सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संपूर्ण जगभर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जीवघेण्या वेगाने वाढत असून मोठ्या प्रमाणात राज्यासह देशातही कोरोनामुळे बळी जात आहेत. अशा संकटकाळी तरी राज्यात कोरोना विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही. सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरवले पाहिजे. राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे. आजच्या … Read more

क्वारंटाइन कालावधी संपताच युवती प्रियकराबरोबर ‘सैराट’ !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- मोठ्या शहरामध्ये नोकरीला असलेली एक युवती काेरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी आली. तिला गावातील प्राथमिक शाळेत असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर या युवतीला घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही युवती आपल्या प्रियकराबरोबर निघून गेली. उक्कलगाव परिसरातील ही युवती मोठ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: धक्कादायक….अजून चार जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. ही महिला एका नगरसेविकेच्या कुटुंबातील आहे. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी … Read more

भाजप जिल्हाध्यक्षांच मानसिक संतुलन ढासाळलं !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांनी ना. बाळासाहेब थोरात साहेबांवरती टीका करणं हे त्यांचं मानसिक संतुलन ढासाळल्याच दाखवतं. अरुण मुंडे यांनी ना. थोरात यांच्यावर केलेल्या टीकेला नगर शहर कॉंग्रेसचे नेते किरण काळे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ना. थोरात यांनी भाजप बाबत केलेल वक्तव्य माग घेऊन माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी … Read more

1 जूनपर्यंत अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री … Read more

संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे?

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, … Read more

अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील माका येथील तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील पसार आरोपीला सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सापळा रचून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माका येथील तरुणीशी प्रेमसंबंध संबंध वाढवून तिच्यासोबत तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. याबाबत तरुणीने फिर्याद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘येथे’ 14 दिवस लॉकडाऊन, 21 व्यक्तींना रुग्णालयात उपचारार्थ केले दाखल !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने व आणखी एकजण कोरोना बाधित झाल्याने गावात चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधितांच्या संपर्कातील २१ व्यक्तींना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, … Read more

क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड  यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना घडल्यामुळे त्यांच्या परिवारासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानुसार शहरात विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावेत या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी बैठकीस खा.सदाशिवराव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन मध्ये, २२ मेपासून व्यवहार सुरू करता येणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक २२ मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.अर्थात, जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे … Read more

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंचायत समितीच्या सभापतींचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय संभाजी बोऱ्हाडे (वय-५५,रा, केळी -ओतूर,ता.अकोले) यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील सातेवाडी गणातून ते पंचायत समिती वर निवडून गेले होते.भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या गावी विहिरीचे काम सुरू होते.काम पाहण्यासाठी सोमवारी दुपारी ते विहिरीत उतरले होते, यावेळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातही लवकरच सुरु होणार दारू घरपोहच !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने करोनाचा धोका होण्याची भिती व्यक्त होऊ लागली. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूर शहरातील  ईश्वरी आनंद बावीस्कर या १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेतला. सूतगिरणी भागात राहात होती व भि. रा. खटोड कन्या विद्यालयात शिकत होती. तिला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. ईश्वरी आठवीतून नववीच्या वर्गात गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू … Read more