10 रुपयांच्या तंबाखू पुडीची होतेय 30 रुपयांना विक्री…

अहमदनगर –  लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयांनातर बिडी, सिगारेट व बंदी असलेल्या गुटख्याचीही शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे बंदीतही हा … Read more

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. शनिवारी पाथर्डी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तहसीलदार महिलेने केली चालकास मारहाण ?

अहमदनगर – पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका कर्माचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले. … Read more

अहमदनगरकरांना दिलासा : ‘त्या’ सर्वांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या पैकी १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान आज पुन्हा ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात कोपरगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचेही स्त्राव पाठविण्यात आले आहेत. तसेच पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.  लॉकडाऊन मध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी 11 जणांना भोवली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ … Read more

Live Updates : लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम – उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे.  CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/vkTgkJqohP — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020 Live Updates –  महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन … Read more

आता पोलिसांची ड्रोनद्वारे नजर…अनावश्यक बाहेर पडू नका अन्यथा गुन्हे दाखल होतील !

जामखेड :- शहरातील सर्व प्रमुख मार्गावर राज्य राखीव पोलीस दल व जामखेड पोलीस यांनी एकत्रित संचलन करून शासनाच्या सुचनेचे पालन करण्याची माहिती दिली. तसेच अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिला. जामखेड शहरात मागील आठ दिवसात आढळलेले सहा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तसेच धार्मिक भावना दुखावल्यामुळे दाखल … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १६ जणांना प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले…आता या तालुक्यात कोरोना पोहचतोय ?

पाथर्डी : दिल्लीच्या मरकजला तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक युवक व त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेले १५ जण असे १६ जणांना तालुका प्रशासनाने ताब्यात घेवुन अहमदनगर येथे तपासणीसाठी शुक्रवारी पाठविले आहे. दिल्लीच्या मरकजचे कनेक्शन पाथर्डीतल्या माणिकदौंडीत पोहचले असल्याची भावना नागरीकांमधे वाढत आहे. माणिकदौंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील एक जेष्ठ नागरीक खोकल्याचा त्रास होत असल्याने … Read more

यमराज म्हणतोय नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन…

अहमदनगर / कर्जत :- लॉकडाऊन काळात कोणीही घराबाहेर पडू नका, संचारबंदीचे नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन. त्यामुळेच घरात रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन स्वतः यमराज कर्जत शहरात करताना दिसत आहे. कर्जत नगर पंचायतीच्या वतीने कोरोनाच्या जनजागृतीसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात आजतागायत कोरोनाच्या लढाईत स्थानिक प्रशासनाने चांगले यश … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासोबत उभं राहिलंय नवे संकट ! या नव्या आजाराची साथ पसरली…

अहमदनगर :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच ‘सारी’या आजारानेही संकटही अधिक गडद झाले आहे. या आजाराचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हा’ तालुका संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर :-  श्रीगोंदा तालुका प्रशासनाने 11 एप्रिल ते दि 13 एप्रिल 2020 असे 3 दिवस जनता कर्फ्यु संपूर्ण तालुक्यात जाहीर केला आहे. उद्यापासून (दि. 11) सलग तीन दिवस तालुका बंद करणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे. या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल, खाजगी दवाखाने सुरू राहतील. व पेट्रोल, डिझेल … Read more

अहमदनगर चा तिसरा रुग्ण ही झाला कोरोनामुक्त …शुभेच्छा देऊन घरी रवाना !

अहमदनगर :-  जिल्ह्यातील तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्हीही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले आहे. यशस्वी उपचार घेवून या अगोदर दोन रुग्ण घरी रवाना करण्यात आले असून आता तिसरा रुग्ण देखील घरी सोडण्यात आला आहे. तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील एक गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात करोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला. त्याला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरु असतानाच मृत्यू झाला. त्याला रक्तदाबाचा आजार होता. रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी ; त्यांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते. त्यापैकी १०३ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात या तिसऱ्या कोरोना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागांत 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह असणार संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेल्या नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर संगमनेर शहरातील काही भाग,  आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी घोषीत केले आहे. या सर्व ठिकाणी 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या … Read more

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले राजकारण करण्याची ही वेळ नाही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेसाठी तीन महिन्यांचा धान्याचा साठा राज्य सरकारला उपलब्ध करून देऊनही पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी जनतेला या धान्यापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. केंद्राने पाठवलेल्या धान्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांतून त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सर्वसामान्य जनतेला माणशी ५ किलो … Read more

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी केली फटाक्यांची आतषबाजी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील चारही संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद साजरा केला. दोन दिवसांपूर्वी चार वर्षांच्या मुलीला सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने या कुटुंबाने मुलीला खासगी डॉक्टरकडे नेले. त्यांनी सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. ही बातमी निघोजमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. सरकारी यंत्रणा … Read more