Toyota Car:- जर कोणत्याही व्यक्तीला कार घ्यायची असेल तर तो सर्वप्रथम कारची किंमत आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या व मायलेज इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. सध्या सात सीटर कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व देशातील अनेक कार उत्पादक कंपन्या आता अनेक वेगवेगळे मॉडेल्स यामध्ये लॉन्च करताना आपल्याला दिसून येत आहेत.
भारतामध्ये ज्या काही आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या आहे त्यामध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर हे नाव देखील खूप प्रसिद्ध आहे. आता पर्यंत टोयोटाने अनेक परवडणाऱ्या दरात आणि वैशिष्ट्येयुक्त अशा कार बाजारपेठेत आणले आहेत व बऱ्याच टोयोटाच्या कार ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरल्या आहेत.
त्यामुळे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने परवडणाऱ्या दरातील सात सीटर कार रुमीऑन(Rumion) चा नवीन ऑटोमॅटिक व्हेरियंट लॉन्च केला असून या कारची बुकिंग देखील कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. जर ही कार बुक करायची असेल तर ग्राहकांना अकरा हजार रुपयांच्या टोकन रकमेसह बुक करता येऊ शकते
व या कारची डिलिव्हरी पाच मे पासून सुरू होणार आहे. या कारचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक फॅमिली कार असून या कारमध्ये इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर आयएसजी अर्थात निओ ड्राईव्ह तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Toyota Rumion G AT कारची वैशिष्ट्ये
या नवीन टोयोटा Rumion G AT व्हेरियंटमध्ये कंपनीच्या माध्यमातून 1.5 लिटर के सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १०३ एचपी पावर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते व इंजिन सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायसह देण्यात आले आहे. हे इंजिन एका लिटर मध्ये 20.11 किमीचे मायलेज देते.
या इंजिनचे वैशिष्ट्य म्हणजे हे मारुती सुझुकीच्या बऱ्याच गाड्यांमध्ये वापरले जाते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या फॅमिली कार मध्ये ईबीडी, ड्युअल फ्रंट एअरबॅग, हिल होल्ड, एचडी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
तसेच या कारचे सीट खूप कम्फर्टेबल असून सात इंचाची टचस्क्रीन ऑडिओ सिस्टम देखील आहे. तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्टने ही कार सुसज्ज आहे. विशेष म्हणजे ही कार रिमोटद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते.
किती आहे या कारची किंमत?
Toyota Rumion G AT या नवीन व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 13 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.