कर्जत – जामखेड ‘ मध्ये नगराध्यक्ष राऊत निवडणूक लढविणार ?

कर्जत : प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील समर्थकांचा ९ सप्टेंबरला कर्जतमध्ये संकल्प मेळावा आयोजित केला आहे. त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीची भूमिका जाहीर करणार आहेत. राऊत निवडणुकीत उतरल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राऊत हे मुळचे शिवसैनिक आहेत. काही काळ राष्ट्रवादीतही ते गेले होते. … Read more

राम शिंदे व भाजपचे गुंड जिल्हयात अशांततेचे वातावरण तयार करत आहेत !

कर्जत – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कर्जत दौऱ्यावर येणार असल्याने युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर त्यांचे लक्ष वेधून निषेध करण्याबाबतचे कर्जत पोलिस स्टेशनला निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. दरम्यान निवेदनावर सही केलेल्या राशीन येथील किरण पोटफोडे या कार्यकर्त्याला गावगुंडांनी मारहाण केली. या घटनेचा कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांना अटक न झाल्यास … Read more

सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित नोकरी मार्गदर्शन मेळाव्यास उदंड प्रतिसाद

कर्जत – कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या. हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही नोकरीसाठी शिबीरे व मेळावे घेणार असल्याचे सांगत ही अखंड प्रक्रिया सुरू राहील असे आश्‍वासन आयोजक रोहित पवार यांनी युवक-युवतींना दिले. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या थेट नोकरी … Read more

तरुणास कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव शिवारात एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. श्रीरंग आश्रु मेटे (वय ६०) यांनी फिर्यरद दाखल केली. बाळू कुंडलिक जगदाळे यांच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोज रोज तु आमच्या सुनेच्या घरी का येतो? अशी विचारणा श्रीरंग मेटे यांनी केली असता त्याचा राग धरुन बाळु … Read more

महिलांना घरात घुसून मारहाण, दोन गटांत तुफान हाणामारी

कर्जत : तालुक्यातील नेटकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे. तालुक्यातील नेटकेवाडी येथे आज सकाळी ९:०० च्या सुमारास गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याबाबत अजय बापू धांडे व गहिनीनाथ भिवा धांडे यांनी परस्परविरोधांत … Read more

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. कर्डिले

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी … Read more

अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

कर्जत : तालुक्यातील जलालपूर शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे याचा पोलिस तपास करत आहेत.जलालपुर गावच्या शिवारात नवनाथ आत्माराम बाबर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात … Read more

पाणी मागितले तर गोळ्या घातल्या हा इतिहास जनता कधीही विसरणार नाही!

कर्जत – राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे असा प्रश्­न करीत ही तर केवळ गुंडांची टोळी असून मी तर त्या पक्षाचे नाव अलीबाबा चालीस चोर असे ठेवले असल्याचे प्रतिपादन पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राशीन गावासाठी १३ कोटी ३१ लाख रूपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ मंत्री श्री. खोत … Read more

झेडपी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढे ढकलल्या

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या नव्याने होणाऱ्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात जिल्हा प्रशासन व पोलिस व्यस्त असल्याकारणाने नव्याने होणाऱ्या पधाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलली आहे. पदाचा कालावधी समाप्त झाल्यापासून १२० दिवसाच्या आत या … Read more

विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले, पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू … Read more

जामखेड शहरासाठी ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर!

जामखेड : जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियानांतर्गत ११७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याबाबत मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले. यामुळे जामखेड शहरापुढील तीस वर्षांपर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महीला जागीच ठार

पारनेर ;- प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील राधाबाई कारभारी … Read more

विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील … Read more

मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव !

श्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून … Read more

दिव्यांग मुलांचा विवाह पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणवले

अहमदनगर :- मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. तर विवाह कशा पध्दतीने चांगला होईल यासाठी वारेमापपणे खर्च केला जातो. मात्र विवाह दिव्यांगांचा असल्यास या अडचणींमध्ये आणखीच भर पडते. घरची बिकट परिस्थितीमुळे अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा विवाह सेवाप्रीत सोशल फाऊंडेशन या महिला संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या थाटात हॉटेल … Read more

रोहित पवारांची कर्जत तालुक्यात जमीन खरेदी !

अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली. रोहित यांचे सासरे मगर परिवार यांची कर्जत तालुक्यामधील पिंपळवाडी येथे २०० एकर शेतजमीन आहे. आता स्वत: पवार यांनीही तेथे जमीन घेतली … Read more

पवारांचा पारा चढविणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराने नाही मागितली माफी,दिले हे उत्तर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी … Read more

शेतकऱ्यांना पाणी मिळेल,संयम ठेवावा – माजीमंत्री पाचपुते

श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी संपले आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन बंद करावे, असे पत्र पुणे जिल्ह्यातील एका आमदाराने दिले. त्यामुळे भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काळे यांना आज कुकडी कार्यालयात घेराव घातला. कुकडी प्रकल्पातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. कर्जत, करमाळा तालुक्‍यांसाठी सुमारे आडीच टीएमसी पाणी … Read more