ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे घेणार आ.मोनिका राजळेंसाठी सभा

पाथर्डी : ‘निवडणूक प्रचारकाळात मी तुमच्या प्रचारासाठी नक्कीच सभा घेईल,’ असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांना दिले.  विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच काही राजळे विरोधकांनी पंकजा मुंडे यांची भेट घेत, राजळे यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नका, असे साकडे मुंडे यांना घेतले होते. या विषयावर अनेक बैठका व मेळावे घेत राजळे … Read more

रोहित पवार म्हणतात राम शिंदेंविरोधात लढत नाही, तर…

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 77 जणांच्या पहिल्या यादीत रोहित पवार यांचं नाव आहे. भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार मैदानात उतरले आहेत कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. … Read more

शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे – रोहित पवार

कर्जत :- शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. तेच हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी सांगितले. प्रेरणा दौऱ्याची सुरुवात सिद्धटेकच्या सिद्धिविनायकापासून करताना पवार बोलत होते. राशीन येथील यमाई देवी, काशीविश्वेश्वर मंदिर, कर्जत येथील आक्काबाई मंदिर, गोदड महाराज मंदिर, अंबीजळगाव येथील संत सावतामाळी मंदिर, शेगुड येथील खंडोबा मंदिर, चोंडी येथील अहिल्यादेवी जन्मस्थान, … Read more

जिल्हाभरात सात जणांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज … Read more

सरकारने निर्यातबंदी लागू करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

शेवगाव -: आमच्या काळात मंजूर असलेल्या पाणी योजना अद्याप बंद का आहेत? केंद्र व राज्यात सत्ताधारी असताना येथील पाण्याकरिता लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले? असा सवाल करत ११०० कोटींची विकासकामे केल्याचा आव आणत जनतेला मोठी स्वप्ने दाखवून निव्वळ भुलवण्याचा एककलमी कार्यक्रम आमदारांमार्फत सुरू असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केला. बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे … Read more

माजीमंत्री पाचपुते यांच्याविरोधात अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी ?

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने उमेदवारीबाबतच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला. पाचपुते यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखत आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. शेलार यांच्या रूपाने भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. श्रीगोंदे-नगर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर जिल्ह्यातील ह्या सहा नेत्यांना उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील पाच नेत्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. अकोले – किरण लहामटे , कोपरगाव – आशुतोष काळे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – निलेश … Read more

श्रीगोंद्याचे राजकारण धक्कादायक वळणावर !

श्रीगोंदा :- भाजपने पहिल्याच यादीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे भाजप प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप निवडणूक लढविणार नसून अण्णासाहेब शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी … Read more

स्वतःला फकीर म्हणवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांची संपत्ती तब्बल…

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष म्हणून नीलेश लंके यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी निवडणूक अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केले. निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आ.विजय औटी यांच्या विरोधात बोलताना ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नसल्याचे वक्तव्य केले होते, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे. लंके … Read more

पालकमंत्री शिंदेच्या मतदारसंघात पवार ‘पॉवर’ पुढे विखे पाटीलही हतबल !

कर्जत :- विधानसभा निवडणुका जाहिर होण्या आगोदरच कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांचा वावर जास्त वाढल्याने मतदारसंघ अधिक चर्चेत आलाय . आता तर राज्यातील वजनदार पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात पवार घराण्याने दंड थोपटल्यामुऴे हा मतदारसंघ अधिक हॉट झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी  दहा वर्षात स्वत:ची अशी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली नसल्याने त्यांची मदार आता खा. … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सन १९६२ पासूनच्या १२ निवडणूकांचा इतिहास

एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सन १९६२ मध्ये महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक झाली. एकूण २६४ विधानसभा मतदार संघापैकी अनुसूचित जातीसाठी ३३ आणि अनुसुचित जमातीसाठी १४ मतदार संघ राखीव होते. अनुसूचित जातीच्या ३३ मतदार संघापैकी श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. १९६२, १९६७ आणि १९७२ च्या विधान सभेच्या निवडणुकीसाठी हा मतदार … Read more

समोरासमोर येऊन चर्चा करा – आ.संग्राम जगताप

नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील. मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी … Read more

पालकमंत्री राम शिंदेसह माजी मंत्री पाचपुतेंनी भरला अर्ज

नगर : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात मंगळवारी एकूण सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारअखेर एकूण १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून तब्बल ११३ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मंगळवारी … Read more

शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात,राष्ट्रवादीला धक्का !

अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक … Read more

भाजपची पहिली यादी जाहीर : नगर जिल्ह्यातून या आठ नेत्यांची उमेदवारी फायनल !

अहमदनगर :- भाजपाने विधानसभा निवडणूकीसाठी दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांच्या ह्या यादीत नगर जिल्ह्यातील आठ जागांचा समावेश आहे. अहमनगर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैभव पिचड, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा.राम शिंदे शिवाजीराव कर्डीले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर : … Read more

पक्षाकडून डावलण्याचा संबंध येतो कुठे? – आमदार कर्डिले

राहुरी :- दोन दिवसांत भाजपच्या यादीत माझे नाव दिसेल. ३ सप्टेंबरला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या माझ्या उमेदवारीबाबतच्या उलटसुलट वृत्तात दम नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी सांगितले. राहुरी येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे होते. कर्डिले म्हणाले, मागील पाच … Read more

विधानसभेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा !

मुंबई: भाजप आणि शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून अखेर आज युतीची घोषणा केली आहे. या पत्रकात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष हे महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे फॉर्म्युल्याविषयीचा तपशील हा लवकरच जाहीर करण्यात येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्युला हा गुलदस्त्याच ठेवण्यात आला आहे . या पत्रकावर भाजपचे … Read more

धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सहभाग घेणार

पारनेर : शेतीमालाला ऊत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळावा तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी दि. २ ऑक्टोबर रोज़ी गावागावांत होणाऱ्या धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी १ जून २०१७ ला ऐतिहासिक शेतकरी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांंचे कर्ज … Read more