Ahmednagar News : आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे !

Ahmednagar News : आयुक्त, उपयुक्तांच्या मान्यतेसह मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा योजनेचा खाजगीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. काँग्रेसने यावर जोरदार टीका केली असून आता फक्त महापालिका विकणे बाकी उरले आहे, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपावर केला आहे. दरम्यान, सोमवारी काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्तांची या विषयाबाबत भेट घेऊन खाजगीकरणाला … Read more

कीर्तनाला गेल्या अन लाखाचा ऐवज गमावून आल्या…!

Ahmednagar News:गर्दीचा फायदा घेऊन खर्डा बसस्थानकातून एक लाख रुपयांचे सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा बस स्थानक येथे घडली आहे. याबाबत माहिती अशी की, खर्डा हे गाव तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले शहर असून, संत सीताराम गड, संत गीते बाबा गड, खर्डा येथील ऐतिहासिक किल्ला, स्वराज्य ध्वज व परिसरातील बारा … Read more

संप काळात एसटीला सांभाळलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना धक्का

Ahmednagar & Maharashtra News :प्रदीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपकाळात एसटीची धुरा सांभाळून तिला रुळावर आणलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर महामंडळाने धक्का दिला. आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे पडत्या काळात एसटीला साथ दिलेल्या या कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी २७ ऑक्टोबर २०२१पासून … Read more

शेतकऱ्यांनो आपल्या जनावरांची काळजी घ्या रे….!जनावरांसाठी घातक असलेल्या ‘लंपी’चा प्रादुर्भाव वाढतोय

Ahmednagar News : आधीच विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे जनावरांना होत असलेल्या लंपी या आजाराची. सुरूवातीला अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यात मर्यादित असणाऱ्या जनावरांतील लंपी स्किन या आजाराचा आता जिल्ह्यातील १० तालुक्यात प्रसार झाला आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाची धावपळ वाढली असून, या आजाराने पिडीत … Read more

स्वदेशी आयएनएस विक्रांत नौदलात दाखल, पहिला कमांडिंग ऑफिसर अहमदनगरचा

Ahmednagar News:स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही नौदलात दाखल झाली आहे. हा जस भारतीय नौदलासाठी आज गौरवाचा दिवस आहे. तसाच अहमदनगरकरांसाठीही आहे. या स्वदेशी विमानवाहू नौकेचा पहिला कमांडिंग ऑफिसर कमोडोओर विद्याधर हारके हे मूळचे अहमदनगरचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केरळमधील कोची येथे या नौकेचे जलावतरण झाले. नौदलाचा नवा … Read more

हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे

Ahmednagar News:हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे यांची निवड करण्यात आली. सावेडीतील संजोग लॉन येथे झालेल्या राष्ट्रनिर्माण संकल्प सभेमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी अडोळे यांच्या नावाची घोषणा करत पत्र देण्यात आले. अडोळे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच हनुमान भक्त म्हणून सर्वज्ञात आहेत. हिंदूराष्ट्र सेनेची शहरात व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवा पक्ष काढायला निघालेल्या करुणा मुंडेंना ३० लाखांना गंडा, आरोपी संगमनेरमधील

Ahmednagar Breaking :- जानेवारी महिन्यात नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पक्षासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यात आली. यातील आरोपी धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असून पैसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News :- “श्रावण अमावस्या”, “श्रीगणेश चतुर्थी”, “ऋषिपंचमी” व “अनंत चतुर्थी हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! १० हजारापासून ते १ लाखापर्यंत…

Ahmednagar News: राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यांमध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे. उर्वरित ११ तालुक्यांमध्ये २७ ऑगस्ट २०२२ पासून ही यात्रा सुरू होणार … Read more

Ahmednagar News : तब्बल तीन महिन्यांनी सक्कर चौकातील वाहतूक सुरळीत

Ahmednagar News:अहमदनगर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने स्टेशन रोडवरील सक्कर चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती. आता हे काम पूर्ण झाल्याने ती पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा याला जास्त काळ लागला. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहतूक पूर्ववत झाल्याने दिलासा मिळणार आहे. सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख जाहीर, यांची झाली नियुक्ती

Ahmednagar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अहमदनगर जिल्हाप्रमुख म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. शिंदे यांनी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकांचा प्रवेश घडवून आणला. त्याची पावती त्यांना मिळाल्याचे मानले जाते. अनिल शिंदे यांनी सोमवारी रात्री पारनेर तालुक्यातील … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीच्या तनपूरे काऱखान्यासंबंधी जिल्हा बँकेचा मोठा निर्णय

Ahmednagar Breaking: राहुरी तालुक्यातील डॉ. बी. बी. तनपुरे सहकारी साखर कारखाना २०२२-२३ या गाळप हंगामासाठी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या हंगामात हा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्ज थकल्याने या कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा आहे. कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने येत्या गाळप हंगामासाठी कारखाना … Read more

नगरपालिकांतील ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर

Ahmednagar News:राज्यातील ९२ नगरपालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आज झेलल्या सुनावणीत पुढील पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर पडला आहे. या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केले जाणार असल्याच्या सूचनाही नयायलयाने दिले आहे. पुणे, सातारा, … Read more

Ahmednagar Crime : शेवटी नशीब ! गाडी पंक्चर झाल्याने लिप्ट घेतली मात्र मृत्यूने गाठलेच

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar Crime : एखादी घटना घडल्यानंतर आपण नेहमी एक वाक्य उच्चारतो ते म्हणजे शेवटी त्याच्या नशीबातच ते होते. मात्र याचा काल प्र त्यय आलाच…तो असा पती पत्नी आपल्या दुचाकीवरून नगरला निघाले मात्र रस्त्यातच त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांना एका तरूणाने लिप्ट दिली. मात्र भरधाव वेगातील आयशर टेम्पोने या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत या … Read more

Ahmednagar Breaking : गुप्तधनाच्या अमिषाने जिल्ह्यातील ‘त्या’ गडावर पुन्हा केले उत्खनन…!

Ahmednagar Breaking :आजही अनेक जुने वाडे,गढी या भागात गुप्त धन असल्याच्या अमिषापोटी अनेकदा अशा ठिकाणी बळी देणे, रात्रीच्यावेळी काहीतरी जादूटोणा करून गुप्तधन मिळवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याच्या घटना घडत आहेत. मात्र चक्क किल्ल्यावरच गुप्तधनाच्या अमिषाने उत्खनन केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील पेडगाव येथील बहादुर गडावरील भग्नावस्थेत असलेल्या हमामखान्यात अज्ञातांनी गुप्तधनासाठी अनेक वर्षानंतर पुन्हा उत्खनन … Read more

Ahmednagar News : रात्रीच्या वेळी अंधारात चोर – पोलिसांचा सिनेस्टाईल २५ किमीचा थरार …!

Ahmednagar News : पोलिसांनी फ्रिजचे दुकान फोडून दोन डि फ्रिज चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा सुमारे २५ किलोमिटर सिनेस्टाईल पाठलाग करून एका आरोपीला जेरबंद केले. तर इतर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी परिसरात घडली. राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड राज्य महामार्गावर खंडोबा मंदिराशेजारी शितल नावाचे फ्रिजचे दुकान आहे. काल पहाटे … Read more

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज म्हणतात प्रेम करा पण…

Indurikar Maharaj : प्रत्येक माणूस संपत्तीच्या मागे धावू लागला आहे. माणसाला पैसा संपत्तीचा मोह आवरत नाही, परंतु जीवनामध्ये पैसा, संपत्ती कामाला येत नाही तर माणुसकी कामाला येते. त्यामुळे पैशावर नव्हे तर माणसावर प्रेम करा असे मत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील एका काल्याच्या कीर्तनात जनसमुदायाला मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराज म्हणाले, मोबाईलमुळे आपापसातील … Read more

महागाईचा वणवा भडकला …! मेथी, कोथींबिर ५० जुडी तर गवार, हिरवी मिरची १०० रूपये किलो

Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध भागातून भाजीपाल्याची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात कमी अधिक पाऊस होत असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी आवक घटून शहरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात प्रामुख्याने मेथी, कोथींबिर ५० तर वांगी ६०, गवार, हिरव्या मिरचीने शंभरी पार केली आहे. सध्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरलेला असून अनेक … Read more