अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ पंचायत समिती सदस्यावर गुन्हा

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  पाथर्डी पंचायत समिती सदस्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देविदास लिंबाजी खेडकर (वय 42, पंचायत समिती सदस्य, पाथर्डी, रा:- पाथर्डी , ता: पाथर्डी, जि:- अहमदनगर), सविता देविदास खेडकर (वयः- 37, गृहिणी, रा:- पाथर्डी ता:- पाथर्डी … Read more

तिहेरी हत्याकांड! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीड: बीडमधील तिहेरी हत्याकांडाने सारा महाराष्ट्र हादरला आहे. शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातिल तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मांगवडगाव इथे घडली आहे. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावठी कट्ट्याच्या धाकाने दाम्पत्यास लुटले

अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक पती पत्नीस गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी -राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाऊर येथील रंजना शिंदे (खोपडी-कोपरगाव येथे कार्यरत) तर पती ग्रामसेवक मधुकर गंगाधर आग्रे (राहाता पंचायत समितीत कार्यरत) हे दाम्पत्य आपले कर्तव्य … Read more

पती लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून शिक्षिकेची आत्महत्या ! मुलीच्या घरच्यांनी केला ‘हा’ आरोप

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- दिल्लीतील मानससरोवर पार्कमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक शिक्षिकेनं आपला पती लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून आत्महत्या केली. मात्र मुलीच्या घरच्यांनी हुंड्यावरून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.मृत तरुणीचे नाव आकांक्षा (वय-27 वर्ष) असून तिनं कोणतीही सुसाइड नोट सोडलेली नाही. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावात येवू न दिल्याने महिला सरपंचांना मारहाण !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठीपोखरी बाळेश्वरमध्ये प्रवेशाचे सर्व रस्ते बंद असताना देखील चार जण गावात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना गावात प्रवेश दिला नाही, याचा राग आल्याने या चौघांनी सरपंच मनिषा अर्जुन फटांगरे यांना शिवीगाळ करत व दगडाने मारून दुखापत केल्याची घटना बुधवार दि.१३ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. … Read more

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला अटक !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  विद्यार्थिनीवर पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात तसेच शेतात १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिची आई कामानिमित्त पुण्याला गेली असताना मी तुला सांभाळणार आहे . आपण लग्न करू , असे म्हणत तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून विद्यार्थिनीचे पोट दुखू लागल्याने मळमळ होऊ लागल्याने तिला गोळ्या देवून गर्भपात केला. सप्टेंबर २०१९ ते … Read more

तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला … Read more

ब्रेकिंग : आदर्शगाव लोहसरच्या सरपंचाना मारहाण

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनचे धान्य वाटपावेळी झालेल्या वादातून लोहसरचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल (अनुराग) जगन्नाथ गिते यांना मारहाण झाली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. विरोधी गटाचे गंगाधर ऊर्फ शिवाजी वांढेकर हे देखील या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार … Read more

धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अकोले तालुक्यातील विठा भागात राहणारी शेतकरी तरुणी राणी योगेश आवारी , वय ३० शेतात गेली असता ती घरी आली नाही तिचा शोध घेतला असता डॉक्टर भोकनळ यांच्या विहिरीजवळ चप्पल दिसून आली . तेव्हा विहीरीत गळ टाकून राणी आवारी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरकडे नेले मात्र ती उपचारापूर्वीच मयत … Read more

धक्कादायक! अहमदनगर मध्ये फळ वाहतुकीच्या नावाखाली दारुची तस्करी

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करण्याचा प्रताप काहींनी केला. कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यात दोघांना अटक केली आहे.बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. रामचंद्र भिमराव लोकरे (वय २७) व दीपक भारत शेळके (वय २५ रा़ दोघे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार,मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करत मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आनंदवाडी परिसरात राहणारी एक १७ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी घरात एकटी असताना काल संध्याकाळी आरोपी संतोष बिराजी खरात हा घरात घुसला, तरूणीला बळजबरी … Read more

ब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  पोलिस ताब्यात असलेला आरोपीला घेऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयात जात असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तो पसार झाला. पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पारनेर पुरुष ठाण्यातील भादंवि 363 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या गुन्हातील आरोपी प्रविण उर्फ मिठू पोपट गायकवाड याला तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या कडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला … Read more

अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न,नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अल्पवयीन मुलीचे लग्न गुपचूप लावण्याचा प्रयत्न कोपरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही घटना तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस पाटील हरिभाऊ सयाजी केकान (जेऊर पाटोदा) यांनी फर्याद दली. यात आरोपी नारायण आगाजी अव्हाने, अल्काबाई नारायण अव्हाने, विकास सोपान चव्हाण, सोपान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील वडझिरे परिसरातील कृष्णतारा पेट्रोलपंपाचे जवळील वळणावर झालेल्या टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामधे देवीभोयरे येथील तरुण जागीच ठार झाला. पारनेर-बेल्हे रस्त्यावर टाटा टेम्पो (एमएच ४२ टी-१०१३) जात होती. समोरून येणाऱ्या मोटरसायकलची (एमएच १६, एडी २७३९) आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये देवीभोयरे (माळवाडी) येथील प्रमोद किसन मुळे … Read more

बिग ब्रेकिंग : मुंबईतून आलेल्या तरुणाचा मृत्यू ! श्वसनाचा त्रास असल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या 39 वर्षीय तरुणाचा मंगळवार (दि. 12) सकाळी मृत्यू झाला. 3 मे रोजी हा तरुण त्याच्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन मुंबई येथील घाटकोपर येथून पिंप्री जलसेनला सासुरवाडीत आला होता.तरूणाचा नगर येथे उपचारांसाठी नेताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यू कोरोनामुळे किंवा अन्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- पोहण्यास गेलेला दहा वर्षे वयाच्या मुलाचा श्रीरामपूर शहरालगत बेलापूर-पढेगाव रोडवर असणाऱ्या खटकाळी गावठाण येथील खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी हा मृतदेह सापडला. खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप (वय १०) हा मित्रांसमवेत दुपारी अडीच वाजता पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या सरपंचांनाच बेदम मारहाण !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमशेत गावात जनजागृती व त्या अनुषंगाने सांगितले म्हणून त्याचा राग मनात धरून सहा ते सात लोकांनी कुमशेतचे सरपंच सयाजी तुकाराम अस्वले यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अकोले पंचायत … Read more