राज्य कोरोनाशी लढतंय अन भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय !

अहमदनगर Live24 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात राज्यपाल नियुक्त सदस्यत्व देण्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. कोरोना’च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा बालकावर हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील सुकेवाडी महादेव वस्ती येथे शेतात आईच्या पाठीमागे पायी चाललेल्या 6 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सुनील नामदेव चव्हाण (वय 6) असे जखमी बालकाचे नाव आहे. सुकेवाडी येथील महादेव वस्तीवर बबन मुरलीधर सातपुते यांच्या स. नं. 180 मधील पंडित क्षेत्रात रात्री 8 … Read more

कोरोनाचे राज्यात एकूण ४६६६ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ … Read more

महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू … Read more

ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट – आ. विखे पाटील

अहमदनगर – ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्‍तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्‍याने हे परिपत्रक मागे घ्‍यावे, आणि ऊस तोडणी मजुरांची आहे त्‍याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्‍या गाड्यांमधुन त्‍यांना गावी सुरक्षित पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. या … Read more

धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या रुग्णाची मुले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे.  जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात … Read more

ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण कोरोना बाधीत

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर आली आहे. जामखेड येथील काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या बाधीत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३१ झाली असून पैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या ‘त्या’ मोठ्या डॉक्टरांना अहमदनगर मध्ये केले दाखल !

अहमदनगर – श्रीरामपुरात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एका मोठ्या डॉक्टरांना आज नगर येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी हलविण्यात आले. याबाबत दुपारी विविध तर्कवितर्क आणि चर्चना ऊत आला होता. याबाबतची अधिक माहिती अशी की, नेवासा येथील एका पेशंटला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी तपासल्यानंतर सदर पेशंट नंतर कोरोनाग्रस्त असल्याचे रिपोर्टवरुन पुढे आले त्यामुळे श्रीरामपुरातील दोघा डॉक्टरांसह ८ जणांच्या स्रावचे नमुने तपासण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नाकातून व डाव्या कानातून रक्त बाहेर आले होते. मृताच्या शरीरावर गुलाबी फुलबाहीचा शर्ट, … Read more

गावाकडे पायी चाललेल्या महिलेची बँकेत झाली प्रसूती…

सोनई :- कोरेगाव भीमा येथे पोटापाण्यासाठी मोलमजुरी करणारे कुटुंब काम नसल्याने व खाण्याची भ्रांत निर्माण झाल्याने गर्भवती पत्नीसह यवतमाळ येथे पायी जात होते. त्यातील संदीप काळे यांच्या पत्नी निर्मला संदीप काळे (३२) या गर्भवती महिलेस वडाळा बहिरोबा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या वडाळा येथील शाखेत आडोशाला … Read more

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 :- नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ (वय ३०) या विवाहितेने रविवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी माहेरच्या लोकांनी छळ व मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. आज आणखी ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल काल पॉझिटिव्ह … Read more

अखेर ‘त्या’ अहमदनगरकरांनी कोरोनाला हरवलं !

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत. आज संगमनेर तालुक्यातील ०४ तर जामखेड येथील ०४ रूग्ण त्यांचा १४ दिवसानंतरचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त … Read more

अहमदनगर गुड न्युज : जिल्ह्यातील आठ रुग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 :- अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी आहे, अहमदनगर मध्ये  उपचार घेणारे आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता लवकरच त्यांची सुट्टी होणार आहे.  जामखेड येथील ०४ कोरोना बाधीत व संगमनेर शहरातील 3 आणि व आश्र्वी बुद्रुक येथील एक अश्या एकूण ८  रुग्णांचा १४ दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून  या आठ व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या … Read more

#Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी

अहमदनगर :- जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले. उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील … Read more

डॉक्टर्स फोनद्वारे देणार मोफत वैद्यकीय सल्ला

राहाता :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये किरकोळ व साध्या आजारांसाठी रुग्णांना प्राथमिक पातळीवरील औषधोपचार व वैद्यकीय सल्ला त्वरित मिळावा तसेच रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राहाता तालुक्यातील श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या सहा डॉक्टरांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. फोनद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांच्या वतीने डॉ.स्वाधिन गाडेकर यांनी … Read more

राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अहमदनगर :-  नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. अजीनाथ बाळासाहेब काळे (वय २९) असे सदर आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.राहत्या घरातील छताच्या लाकडी ओंडक्याला साडी बांधून त्याने गळफास घेतला. आत्महत्या केलेल्या युवकाच्या वडीलांनी घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सुधाकर काळे यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉटस्पॉटमधील लॉकडाऊन वाढविला

अहमदनगर :-  नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून १३ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटस्पॉट मधील लॉकडाऊन १९ एप्रिल ते २७ एप्रिलपयंर्त वाढविल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. या दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा ही २७ एप्रिलपयंर्त पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. नेवासा शहरात १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर प्रशासनाने शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय … Read more