज मिळते म्हणून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली. विशेष म्हणजे सर्व व्यवहार रोखीने होतो. यामुळे गुंतवणूक करणारे किती गुंतवणूक केली, हा दावा करू शकत नाहीत.

पारनेरमधेही वाढतेय लोण

पारनेर तालुका देखील अपवाद राहिला नाही. या तालुक्यात देखील नेक शेअर मार्केटिंग करणारे, ट्रेडिंग करणारे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे यांच्याकडे करोडोंची गुंतवणूक देखील केली आहे अशी माहिती काही लोकांकडून समजली आहे.