राम शिंदेंची डोकेदुखी वाढली, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत विधानसभा लढणार ?

जामखेड: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरु असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं संभाव्य आव्हान समोर राम शिंदें समोर आहे. त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नामदेव … Read more

सालकरी की मालक निवडायचा याचा निर्णय जामखेडकरांनी घ्यावा

जामखेड: सालकऱ्याचा मुलगा सालकरी राहतो, मालकाचा मुलगा मालकच राहतो. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेने सालकरी निवडायचा की, मालक निवडायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. शेतीचा पाणीप्रश्र सोडवण्यासाठी ‘कृष्णा-भीमा-सीना स्थिरीकरण प्रकल्प’ राबवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जामखेड शहरातील राज लाॅन्सवर घेण्यात आले. या वेळी … Read more

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा – आ.शिवाजी कर्डिले

राहुरी :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा मिळाली, त्यांच्यामुळेच राहुरी मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी मिळाली व पाचव्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनीदेखील राहुरी मतदारसंघासाठी भरीव निधी देऊन मुंडे -कर्डिले कुटुंबाचे ऋणानुबंध जोपले, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, देवराई, घाटशिरस येथील विविध … Read more

नगर जिल्ह्यातील या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर :- काही पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या. बदली झालेले अधिकारी, ठिकाण पुढीलप्रमाणे : गोकूळ औताडे – वाचक उपअधीक्षक कार्यालय शिर्डी, अरुण परदेशी – नगर सायबर ठाणे, पांडुरंग पवार- वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय, हनुमंतराव गाडे- साई मंदिर सुरक्षा शिर्डी, प्रवीणचंद लोखंडे – आंर्थिक गुन्हे शाखा, दीपक गंधाले – प्रभारी शिर्डी, सुभाष घोये – … Read more

गरज पडली की बारामतीत यायचं सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

विघ्नसंतोषींनी सीना सुशोभीकरणाचे काम बंद पाडले : संग्राम जगताप

नगर : शहरातील विद्युत पोलवरील तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती. परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी करून हे काम बंद पाडले. नंतर याच लोकांनी आमदार झाल्यावर सीना नदीच्या याच सुशोभीकरणाच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज … Read more

निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,  असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

कांदा @ २७०० रूपये

राहुरी शहर : बाजार समितीच्या वांबोरी उपकेंद्रावर काल कांद्याची चार हजार ९४४ गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – २१०० ते २७००, कांदा नं. २ – १५०० ते २०७५, कांदा नं. ३ – ५०० ते १४७५, गोल्टी – … Read more

आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध

नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे. आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण … Read more

आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात होता, परंतु यावर्षी महापालिका प्रशासनाच्या उदासीनपणामुळे कुठलीही उपाययोजना झाली नसल्यामुळे नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत २ … Read more

श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी!

श्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात … Read more

विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे

शेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला. यापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही … Read more

अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली. तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले … Read more

आमदार राहुल जगताप यांच्या निधीतील तब्बल ३ कोटी ८० लाख खड्ड्यांत…

श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे … Read more

विधानसभेसाठी भाजपकडून राहुल झावरे ?

पारनेर :- अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर १२-०घोषणा करुन त्यादृष्टीने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरु केली. पारनेर -नगर विधासभा मतदारसंघासाठी भाजपकडून विखे कुटूबियांशी पस्तीस वर्षापासून घनिष्ठ संबध असलेले माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे विखेंनी आदेश देवून प्रवरेची यंत्रणा सक्रिय केल्याने … Read more

या हॉटेलमध्ये होणार भाजप इच्छुकांच्या मुलाखती

नगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मंगळवारी होणाऱ्या मुलाखती एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या. या मुलाखती बुधवारी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी दिली. तारकपूर येथील व्ही स्टार हॉटेलमध्ये या मुलाखती होतील. अकोले ११ ते ११.३०, संगमनेर ११ ते १२, कोपरगाव १२ ते १२.३०, शिर्डी १२ ते १ ,श्रीरामपूर १ ते १.३०, नेवासे १.३० … Read more

श्रीगोंदे मतदारसंघासाठी १८ कोटींंचा निधी

श्रीगोंदे : श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत जल संधारणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील काही कामांचा कार्यारंभ आदेश झाला आहे, तर काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली. मतदारसंघातील ११ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ८७ लाख एवढा निधी मंजूर होऊन … Read more

भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत आव्हान

अहमदनगर : कर्जत-जामखेडला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, शिर्डीला राधाकृष्ण विखे व अकोल्यात वैभव पिचड या चार जागांवरील उमेदवारांना पक्षांतर्गत आव्हान सध्या तरी दिसत नाही. पण तीन तालुक्यांतून मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. कोपरगावला स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तर पाथर्डी-शेवगाव … Read more