जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वात कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याची … Read more

आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन … Read more

एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणारे विखे आणि थोरात आले एकत्र पण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :-  काँग्रेसमध्ये एकत्र असताना विखे आणि थोरात यांच्यामध्ये अनेकदा वैर पाहायला मिळालं. त्यांनतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकमेकांवर टीका करण्याची हे दोघे एकही संधी सोडत नाहीत.गेल्या दोन दिवसांपासून ह्या दोन्ही नेत्यांत जोरदार शाब्दिक युध्द सुरु आहे.  मात्र शनिवारी एका लग्नसमारंभात विखे-थोरात एकमेकांशेजारी बसलेले दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. विखे … Read more

खासदार डॉ. सुजय विखे समर्थक बैठकीकडे फिरकलेही नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- भाजप तालुकाध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून भाजप अंतर्गत तालुक्यात राजकीय हवा तापली असताना खासदार प्रीतम मुंडे यांनी तालुकाध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार धनंजय बडे यांच्या संपर्क कार्यालयापुढे धावती भेट दिली. गेल्या मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष निवडीसाठी आमदार मोनिका राजळे व पक्षनिरीक्षक प्रसाद ढोकरीकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. खासदार डॉ. सुजय विखे … Read more

मुलींनो,’जर कोणी त्रास दिला, तर त्याला सोडू नका’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- मुलींनो, शिकून मोठे व्हा. आई-वडिलांचे नाव कमवा. जर कोणी त्रास दिला, तर त्याला सोडू नका. काही अडचण आल्यास आम्हाला कळवा. आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिले. भारतीय जैन संघटनेच्या वतीने २५ व २६ डिसेंबरला स्मार्ट गर्ल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले … Read more

पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :-  पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. इतर सदस्यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याचे सांगून यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी निवडण्यात आलेल्या विविध विषय … Read more

माजी मंत्री राम शिंदे व माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे मौन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीनंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर झालेले आरोप या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांना सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र या विषयावर त्यांनी आज बोलण्यास नकार दिला. आ. विखे पाटील यांनी मात्र या विषयावर पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तर आणि मोकळ्या मनाने चर्चा झाल्याचे सांगितले. माझ्यामुळे नुकसान … Read more

भाजपाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे ३१ डिसेंबरला कळेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना ३१ डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे … Read more

बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार होते !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍या भेटी बाबतचे वृत्‍त हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असुन कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याच्‍या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्‍हा दाखल केला असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कॉंग्रेस पक्ष सोडल्‍यानंतरही आमच्‍या सुखदुखाची चिंता करणारे आमदार बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार … Read more

नगर -पुणे रस्त्यावरील दुभाजक तोडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : नगर- पुणे महामार्गातील शिरूर ते नगर रस्त्यावर हॉटेल व्यवसायासह अन्य सुरु असलेल्या व्यवसायाचा धंदा जोरात व्हावा. यासाठी महामार्गावरील दूभाजक तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेण्यात आल्याने गेल्या काही घटनांवरून हे ‘स्पॉट’ नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर पुणे महामार्गावर अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर … Read more

सुजित झावरे पाटील यांनी आपल्या कृतीतून दिले त्यांना उत्तर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यात बिघडलेली राजकीय समीकरण या परिस्थितीमुळे तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित झावरे पाटील यांची निवडणुकीत झालेली फसवणूक त्यामुळे सहन करावा लागलेला राजकीय फटका त्यामुळे सुजित झावरे पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह यामुळे विधानसभा निकाला नंतर सुजित झावरे’चे तालुक्याच्या राजकारणात काय होणार हा विरोधकांना पडलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर ) शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी मोटारीचा भीषण आपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. या आपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मृतांमध्ये तीनही नगरचे रहिवासी आहे. अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहलीसाठी वडिलांनी दोन हजार रुपये न दिल्याने युवकाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :-  सहलीसाठी वडिलांनी दोन हजार रुपये न दिल्याने 19 वर्षीय युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. वडिलांनी पैसे न दिल्याने रागाविलेला 19 वर्षीय युवक चार दिवसांपासून घरातून निघून गेला होता. आज दुपारी या मृत तरुणाचा मृतदेह विहिरीत बुडालेल्या अवस्थेत आढळला. पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे आज … Read more

कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चेबाबत राधाकृष्ण विखे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील ‘यूटर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त एका दैनिकानं दिलं आहे. त्यानंतर विखे पाटील माघारी … Read more

अत्यंत महत्वाचे : अहमदनगर – पुणे महामार्ग असेल १ जानेवारी रोजी बंद जाणून घ्या पर्यायी मार्ग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे होणाऱ्­या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दि.१ जानेवारी रोजी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्या दिवशी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे दि.१ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमुळे यावर्षी … Read more

दशक्रियाविधीसाठी श्रीगोंद्यात आलेल्या प्राध्यापकाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  संगमनेर :- तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी प्रा. सुधीर तुकाराम तांबे (वय ३१) यांचा श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले अन्य दोन शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रा. सुधीर तांबे, त्यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात व्यापारी ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावरील आष्टी तालुक्यातील पोखरीजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गुरूवारी मध्यरात्री कार झाडावर आदळून खड्ड्यात कोसळली. या अपघातात जामखेड येथील आडत व्यापारी विशाल ऊर्फ बंटी काकासाहेब पवार (वय ३०) जागीच ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. पवार यांच्यामागे आई, पत्नी, लहान मुलगा व एक … Read more

अहमदनगर जिल्हापरिषद निवडणुकीत या दोन नेत्यांना भाजपने दिली फोडाफोडीची जबाबदारी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड मंगळवार (३१ डिसेंबर) ला होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसच्या शालिनी विखे यांच्याकडे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे होते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.  भाजपच्या पराभूत आमदारांनी … Read more