अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात कारणावरून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे. ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राधू कोकरे यांची पत्नी जनाबाई राधू कोकरे … Read more

क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन उपसरपंचाची धमकी!

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हंगे येथील उपसरपंचाने मला क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन अशी धमकी देत प्रशासनासोबत असहकार पुकारल्यामुळे महसूल प्रशासनापुढे मंगळवारी पेच निर्माण झाला. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतरही उपसरपंच व त्यांचे कुटुंबीय उशिरापर्यंत क्वारंटाईन झालेले नव्हते. हंगे येथील वृद्ध महिलेस कोरोना झाल्यामुळे मृत झाली. या महिलेचा हंगे … Read more

अखेर पाचपुते यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- श्रीगोंदे बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे मंगळवारी दिला. अविश्वास ठरावासंदर्भात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुलैला बैठक बोलवण्यात आली होती. अविश्वास ठराव संमत होणार अशी खात्री झाल्याने पाचपुते यांनी आधीच राजीनामा दिला. राजीनामा मंजूर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासात वाढले १६१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे. … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : सलग दुसर्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच काल आणि आज पुन्हा एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवसांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल तालुक्यातील बेलवंडी येथील एका तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाशी लढतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच … Read more

बिग ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह चौघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातही करोनाचा शिरकाव झाला आहे. श्री. राठोड यांच्यासह कुटुंबातील चौघांना करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही करोना रुग्ण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ५४ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज १३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ झाली आहे. आज मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२, अकोले ८, राहुरी ५ ,शेवगाव १, कर्जत १ यथील रुग्णांचा यात समावेश … Read more

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील हताश… म्हणाले मी एकटा पडलोय !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी … Read more

या कारणामुळे झाला ‘त्या ‘पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबापैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच शरीराकडून कोरोनाविरुद्ध उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. आठ दिवसापूर्वी सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या पती पत्नी … Read more

सुजित झावरे पाटील म्हणाले माझ्या सोबत स्पर्धा करा…

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या सन 2020 च्या आर्थिक नियोजनात सदर रस्त्याचा समावेश करून या रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एनएच-222 ते नागबेंदवाडी रस्त्याच्या कामाचा … Read more

महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळ्या चारत असलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी प्रकाश सुखदेव सांगळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिला शेळ्या चारत असताना सांगळेने विनयभंग केला. माझ्याकडे आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही दिली. महिलेने … Read more

धक्कादायक : आधी एकाशी लग्न नंतर पळून जावून…..

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डी शिर्के येथे राहणारा तरुण शरद लक्ष्मण शिर्के याच्याबरोबर लग्न करुन त्याची पत्नी सौ. वैष्णवी हिने लग्नाच्या आधीपासून संदेश नंदकिशोर शिंदे, {रा. भाईटेवाडी, तरडोली } याच्याशी असलेले प्रेमसंबंध या तरुणापासून लपवून ठेवले. संदेश आणि वैष्णवी या प्रियकर आणि प्रेयसी यांनी लग्नात मिळणारे दागिने घेवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने शरद … Read more

कौतुकास्पद : शिवसैनिकांनी स्वताच्या पैश्यातून उभारले कोरोना रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरात बाजी न करता कोरोना काळात रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान केले होते. या आवाहनाला पारनेर तालुका शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे टाकुन शिवसेना पदाअधिका-यांनी स्वतः ता पैसे जमा करून उद्यावत कोव्हिड सेंटर चालु … Read more

कोरोना ब्रेकिंग : २४ तासात जिल्ह्यात नव्या ३१६ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा (वय.६७ वर्षे) कोरोनामुळे सोमवारी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मुत्यु झाला. कोरोनाचा पाथर्डी तालुक्यातील हा पहीला बळी असुन,यामुळे नागरीकामधे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील या वृद्ध महीलेला काही दिवसापुर्वी श्वसनाचा त्रास होवु लागल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ९७ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more