सर्वात मोठी बातमी : आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास परवानगी !

अहमदनगर :-  दुकानदारांसाठी आणि व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बातमी आज आलीय, आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. देशभरात लॉकडाऊनमध्ये  केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर … Read more

रमजानवर कोरोनाचे सावट, मुस्लिम बांधवांना घरात साजरा करावा लागणार रमजान

अहमदनगर :-  रमजान महिना आजपासून सुरु होत आहे. या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना घरात राहूनच हा सण साजरा करावा लागणार आहे. नगरमध्ये रमजान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधव तीस दिवस रोजे ठेवतात. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याची पंधरा दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात येते. यंदा मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे. मुकुंदनगर व … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक, २६ दिवसांत २४ रुग्ण झाले ठणठणीत …

अहमदनगर :-  जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. गेल्या २६ दिवसांत २४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये १२ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणखी चार रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, गुरुवारी रात्री जामखेडमध्ये कोरोनाचा आणखी एक, तर शुक्रवारी दोन रुग्ण आढळून आले. त्यामुळे जामखेडमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियरचा पाण्यात बुडून मृत्यु

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियर राजू मुरलीधर घोडके यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात पुतणी संस्कृती घोडके (वय ७). हीला डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने ती बचावली. मात्र, राजू घोडके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २८ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालया आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. तसेच आज आणखी १४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आज निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये … Read more

होय ! आता वेळ बदललीय : फेसबुक म्हणतेय अहमदनगर Live24 नंबर 1

???? होय ! आता वेळ बदललीय ! ????‍♂️ फेसबुक म्हणतेय अहमदनगर Live नंबर 1 ???? कोरोना व्हायरस तसेच अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाउन व ब्रेकिंग न्यूज चे वेगवान अपडेट्स दिल्याने गेल्या सात दिवसांत अहमदनगर Live24 चे फेसबुक पेज नंबर 1 ???? अहमदनगर Live च्या फेसबुक पेजला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक नेटीझन्सने पसंती दिली असून ???? गेल्या सात दिवसांत पेज Engagement 3,33,333 हून अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 2 व्यक्ती कोरोना बाधीत ,अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण @ 40!

अहमदनगर :- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०२ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. बुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. … Read more

आनंदवार्ता: जिल्ह्यातील आणखी 4 रुग्ण आता कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 :-  पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून ०४ जणांचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या रुग्णासह २४ रुग्णांना … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

कोपरगाव : शहरातील सुभाषनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मुजाहिद मज्जीद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सुभाषनगर येथील आरोपी योगेश संजय शिंदे, संजय रामभाऊ … Read more

मॉर्निंग वॉकला गेले आणि दंड भरून आले ….

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे शिर्डी पोलीस … Read more

जिल्हा बॅँकेची बदनामी केली तर ….वाचा काय म्हणतात बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर

अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत. बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील … Read more

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या असा झाला पसार बातमी वाहून तुम्हालाही बसेल धक्का …

संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील भोरमळा येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या गज वाकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकलापूर शिवारातील भोरमळा याठिकाणी तेजस मधे यांनी प्रताप भोर यांची शेती वाट्याने केली आहे. शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान ते कांद्याला पाणी भरत होते. यावेळी त्यांच्या जवळ … Read more

वाटसरू महिलेची सुखरुप प्रसूती

खरवंडी : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूती केल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली येथून वागत (जि. यवतमाळ) पायी जात असताना वडाळा बहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. … Read more

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

नेवासा :- तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती, सासरा, सासूसह पाच जणांवर गुन्हा नोंदवला. मिराचा मृतदेह विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळला होता. तिचे माहेर व सासर गावातीलच आहे. मीराचे वडील हरी भिका गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत विहीर खणण्यासाठी माहेरून दीड लाख रूपये आणावेत, यासाठी मीराचा छळ करण्यात आल्याचे नमूद केल्याने पाेलिसांनी … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द येथे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी प्रकाश तुळशीराम गिते (वय ४६) यांच्यावर बिबट्याने sangहल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी प्रकाश गिते हे प्रवरा उजव्या … Read more

प्रवरेतून पाण्याची उधळपट्टी का?

अहमदनगर Live24 :- प्रवरा नदीचे तब्बल चाळीस दिवस चाललेल व पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणीवापर झालेले असताना लगेच तिसऱ्या दिवशी आवर्तन कशासाठी व पाण्याची उथळपट्टी का असा सवाल भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी धरण लाभक्षेत्रात भरपूर पाऊस झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला,जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ३८ !

अहमदनगर :- जामखेड येथे काल कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५ ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. काही दिवसापूर्वी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील श्रावणबाळ ! ८० वर्षांच्या आईला घेऊन निघाला गावाला

संगमनेर :- सध्या जगभरात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. देशात व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता लहान-मोठे उद्योगधंदे तसेच वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ निर्माण झाली आहे. अशातच एक मुलगा आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला तीनचाकी … Read more