जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम ! जाणुन घ्या गेल्या चोविस तासांतील रुग्णवाढ…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1544 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकींग: पुण्यातून अपहरण झालेल्या ‘डुग्गू’ च्या मावशीचा अहमदनगरमध्ये अपघाती मृत्यू

Ahmednagar Breaking: Aunt of 'Duggu' abducted from Pune dies in accident in Ahmednagar

पुणे शहरातून काही दिवसांपूर्वी अपहरण झालेला चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण पुनावळे परिसरात बुधवारी दुपारी सुखरूप मिळाला आहे. त्याला भेटण्यासाठी नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या त्याच्या मावशी चा बुधवारी रात्री अहमदनगर-औरंगाबाद रोडवर इंद्रायणी हाॅटेलजवळ अपघाती मृत्यू झाला. सुनीता संतोष राठोड (वय ३६ रा. कापुस वसाहत केंद्र, नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ! जिल्‍ह्यातील नारी शक्‍ती…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  केंद्र शासनामार्फत दरवर्षी 8 मार्च आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाचे औचित्‍य साधुन नारी शक्‍ती पुरस्‍कार प्रदान केले जातात. राष्‍ट्रासाठी उत्‍कृष्‍ट कामगिरी करणा-या महिला / संस्‍था तसेच समाजासाठी केलेल्‍या योगदानाची दखल घेऊन अशा महिला / संस्‍था यांना हा पुरस्‍कार प्रदान केला जातो. महिला / स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या … Read more

श्रीगोंद्यातील ‘त्या’ सरपंच पदावर अपात्रतेची टांगती तलवार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी गावच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असल्यामुळे आश्विनी अजित पवार या एक महिन्यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या. पण त्याच्याकडे प्रत्यक्ष जात प्रमाणपत्र नाही. फक्त नाशिक येथे प्रकरण दाखल करून पावतीच्या आधारे सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. मग अशी सरपंच निवड योग्य आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला. … Read more

डुकरांच्या उच्छादामुळे शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस; ग्रामस्थही हैराण

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे डुकरांनी उच्छाद मांडला आहे. डुकरांनी ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या झाडांसह आजुबाजुच्या शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस केली आहे. या नासधुसीमुळे गावकऱ्यांसह बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीने गावठाण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड केली आहे. गावातील डुकरांनी या लागवड केलेल्या … Read more

ट्रकचा अपघात करून चालकानेच मालासह ट्रक दिला पेटवून…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ट्रकवरील चालक किसन साहेबराव वाघ याने आपल्या ताब्यातील लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केला. तसेच गाडी रोडचे खाली गेल्यावर आग लावून सदर गाडीचे नुकसान केले. हा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीजवळ घडला आहे. या प्रकरणी आरोपी चालक किसन साहेबराव वाघ याच्या … Read more

धक्कादायक ! जुन्या वादातून कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला… या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन लाठ्या-काठ्या कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव … Read more

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पीडितेने म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख … Read more

अखेर ‘त्या’तरुणाचा बळी घेणाऱ्या दोन्ही सावकारांची ‘धरपकड’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  २० हजाराच्या कर्जापोटी सावकारांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील राजापुर या गावातील एकाने आत्महत्या केल्यानंतर येथील दोघा सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील दुसऱ्या सावकाराची देखील ओळख पटली असून सुदाम देविदास दुधे आणि बालकिसन हनमंत खंडेलवाल अशी अटक केलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत. सकाळी पावणे सात वाजण्याच्या … Read more

आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ‘तेवढेच’ काम शिल्लक आहे आमदार विखे पाटील यांचे टीकास्त्र

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या कॉँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या … Read more

अरे देवा : लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या गुरुजीस लुटले!

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका शिक्षकास लघुशंका करण्यासाठी थांबणे चांगलेच महागात पडले आहे. कारण राहुरी कृषी विद्यापीठ नजिक नगर-मनमाड महामार्गावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका प्राथमिक शिक्षकाला मारहाण करून दुचाकीसह पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बजरंग तुकाराम … Read more

१५ वर्षापासून फरार असलेल्या सुरेशच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- ३८ वर्षापूर्वी दाखल दरोडयात गुन्ह्यात शिक्षा लागलेल्या व उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद) येथे अपीलामध्येही शिक्षा कायम झालेला व १५ वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरेश महादू दुधावडे (रा. बाडेगव्हाण ता. पारनेर जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुरनं. … Read more

शिक्षक रस्ता चुकले मग पुढे काय झालं ते वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  नगर येथील शिक्षकाला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ जवळ मारहाण करत मोटार सायकल व मोबाइल पळविल्याप्रकरणी अज्ञात रस्ता लूटारुंविरोधात बुधवार दि 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर येथील शिक्षक बजरंग तुकाराम बांदल (वय ४६ राहणार प्रेमदान हडको, सावेडी हे ) रात्री शिंगवे नाईक येथे … Read more

राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाल्याबद्दल कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जगप्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना आज राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल झाला आहे. याबद्दल प्रभाग पाच व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने अंबिका माता मंदिर येथे महाआरती, पेढे वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाग पाचचे प्रमुख विकी … Read more

भर दिवसा घरात घुसून तलवारीने तुफान हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथील पिंपळे वस्ती याठिकाणी, तलवारी, कुऱ्हाडी,लाकडी दांडे, व गजा काठ्यांनी तुफान हाणामारीची घटना घडली आहे. पिंपळे यांच्या येथे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतांना औरंगाबाद येथून आलेल्या एम एच २० डी व्ही ७३३० व एम एच १२ एच व्ही ९२४२ गाडीतून आलेल्या, अंदाजे २४ ते २५ जणांनी, … Read more

नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, आमदार निलेश लंकेंचा दावा; शिवसेनेने दिली चांगली लढत….वाचा सविस्तर पारनेरचा निकाल

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कर्जत पाठोपाठ पारनेरची निवडणूकही गाजली आहे. पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना असताना बहुमत कोणालाही मिळाले नसून, चुरशीच्या लढतीनंतर तेथील राजकीय स्थिती त्रिशंकू झाली आहे. राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, शहर विकास आघाडीला दोन, भाजप आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तिथे आमदार निलेश लंके … Read more

आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :– श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील आगारातून बस सुटलीच नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  शासकीय विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी तालुक्यातील आगारांतून एकही बस धावली नाही. जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. त्यांमुळे खासगी वाहनाचे चांगलेच फावले आहे. मागील अडीच महिन्यांपासून एसटी … Read more