दहावी, बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  कोरोनाच्या सावटाखाली यंदा महाराष्ट्र शिक्षण मंडळ 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यास सज्ज होत आहे. अशात विद्यार्थ्यांना या बोर्ड परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले होते.(Student News)

यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते.

मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ‍दिली.

राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा,

अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. यामुळे आता शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

12वीचे विद्यार्थी 3 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन अर्जकरू शकतील. तर दहावीचे विद्यार्थी 14 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

त्यांना विलंब शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान यापूर्वी दहावीचे विद्यार्थी नियमित शुल्कासह 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार तर विलंब शुल्क सह 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील.

तर बारावीचे विद्यार्थी केवळ आता विलंब शुल्कासह 28 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत. असा आदेश काढण्यात आला होता.