पोराला पकडण्यासाठी पोलीस आले अन टेन्शनमध्ये आईनेच जीव सोडला

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात एक अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. एका चोरीच्या प्रकरणात आपल्या मुलाला पोलीस पकडायला आल्याच्या टेन्शनमध्ये आईचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Ahmednagar Crime) याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती परिसरात राहणाऱ्या एका मुलाचे नाव भंगार चोरी प्रकरणात काही आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: राहुरी कारागृहातून आरोपींचे पलायन; पोलीस उपनिरीक्षकांसह सहा जणांचे निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शनिवारी पहाटे राहुरीच्या कारागृहामधून पाच आरोपींनी पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar police) पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार, व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची … Read more

धूमकेतू पाहण्यासाठी गेलेल्या खगोलप्रेमींना दिसला अचानक बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-   जिल्ह्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे शहर तसेच गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच एक धक्कादायक घटना चांदबीबी परिसरात घडली आहे.(leopard news)  नगर मधील चांदबीबी परिसरात नवा धूमकेतू पाहण्यासाठी जाणार्‍या खगोलप्रेमींना अचानक बिबट्या आडवा गेल्याने त्यांची तारांबळ उडाली. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे यापूर्वीही … Read more

अखेर नगर जिल्ह्यातील ‘या’ आगारातून आज बस धावली

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शासकीय विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यातच नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी देखील सहभागी आहे.(ST Workers Strike)  दरम्यान सरकारकडून देण्यात आलेल्या अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान यातच आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एसटी आगारामध्ये संपावर असलेल्यांपैकी काही कर्मचारी … Read more

दहावी, बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  कोरोनाच्या सावटाखाली यंदा महाराष्ट्र शिक्षण मंडळ 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यास सज्ज होत आहे. अशात विद्यार्थ्यांना या बोर्ड परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले होते.(Student News) यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब … Read more

वृध्द महिलेला कोंडले आणि लुटले, शेवटी पोलिसांनी दोघांना पकडलेच

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  घरामध्ये एकट्या असलेल्या वृध्द महिलेवर धारदार हत्याराने हल्ला करून तिला बाथरूममध्ये कोंडून अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विजय जगन्नाथ मोहिते (वय 38 रा. दरोडी ता. पारनेर) व मनोज रमेश पवार (वय 28 रा. जुन्नर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more

हात चलाखीने एटीएमसह पैसे चोरले

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एटीएम मधून काढलेली रक्कम व एटीएम कार्ड चोरट्याने हात चलाखीने चोरले. नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनी चौकातील एटीएममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दादासाहेब किसन सातपुते (वय 31 रा. बहिरवाडी, बायजाबाई जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी … Read more

जेलमधून फरार आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- राहुरी कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपी उक्कलगाव येथे नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला.(Rahuri Jail) त्यावर बेलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस गेले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. राहुरी कारागृहाचे गज कापून पाच आरोपी … Read more

बेलवंडी फाटा येथे गावठी कट्टा व चार काडतुसासह आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.(arrest) किरण अरुण दरेकर (३३, करंदी, ता. शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून १७ डिसेंबर … Read more

करूना धनंजय मुंडे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- करुणा धनंजय मुंडे यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची घोषणा अहमदनगरमध्ये केली. राज्यात सामाजिक कार्य करत असताना असे लक्षात आले की, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे.(Karuna Dhananjay Munde) महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची माहिती मुंडे … Read more

शहर संध्याकाळच्या वेळेत अंधारात असते. महानगरपालिका मात्र प्रकाशात …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- शहरातील विविध विषयांवर महानगरपालिकेला निवेदन देऊन उत्तर मिळत नाही. शहरातील खड्डे व बंद असलेले पथदिवे चालू करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी २७ डिसेंबर राेजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार अाहे, अशी माहिती समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.(Municipal Corporation) महापालिकेला समाजवादी पार्टीने विविध विषयांवर निवेदने दिली. परंतु महापालिकेने … Read more

‘ह्या’ गावाने रचला इतिहास ! भगवानगड विकासासाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा विकास निधी …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  कोरोना सारख्या संकटातून बाहेर येत बीड जिल्ह्यातील हिंगणीसारख्या अत्यंत छोट्या गावाने ईश्वराचे आभार मानत संत भगवानबाबासह अन्य संतांच्या मंदिराचे काम लोकवर्गणीतून पूर्ण करत श्रीक्षेत्र भगवानगड विकासासाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा विकास निधी जाहीर करून गडाच्या एक दिवसीय देणगीचा इतिहास रचला आहे.(Rs 44 lakh for Bhagwangad development) गडाचे महंत … Read more

मोठी बातमी ! आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी…

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.(Aditya Thackeray) बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे. 34 वर्षीय व्यक्तीने … Read more

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी… उद्यापासून होणार निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आपल्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरु आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज 23 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.(staff suspension) आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम … Read more

शेवगाव तालुक्यातील शंभरहून अधिक गावे झाली ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील 107 गावात सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसून ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली आहेत.(corona virus) आता ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठीक ठिकाणी जनतेचे प्रबोधन सुरु असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे … Read more

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाला मिळणार गती; राज्य सरकारकडून ९० कोटींचा निधी प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  मराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला ९० कोटी १३ लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. नुकतीच नगर ते आष्टी … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 50 हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवार रोजी 288 वाहनांमधून 53 हजार 336 गोण्या विक्रीसाठी आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे काल बुधवारी कांद्याच्या आवकेत सोमवारच्या तुलनेत 11 हजार 657 गोण्यांनी वाढ झाली आहे. तसेच मालाला मिळालेला भाव जास्तीत जास्त 4 हजारांपर्यंत निघाला. सोमवारच्या तुलनेत तो 200 … Read more

विखेंच्या सूचनेनंतरही नगरसेवकांची सर्वसाधारण सभेला पाठ… राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांचा कार्यकाल येत्या 28 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे अवघे 6 दिवस कार्यकाळ शिल्लक राहिल्याने गुरुवारी होणारी विशेष सर्वसाधारण सभा सर्व नगरसेवकांच्या कार्यकाळातली शेवटची सभा होती; परंतु भाजपचे नगरसेवक गुरुवारी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेला गैरहजर राहण्याची भूमिका घेतल्याने आ. विखे पाटील भाजप नगरसेवकांनी … Read more