दोन दिवस दोन मंदिरात केली चोरी अन मुद्देमाल विक्रीसाठी निघाले अहिल्यानगरला मात्र पोहोचले भलत्याच ठिकाणी

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवादी येथील महालक्ष्मी मंदिरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवीच्या मंदिरात चोरी करून देवाचे दागिने विक्री करण्यासाठी काळया रंगाच्या फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच ०४-एचएफ१६६१) मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे चोरट्यांची टोळी चालली होती. मात्र पोलिसांना याबाबत आगोदरच माहिती मिळाल्याने अहिल्यानगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर … Read more

दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे ! थोरातांच विखे पाटलांनी सगळंच बाहेर काढलं….

आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलन जीवी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात … Read more

कोपरगावमध्ये भीषण अपघात! नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला

कोपरगाव येथे भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून मोठा अपघात घडला आहे. या घटनेत सुनंदा साबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव … Read more

अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

श्रीरामपूरकरांसाठी ‘गुड न्यूज’ ! नागरिकांची ‘हि’ समस्या येणार संपुष्टात ; सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे नियोजन,अशी असेल प्रस्तावित योजना

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास … Read more

दमबाजी करत बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन मागितली एक कोटींची खंडणी ; ‘खोक्या’च्या साडूने…

११ मार्च २०२५ पाथर्डी : बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात आजिनाथ सावळेराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

सामूहिक शुभमंगल योजना ; आता लग्नासाठी जोडप्यांना मिळणार अनुदान,रक्कम असेल…

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे. सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक … Read more

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ घटनेच्या फिर्यादीचा अपघाती मृत्यू ; संशयास्पद प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात … Read more

शिर्डी विमानतळासाठी मिळणार ‘एवढा’ निधी ; सुरु होणार ‘या’ नव्या सुविधा

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार ३६७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शिवाय लवकरच नाईट लँडिंग व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शिर्डी व … Read more

शिर्डी तीर्थक्षेत्राला विशेष निधी मिळण्यासाठी जगताप दाम्पत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

११ मार्च २०२५ शिर्डी : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा … Read more

शिर्डीत पनीर भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

११ मार्च २०२५ साकुरी : शिर्डी व परिसरात लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जेवणावळींसाठी पनीरला मोठी मागणी आहे. हॉटेल, ढाबे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते; मात्र वाढत्या मागणीमुळे हलक्या दर्जाचे आणि बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या हलक्या … Read more

अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. … Read more

शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील लागणार मार्गी : आ.हेमंत ओगले

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील … Read more

शिर्डीतील गर्दी घटली ! साईभक्त का होत आहेत दूर? भाविकांमध्ये चिंता वाढली

देशभरातील प्रमुख २१ तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी वाढत आहे, मात्र शिर्डीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिर्डीतील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर … Read more

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या … Read more

संगमनेर-पारनेर MIDC ते आश्वी अपर तहसील प्रस्तावाला विरोध ! आमदार तांबे विधान परिषदेत…

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यांचा औद्योगिक विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मोठी एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) उभारावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली. संगमनेर-पारनेर औद्योगिक हब संगमनेर आणि पारनेर तालुके हे पर्जन्यछायेतील दुष्काळी भाग आहेत. तरीही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला आहे. … Read more

शिर्डी-सिन्नर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप, मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही

Shirdi-Sinnar Highway : शिर्डी-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग (NH-160) चे काम अंतिम टप्प्यात असताना, झगडे फाटा येथे उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. मात्र, त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. जर लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्यात आली नाही, तर महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी … Read more

एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!

विळद, तालुका नगर येथील नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात नामदार उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आज उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे सदर बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार काशिनाथ दाते, डॉ. सुजय विखे पाटील, … Read more