अहमदनगर : कर्जत-जामखेडला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, शिर्डीला राधाकृष्ण विखे व अकोल्यात वैभव पिचड या चार जागांवरील उमेदवारांना पक्षांतर्गत आव्हान सध्या तरी दिसत नाही. पण तीन तालुक्यांतून मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.
कोपरगावला स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळेंना माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचे आव्हान आहे तसेच नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे यांना सचिन देसरडा यांचा विरोध सुरू आहे.
अर्थात या तीन मतदारसंघांत विद्यमान आमदारांना आव्हान देणाऱ्यांपैकी देसरडा व काकडेंसारखे एक-दोन जणच भाजपच्या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहण्याची शक्यता आहे. परजणे व वहाडणेंसारखे इच्छुक भाजपच्या मुलाखतींना येण्याची शक्यता कमी आहे.
पण, भाजप नेते असलेल्या विखेंवर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवारीची दावेदारी करतो, याची उत्सुकता आहे.
- Small cap stock : 1 रुपयाचा हा शेअर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मारामार, कंपनीने जाहीर केला विशेष लाभांश…
- गावरान आमराया नामशेष होण्याच्या मार्गावर ! दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव कसा कळणार ?
- Numerology: ‘या’ जन्मतारखा असलेले लोक पैशांच्या बाबतीत असतात खूपच कंजूष! पैशांच्या बाबतीत पत्करत नाहीत कुठलाही धोका
- Ahmednagar Breaking ! हॉटेलवर दगडफेक करून मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा
- Artificial Sweetener : कृत्रिम साखर वापरत असाल तर सावधान! आरोग्यावर होऊ शकतात वाईट परिणाम…