गोवंश जनावरांची ४ हजार किलो कातडी जप्त

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर मनमाड मार्गावर राहुरी खुर्द शिवारात एका आयशर टेम्पोमधून गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळताच पथकाने छापा टाकून ४ हजार किलो गोवंशीय जनावराची कातडी व एक टेम्पो जप्त केला आहे. श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा … Read more

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ९ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर..!

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राज्य निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात नगर जिल्ह्यातील ९ नगरपालीकांचा समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनावर हरकती व सुनावणीची प्रकिया पार पडल्यावर याचा अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास पाठविणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहिर करणार आहे. साधारणपणे … Read more

कोपरगाव नगरपालिके समोर १६ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक वर्षांपासून पालीकेची घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे तब्बल १६ कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे आव्हान कोपरगाव नगरपालिकेच्या समोर आहे. करोनाचे कारण पुढे करीत काही नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून थकबाकी भरत नसल्याने अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आता मैदानात उतरले आहे. गोसावी यांनी कायद्याचा बडगा उगारला … Read more

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी ! आरतीच्या वेळेत झाला महत्वाचा बदल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जग विख्यात असलेले अहमदनगर जिल्हयातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यातच साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी … Read more

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या योजना मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. … Read more

साई मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल, जाणून घ्या कसे असणार नवे वेळापत्रक…….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-   शिर्डी संस्थानने साईबाबा मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल केला आहे. संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवे वेळापत्रक महाशिवरात्रीपासून म्हणजेच एक मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. एक मार्चपासून आरतीच्या वेळा पूर्ववत होणार असून, काकड आरती पहाटे सव्वापाच वाजता तर शेजारती रात्री दहा वाजता करण्याचा निर्णय … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; पाणी पातळी खालावली

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील, विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक सांगू लागले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील खैरदरा परिसरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून … Read more

धक्कादायक घटना ! नरभक्षक बिबट्याने घेतला महिलेचा जीव

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मेंढवण गावच्या बढे वस्तीवर घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हिराबाई … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली; शेतीच साहित्य नेले चोरून

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच चोरटयांनी विहिरीतून आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील दहेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नानासाहेब रामहरी गुंजाळ (रा. दहेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब गुंजाळ यांची … Read more

जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था: आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सध्या राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलेच टिकायुद्ध रंगल्याचे पाहायवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उडी घेतली असून, भाजप सत्तेविना पाण्याबाहेरील माशा सारखा अस्वस्थ झाला … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश ! उड्डाणपुलासाठी ३८ कोटी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघात प्रवण क्षेत्रच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली. मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 68 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

बिग मी इंडिया फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक करण्यात आले … Read more

महसूलमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश…नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलासाठी 38 कोटी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- नाशिक- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री सी.पी. जोशी यांच्याकडे ना. थोरात यांनी पाठपुरावा … Read more

फिरत होता लष्करी अधिकाऱ्याच्या रुबाबात; पोलीस समोर दिसताच त्याच्या झाल्या बत्त्या गुल, कारनामे पाहून पोलिसही चक्रावले

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- पैश्याची होती त्याला हौस पोलीस आणि अधिकाऱ्यांनी पकडल्यावर त्याची झाली धवस. त्या तोतया अधिकाऱ्याने अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. … Read more

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

ट्रकमधून कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका; दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका करून ट्रकसह 13 लाख 34 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी शाहरूख सादीक सय्यद (रा. माळीचिंचोरा ता. नेवासा), रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, घोडेगाव रोड ता. नेवासा) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भातोडी पारगाव (ता. नगर) … Read more