Ahmednagar Breaking : ग्रामपंचायत कारभारात पतीचा हस्तक्षेप, अखेर त्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : तालुक्यातील राजापूर येथील लोकनियुक्त महिला सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि.९ रोजी दुपारी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त … Read more

Nighoj Kund : निघोज कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला परत आलीच नाही…

Nighoj Kund

Nighoj Kund : पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळावरील कुंडात पाय धुण्यासाठी गेलेली महिला पाय घसरल्याने बेपत्ता झाली असून, दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरू असून, अद्याप मृतदेह हाती लागला नाही. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोह गव्हाण येथील पद्माबाई शेषराव काकडे ही ५५ वर्षे वयाची महिला पाय धुण्यासाठी कुंडात उतरली असता, पाय घसरून … Read more

Ahmednagar News : पैंजण आणि सॅनिटरी पॅडवरून समजलं खून कोणी केला ? अखेर अहमदनगर जिल्ह्यातील मामा भाच्याला अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar News : मागील आठवड्यात अकोले तालुक्यातील कातळापूर येथे एका २५ वर्षे महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पायातील पैंजण व पर्समधील सॅनिटरी पॅडवरून पोलिसांनी महिलेचा शोध घेतला व आरोपींना बेड्याही ठोकल्या. कल्याणी महेश जाधव (रा. वांबोरी, तालुका राहुरी) असे महिलेचे नाव आहे, तर आरोपी महेश महेंद्र जाधव हा महिलेचा पती असून त्याचा भाचा सूत्रधार … Read more

Ahmednagar News : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सोनईत निषेध मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी येथील हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धा अभिषेक करून आरोपीला कडक कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर काल मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सोनईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच धनंजय वाघ यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धा अभिषेक करण्यात येऊन सोनई पोलीस ठाण्यावर … Read more

Ahmednagar Crime : मागील भांडणाच्या रागातून घरात घुसुन तोडफोड !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तालुक्यातील बेलापूरातील खटकाळी येथील शेख यांच्या घरावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, कुन्हाड, धारदार हत्याराने नुकताच हल्ला चढविला. यत घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे. बेलापूरातील पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime

Ahmednagar News : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवणाऱ्या पोलिस पथकाच्या अंगावर वाळू माफियांनी गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, दोघा जणांना अटक केली आहे. तसेच वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर व दोन ट्रॅक्टर आणि ५५ ब्रास वाळू साठा, असा सुमारे ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त … Read more

स्टेटसला औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह गाणे ठेवल्याने ‘त्या’तरुणाविरोधात गुन्हा दाखल !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवून आक्षेपार्ह गाणे लावण्यात आले. या घटनेमुळे राहुरी तालूक्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. ही घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कन्हैय्या भरत दिघे हा तरूण राहुरी तालुक्यातील धानोरे येथील रहिवाशी आहे. या … Read more

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झाली ओळख, स्वस्तात सोने देतो बोलला आणि केल असे काही…

Shrigonda News

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा उपयोग करत हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला व त्याच्या आईला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने देऊन ड्रॉप टाकत फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरात दि.३ ऑगस्ट रोजी घडली याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दीपक कोंडीबा वाघमारे (वय २२, रा. कुरुंदा, ता.वसमत जि. हिंगोली) या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

गृहमंत्र्यांनी नगर शहराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : माजी महापौर कळमकर यांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : ऐतिहासिक नगर शहरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले असून यातून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. हे थांबण्याची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Shevgaon News : पाच हजार बोगस खरेदी- विक्री व्यवहार ! उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा

Shevgaon News

Shevgaon News : शेवगाव शहरातील बोगस बिनशेती जागेच्या नोंदीबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी दिला आहे. एक वर्ष होऊनही गुन्हे दाखल होण्यास विलंब लागत असल्याने यात अधिकाऱ्यांबाबत बचावात्मक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप मुंढे यांनी केला आहे. शेवगाव शहरात ४२ ब अंतर्गत बेकायदेशीर बिनशेती आदेश … Read more

MLA Rohit Pawar : ‘सीना’ वरील सहा बंधाऱ्यांना सरकारची मंजुरी ! आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Maharashtra News

MLA Rohit Pawar : ‘कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवर ६ बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे. तसेच उर्वरित ४ बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असलेले हे धरण भरणार कधी ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी आणखी प्रतिक्षा वाढली असून गत दोन दिवसापासून पाणलोटात पावसाने विसावा घेतल्याने स्वातंत्र दिनाच्या अगोदर धरण भरण्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अतिमहत्वाचे धरण समजले जाते. सध्याच्या परिस्थितीत भंडारदरा धरणाला भरण्याचे गत आठ दिवसापासून वेध लागलेले आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बनावट दस्तऐवज तयार करून जमीनविक्री करणारी टोळी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरासह तालुक्यातील जनतेला फसविणारी व बनावट दस्तऐवज तयार करून जमीन अथवा प्लॉटची खरेदी करून देत आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. गेल्या चार महिन्यांत असे फसवणूक झालेले चार प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यापैकी एकजण पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टोळीचा छडा लावण्यासाठी ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनील पाटील यांनी … Read more

Ahmednagar Mahanagarpalika Bharti : अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ! तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार

Ahmednagar Mahanagarpalika Bharti

Ahmednagar Mahanagarpalika Bharti : महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती … Read more

Ahmednagar Politics : शिंदे असो वा पवार पाणी काही मिळेना ! कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी व जवळाच्या बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी अशोक पठाडे, अविनाश पठाडे, किरण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते पोपट रोडे व कुकडी सीना पाणी संघर्ष समितीच्या वतीने कर्जत येथील कार्यकारी अभियंता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. … Read more

अहमदनगरमध्ये फ्रेंडशिप डे’ला मित्रानेच दिला धोका ! तुझ्याकडे काम आहे, लवकर ये म्हणाला आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझ्याकडे काम आहे, लवकर ये, असे सांगून बोलावून घेत मित्रावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार पुणे रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपासमोर रविवारी (दि. ६) रात्री घडला. सागर दत्तात्रय जाधव (रा. २९, रा. निंबोडी, ता. नगर) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केली. मात्र, हल्ला का केला, याबाबत दोघा मित्रांनी चुप्पी साधली आहे. … Read more

Agricultural News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३२ कोटींची नुकसान भरपाई !

Agricultural News

Agricultural News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९५ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे. मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार १२८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख तर जामखेड तालुक्यातील ५३ गावातील … Read more

जनतेने पक्षीय विचार न करता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा : सुजित झावरे

Ahmednagar News

Ahmednagar News : बदलत्या राजकीय परिस्थितीत जनतेने पक्षीय विचार न करता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन जि.प. चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पा. यांनी केले. पारनेर तालुक्यातील डिकसळ येथे स्मशानभूमी सुशोभिकरण तसेच स्ट्रीट लाईट बसविणे, कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डिकसळ गावातील वेस अंगणवाडी इमारत, पाझरतलाव व रस्ते … Read more