बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

अहमदनगर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. सध्या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या दृष्काळामुळे हातात पैसा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्याने जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावन अजूनही छावणीतच उभी आहे. दृष्काळाचे भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर अणि बैल पोळ्याच्या सणावर पडलेले आहे. . … Read more

कॉलेज परिसरात हाणामारी

अहमदनगर : पाथर्डी येथील एमएम निऱ्हाळी कॉलेज परिसरात २७ ऑगस्टला विद्यार्थ्यांमध्येच राडा झाला. मागील भांडणाचा राग मनात धरून एका विद्याथ्र्यास मारहाण करण्यात आली. तसेच भांडणात मधे पडणाऱ्या शिक्षकालाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात खळबळ उडाली आहे. . २७ ऑगस्ट रोजी फिर्यादी मुलगा … Read more

आझाद ठुबे व सहकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल

पारनेर :- अपहारप्रकरणी कान्हूर पठारच्या तत्कालीन सरपंच, जि. प. सदस्य उज्ज्वला ठुबे यांचे पती माजी जि. प. सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, विद्यमान सरपंच अलंकार अहिलाजी काकडे, माजी सरपंच कलम लक्ष्मण शेळके यांच्यासह पाच ग्रामसेवकांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहितार्थ याचिकेत कान्हूर पठार ग्रामपंचायतीमध्ये १९९९ ते २०१२ या कालावधीत स्थानिक लेखापरीक्षणात एकूण … Read more

राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेत सोन्याची चैन चोरी

नगर – नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बाजारतळ भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवराज्य यात्रा सभेचा कार्यक्रम असताना कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरत असलेले जामखेड येथील व्यापारी सुनील मनसुखलाल कोठारी यांना कोणीतरी धक्का मारला. ते गर्दीत खाली पडल्याने राहुल नावाच्या तरुणाने त्यांना हात देवून उठविण्याचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गळ्यात्न … Read more

भावाला घरासह दिले पेटवून

श्रीगोंदा – तालुक्यातील शेडगाव येथे किरकोळ भांडणातून स्वतः च्या भावाला घरासह पेटवून दिले. या आगीत दाम्पत्य जखमी झाले आहे. बुधवार (दि.२८) सकाळी ही घटना घडली. गोरख भदे, त्यांंची पत्नी सुरेखा भदे ही दोघे जखमी झाले आहेत. दोघांवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, गाेरख भदे यांचे शरद भदे याच्यासोबत भांडण झाले … Read more

आ. कर्डिलेंना आ. राजळेंचे पाठबळ !

नगर दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अंतर्गत पुन्हा एकदा नव्याने फेर जुळण्याचे प्रयत्न होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याभोवती भाजपचे राजकारण आगामी काळात फिरण्याची चिन्हे आहेत. भाजपासह सत्तेचे प्रमुख शक्तीकेंद्र बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महाजनादेश यात्रेच्यानिमिताने पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांनी आ. कर्डिले यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले. या कौतुकामागील … Read more

हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल !

जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सध्या चांगलीच वाढ झालेली आहे. असे जरी असले म्हणावा तसा अद्यापही पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरीची पाणी पातळी अजूनही खालावलेली आहे. खरिपाची पिके जोरदार आली होती, मात्र पाण्याअभावी ती सुकू लागली आहेत. त्यामुळे पेरणी केलेला खर्च निघेन की नाही, या चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. … Read more

कांदा कडाडला @ 2600

कोपरगाव : बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.कांद्याच्या दरात झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या … Read more

रोहित निवडणूक लढवतोय त्याला पाठबळ द्या – सुनंदाताई पवार

मिरजगाव : कर्जत – जामखेडमधून रोहित निवडणूक लढत आहे. तुम्ही त्याला आपले पाठबळ द्या. मतदारसंघातील बेरोजगार तरुण व महिला भगिनींना बारामती ॲग्रोच्या माध्यमातून उद्योग उपलब्ध देऊ,विकासाची कामे करताना खरा विकास कसा असतो, तो करून दाखवू , असे, प्रतिपादन बारामती ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.  कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे बारामती ॲग्रोच्या वतीने आयोजित … Read more

पारनेरच्या पारंपरिक प्रस्थापित राजकीय सत्ता केंद्राचा निलेश लंके’ना विरोध का ?

पारनेर :- तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर सध्यस्थितीला घोंगवणारे वादळ म्हटले तर कोणीही डोळेझाकून नाव घेत ते म्हणजे लोकनेते निलेश लंके यांचे सामजिक कामाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण तालुक्यात आपली लोकनेता म्हणून ओळख निर्माण केली. कोणतीही राजकिय सामजिक पार्श्वभूमी नसूनही,समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामजिक भावना मनात ठेवून लोकनेते निलेश लंके सारख्या अवलियाने पारनेर तालुक्यात जे सामजिक … Read more

…तर पाणीप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू

पाथर्डी :- तालुक्याचा पूर्व भाग व बोधेगाव परिसराला मुळेचे पाणी द्यावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी निधीसह योजना मंजूर करून घ्यावी; अन्यथा राजकीय फायद्यासाठी लोकांना नादी लावण्याचा प्रकार समजून याचा जाब विचारू, असे जलक्रांती जनआंदोलनाचे संस्थापक दत्ता बडे यांनी सांगितले. निवेदनात म्हटले आहे, भालगाव, लाडजळगाव, बोधेगाव, टाकळीमानूर, वडगाव, चिंचपूर, … Read more

राष्ट्रवादीने काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत !

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली. महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी … Read more

नगर जिल्ह्यासाठी कांदा अनुदानासाठी ७३ कोटी मंजूर

अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात … Read more

महाराष्ट्रातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस कॉ.आनंदराव वायकर व प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांनी दिली. या दोन राज्यव्यापी संघटनांच्या वतीने … Read more

शिक्षकांची शासनाकडून वारंवार फसवणूक शिक्षक दिनावर घालणार बहिष्कार

नगर- शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो. मात्र शिक्षकाला गुरू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील पाच वर्षात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन  वारंवार दुर्लक्ष करित असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शिक्षकांची वारंवार  फ़सवणुक होत असून या  मागण्यांचा तत्काळ शासन आदेश न काढल्यास येत्या शिक्षक काळ्या फिती लावून दिनावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. … Read more

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत … Read more

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

नगर :- शहर व उपनगरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांची पुन्हा दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेचे काही रस्त्यांचे पॅचिंग करण्यात आले होते. त्या काही रस्त्यांवरील डांबर पावसाने वाहून गेले. या पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची … Read more