उपाशी मरण्यापेक्षा परिवारासाठी कोरोना होऊन मेलेले बरे असे वाटत आहे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव शहर सोमवारी होणारा जनावरांचा आठवडे बाजार कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असून आता त्याचा फटका व्यापारी वर्गाबरोबर शेतकरी, गाय पालन, म्हैस खरेदी-विक्री व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक, कुक्कुटपालन, शेळीपालन करणाऱ्यांबरोबर बाजारात छोटे-मोठे धंदे करणाऱ्यांना बसला आहे. शासनानाने याची गांभीर्याने दाखल घेत बाजार सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा बेलदार … Read more

कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पणन संचालकांची परवानगी न घेता श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकऱ्यांनी काही कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट दिल्याची तक्रार संचालक सचिन गुजर यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र, या कालावधीत त्यांनी आपल्या मर्जीतील … Read more

शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मालुंजे येथे … Read more

५३ लाखांच्या गुटखाप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे मंगळवारी पोलिसांनी सुमारे ५३ लाख ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरात कलिम सय्यद यांचे शेतातील पत्र्याच्या गोडावूनमध्ये आयशर कंपनीचा टेम्पो (जीए ०७ एफ ३१००) व अशोक लेलंड कंपनीच्या छोटा टेम्पोतून … Read more

हृदयद्रावक घटना …व्यसनाधीन बाप प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना शुक्रवारी  घडली. व्यसनाधीन बाप अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली.   लोणी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या लोमेश्वरनगर वसाहतीमध्ये राहणार्‍या शुभम अनिल चव्हाण (वय 20) हा तरुण त्याच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला पन्नास हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, … Read more

आज ७७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज आतापर्यंत ४५ हजार ३८२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३५ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५२५ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, … Read more

कोरोना उपचार, प्रतिबंधासाठी पहिल्याच बैठकीत दहा लाखांचा निधी संकलित

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचार व प्रतिबंधासाठी अकोल्यात सामाजिक योगदान अभियान सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच बैठकीत अगस्ती साखर कारखान्याच्या काही संचालकांकडून आशा कर्मचाऱ्यांना भाऊबीज म्हणून भरीव आर्थिक मदत व मास्क, सॅनिटायझर, तसेच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा बँकेेचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहेत. औषधे व आवश्यक साधने … Read more

चोवीस तासांत झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शुक्रवारी दिवसभरात आणखी ५१५ रुग्ण आढळून आले, तर बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ७७१ झाली आहे. नऊ दिवसापूर्वी जिल्ह्यात बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला. साडेसहा महिन्यांत रुग्णांची संख्या ४९ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन शिक्षकांपाठोपाठ ‘त्या’ चहा विक्रेत्यानेही केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय ७५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली. बेलापूर रोडलगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत 511 ने वाढ … Read more

मोठी बातमी : एमपीएससी परीक्षा पुढे ढककली, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे सरकारकडून सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या … Read more

पोलिसांनी ‘या’ वसाहतीत छापा मारत जप्त केले 800 किलो गोमांस

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली असल्याने अनेक दिवस जनावरांची तस्करी होण्याचे प्रकार थांबले होते. मात्र आता वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्याने गोवंश जनावराची तस्करीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. संगमनेर शहरातील जमजम वसाहतीमध्ये शहर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा मारत 800 किलो गोमांस, पाच जर्सी वासरे आणि … Read more

तिच्या तक्रारीला पोलीस, तहसीलदार न्याय देईना… शेवटी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा स्वतःवर अन्याय झाला कि आपण प्रथम न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढतो. मात्र हे करूनही जर न्याय मिळणार नसले तर शेवटी एकच पर्याय राहतो तो म्हणजे उपोषण… स्वत्तःचीच जमीन मिळवण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील वयोवृद्ध महिलेवर आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही महिला आजपासून (शुक्रवार … Read more

पालिकेतील 60 कामगारांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार, नौकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. यामुळे अनेक जण अद्यापही घरी बसून आहे. मात्र आता श्रीरामपूर पालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 कामगारांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांनी अचानक कामावरून काढले. या निर्णयामुळे कामगार संघटना आक्रमक झाली आहे. काढलेल्या कामगारांवर बेरोजगारीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप पदाधिकाऱ्यास मोका कायद्यान्वये अटक आणि…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१ )यास धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला पाच वर्षांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती … Read more

शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचे सात लाख झाले खाक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतांमधून महावितरणच्या विजेच्या मोठं मोठ्या वीजतारा गेलेल्या असतात. यामुळे अनेकदा अपघात घडत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत असतो. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने, शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची … Read more