Ahmednagar News : राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर तांबे यांची टीका…! काय म्हणाले…

Ahmednagar News : तब्बल बारा वर्षापासून शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती बंद आहे. राज्यात विविध विभागाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकीकडे असे असताना नोकर भरती करणे गरजेचे असताना ते करण्याऐवजी सरकारने गोविंदांना शासकीय नोकरी देणे म्हणजे राज्यातील सर्व बेरोजगारांची केलेली चेष्टाच आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे म्हणाले … Read more

आठवलेंचे शिर्डीत पुन्हा स्वागत करणार का? विखे पाटील म्हणाले…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थात यासाठी त्यांची संपूर्ण मदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे आठवले यांच्या या इच्छेसंबंधी काय वाटते? त्यांचे स्वागत करणार का? या प्रश्नाला खासदार डॉ. विखे पाटील यांनी … Read more

नगर-मनमाड महामार्गावर खड्डे, आता होणार हा उपाय

Ahmednagar Manmad Highway: रुंदीकरणाचे काम अर्धवट पडल्याने अत्यंत खराब झालेल्या नगर-मनमाड महामार्गासंबंधी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तात्पुरता का होईना खड्यांपासून दिलासा मिळणार आहे. या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येणार असून त्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे … Read more

रोहित पवारांचा सिसोदिया यांना पाठिंबा, म्हणाले…

Ahmednagar News:दिल्ली सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयकडून कारवाई सुरू असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. सिसोदिया यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सोशल मीडियात मोहीम सुरू झाली आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘खोटे आरोप करून आणि सीबीआयचे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून … Read more

Ahmednagar Flyover : उड्डाणपुलावरील त्या फलकासाठी खासदार विखेंचा फोन, पुढे काय झाले?

Ahmednagar Flyover :अहमदनगरच्या उड्डाणपुलावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे एक फलक लावला आहे. त्यानुसार उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांना फोन करून फलक काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला आहे. यासंबंधी विखे … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये दहशतवाद्याला अटक !

Ahmednagar News : पंजाबमधील अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाखाली स्फोटके ठेवून पसार झालेल्या तिघा दहशतवाद्यांपैकी एकाला शिर्डीत अटक करण्यात आली. नगर जिल्हा पोलिस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकाने ही कारवाई केली. पकडलेला आरोपी रजेंदरकुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी (रा. पट्टण तहसील, जि. तरणतारण, पंजाब) याला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी … Read more

Ahmednagar News : अधिवेशनात मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर जिल्हा घोषित करावा !

Ahmednagar News

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हायातील उत्तर भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला गैरसोयीचे ठरते. तथापी नगर जिल्हा विभाजित करून संगमनेर जिल्हाची निर्मिती करून अदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी न्याय्य मागणी आता राज्याचे नवे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

पोषण आहार देणाऱ्यांचेच आर्थिक कुपोषण ..! तब्बल ३ कोटी ८८ लाखांचे मानधन थकले

Ahmednagar News: मुलांचे शारीरिक पोषण व्हावे ते कुपोषित राहू नयेत म्हणून शासनाकडून त्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्न भोजनाचा पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचेच तब्बल ३कोटी ८८ लाख रुपयांचे मानधन थकले असून, यामुळे स्वयंपाकी व मदतनिस यांचेच आर्थिक कुपोषण झाले आहे. या प्रकरणी जि.प.सदस्य आणि भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा … Read more

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिविगाळ : भाजप तालुका उपाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News:न विचारता वीज बंद केल्याच्या कारणातून नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांना दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम भास्कर भांड यांनी फिर्याद दिली आहे. नाथकृपा इंडस्ट्रीजचे मालक विजय संपत दरकुंडे व राजेंद्र पाराजी … Read more

मच्छर मारायला आले अन भरदिवसा घर साफ करून गेले …!

Ahmednagar News: आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत.तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. त्यासाठी तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो. असा बनाव करून चार-पाच चोरट्यांनी घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू हे … Read more

अहमदनगरच्या उड्डाणपुलावर झळकला नामफलक, कोणी दिले नाव?

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, या पुलाला नाव कोणाचे द्यायचे, यावरून पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशातच या पुलावर एक नामफलक लावण्यात आल्याचे दिसून आले. “श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणू पूल, प्रेरणा प्रतिष्ठान अहमदनगर” अशा नावाचा फलक पुलावर लावण्यात आला आहे. फलकावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज … Read more

जवानाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजीनेही सोडले प्राण

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील जवान सचिन रामकिसन साळवे (वय ३३) यांचा आसाममधील गुवाहाटी येथे कर्तव्यावर असताना बुधवारी मृत्यू झाला. याची माहिती गावाकडे कळविण्यात आली. या धक्क्याने त्यांची आजी (आईची आई) गंगूबाई सुखदेव जगधने (वय ७०) यांचे निधन झाले. आजीवर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले असून जवान सचिन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. … Read more

Kalyan-Visakhapatnam National Highway । अहमदनगर जिल्ह्यातील ह्या २७ शेतकऱ्यांना मिळणार ४ कोटी २६ लाखांचा मोबदला

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख रुपये ! खासदार सुजय विखे म्हणाले… शहरातून जाऊन पुढे पाथर्डी तालुक्यांतून जाणाऱ्या कल्याण -विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या या तालुक्यातील ७ गावांतील २७ शेतकऱ्यांना ४ कोटी २६ लाखांचा जमिनीचा मोबदला मिळणार आहे. बुधवारी १७ऑगस्ट पर्यंत २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचावरच केला रानडुकरांनी हल्ला

Ahmednagar News:नगर तालुक्यातील ससेवाडी येथील सरपंच चांगदेव बाबासाहेब ससे यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे गावात घबराटीचे वातावरण आहे. सरपंच ससे व माजी सरपंच दत्तात्रय जरे त्यांच्या शेतातील कांद्याच्या रोपाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे अचानक रानडुक्कर आले. रानडुकराने सरपंच चांगदेव ससे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये … Read more

शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय ! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी.मधून मोफत प्रवास, १० लाखाचे विमा संरक्षण आणि…

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च … Read more

Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे संगमनेर … Read more

Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या … Read more