अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ‘इतक्या’रुग्णांना मिळाला डिस्चार्ज वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ८५८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३८०५ इतकी आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३६, … Read more

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी … Read more

कोपरगाव उपनगराध्यक्ष पद ; झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. योगेश बागुल यांना एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले. यांची मुदत ३१ जुलैला संपली होती. त्यानुसार त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यधिकारी सुनील … Read more

वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा; आंदोलनाच्या माध्यमातून केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या दरदिवशी आंदोलने सुरु आहे. प्रलंबित प्रश्न, विविध मागण्या, निदर्शन, निवेदन यासाठी आंदोलनाचा सपाटा सध्या जोरात सुरु आहे. त्यातच आहे नेवाशामध्ये वाघ्या – मुरळी आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा,’ यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्र राज्य वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे नेवासे येथील खोलेश्वर गणपती चौकात जागरण-गोंधळ घालून … Read more

‘त्या’ कारागृहात पुन्हा झाला कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. नव्याने दोन कैदी पाॅझिटिव्ह आढळले. यापूर्वी २१ जणांना २९ व ३० जुलैला बाधा झाली होती. दरम्यान, गुरुवारी तालुक्यात २४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७० झाली. १४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने १८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील १२७ गावांपैकी ११० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वाधिक ३२३ … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८२० रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ४९ हजार १६७ झाली. बळींची एकूण संख्या ७५९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३०, खासगी प्रयोगशाळेत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा २६, अकोले १८, जामखेड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारची काच फोडून ३५ लाखांचे दागिने लुटले..वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या मोटारीच्या काचा फोडून या मोटार गाडीत ठेवलेल्या तीन सोन्या-चांदीच्या बँगा अज्ञान सहा पळविल्या. गुरूवारी संध्याकाळी ७ ते ७.१५ या कालावधीत ही घटना घडली असून या बँगमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३०ते ३५लाख रूपयाचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे या सराफ व्यावसायिकाने सांगितले. लोणी खुर्द या गावात … Read more

घरात कोणी नसल्याचे पाहत त्याने तिचा हात धरला व केले असे काही

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महिलांच्या विषयावरून सध्या देशभर संतापाची लाट उसळली आहे. तरीही दरदिवशी महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर येथील तरुणाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ५ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८२० ने वाढ … Read more

इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनीने नदीत उडी मारत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन एका तरुणीने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. पूजा रमेश औताडे (वय २६,वर्ष) असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

या तालुक्यात कोरोना झाला पुन्हा सक्रिय

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण कमी झाले होते, मात्र गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी काहीश्या प्रमाणांत वाढली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या ४८ तासात १५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच गेल्या ४८ तासात ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यानं घरी सोडण्यात … Read more

दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेला मिळाली गती

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून पालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पहिल्या प्रकल्पाच्या लाभार्थींसाठी केंद्र व राज्य सरकारचे दोन कोटी 78 लाख तसेच घरकुलाच्या दुसऱ्या प्रकल्पाच्या लाभार्थींसाठी राज्य सरकारचे चार कोटी 3 लाख रुपये, असे एकूण सहा कोटी 81 लाख रुपये अनुदान वर्ग झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७३९ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६०, … Read more

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या तन्मयची यशस्वी कामगिरी; आयआयटीत …

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-आय.आय.टी. च्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा मनाची मानली जाते. या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागतात. या परीक्षेत श्रीरामपूरच्या तन्मय मारुती वाघ या विद्यार्थ्याने संपूर्ण भारतात इतर मागास प्रवर्गातून 2224 वी व जनरल मधून 11254 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. … Read more

शिर्डी विमानतळासाठी जमिनी दिल्या अन आता त्यांना विमानतळावरील कामावरून काढले

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीमध्ये विकास व्हावा तसेच साईभक्तांच्या सोयीसाठी जे विमानतळ झाले त्यासाठी काकडी येथील शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या होत्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या व इतर आश्वासने दिली होती. त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍याही दिल्या पण त्या कंत्राटी स्वरूपाच्या. आणि आता या कमावरूनही 21 कर्मचार्‍यांना अचानक कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची … Read more

‘त्या’ गुटख्याचे राहाता कनेक्शन

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान त्याला माल पुरवठा करणार्‍या राहाता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा व वैभव शांतीलाल चोपडा या दोघा चुलत्या … Read more

अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील खडकाफाटा येथे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. पोलीस पाटील सुभाष अंबादास भांगे (वयः 40 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर घटना दि.5 ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांगे हे इंडीयन ऑईल पेट्रोल पंपावर … Read more

अनेक गावांना जोडणारी जलवाहिनी रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा रस्त्यांची दुरुस्ती करताना पाण्याची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार नगरकरांना परिचित आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा अकोले तालुक्यात घडला आहे. मात्र जलवाहिनी फुटल्याने अनेक गावांना याचा फटका बसला आहे. गाव पाणी योजना पाईप लाईन रस्त्याच्या ठेकेदाराने उध्वस्त केल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनी ठेकेदाराचे कान टोचत भविष्यात चुका होणार नाही, … Read more