शौचालये पाडलेल्या ‘त्या’ जागेवर उद्यान उभारण्याची नागरिकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील झारेकर गल्लीतील 18 शौचालये अज्ञात व्यक्तींनी पाडली. आता या जागेवर आता स्वच्छतागृहांऐवजी उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारण या स्वच्छतागृहांमुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. झारेकर गल्लीतील 24 पैकी 18 स्वच्छतागृहे … Read more

नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गातील कुंठेफळ येथील सुमारे 500 मीटर लांबीचा व 33.5 मीटर उंचीच्या मेहेकरी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार आहे. 1997 मध्ये मंजुरी मिळालेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जलद वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED कडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी…वाढीव पगार खात्यावर झाला जमा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत.कामावर हजर झालेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून सांगली जिल्ह्यात पळून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी अत्याचार करणार्‍या युवकासह त्याला सांगलीमध्ये मदत करणार्‍या युवकालाही अटक केली आहे. अत्याचार करणारा युवक मोहित बाबासाहेब कांबळे (वय 19) व त्याला मदत करणारा आकाश कचरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आणखी आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल; कुठे आणि किती आले वाचा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- करोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्वी 27 प्रवासी आले आहेत. त्यातील दोघांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा 55 प्रवासी आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 82 आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. हे प्रवासी करोनाचे निर्बंध असलेल्या अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिका देशाचा देखील समावेश आहे. … Read more

राज्यातील 36 जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला असा भाव !

soyabean rate today market in maharashtra :- महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार कायम राहिलाय. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात तब्बल 600 रुपयांची घसरण ही झाली होती तर त्यानंतरही सोयाबीनचे दर हे सावरले होते. दरामध्ये कमी-जास्तपणा झाला असला तरी मात्र, शेतरकऱ्यांनीही सोयाबीन विक्रीची गडबड ही केलेलीच नाही.त्यामुळे सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव … Read more

कु.अश्विनी शिंदे हीस मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  येथील कु.अश्विनी सुरेंद्र शिंदे हीस नॅनो टेक्नॉलॉजीचा अ‍ॅन्टी कॅन्सरमध्ये उपयोग या विषयाच्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली असून, तिला डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कु.अश्विनी हीचे मुंबईच्या भाभा विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ.विजय मेंढूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये हा रिसर्च पूर्ण केला आहे. तिचे संशोधन कॅन्सर जागीच नियंत्रित करण्यात … Read more

डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखोंची रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात एटीएम लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अनेकदा चोरट्यांचा हा प्रयत्न फास्ट तर अनेकदा तो यशस्वी देखील होतो. यामुळे जिल्ह्यातील एटीएम मशीनची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 … Read more

या तालुक्यात वाईन्स शॉप फोडून चोरटयांनी लाखोंची कॅश पळविली

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भर पेठेत असलेले दारूचे दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि लाखों रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. मनप्रितसिंग कथुरिया यांचे राहुरी शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारूचे दुकान आहे. या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी … Read more

अखेर डॉ. वंदना मुरकुटे यांनी सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती अखेर डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी हे जाहीर केले. दरम्यान आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत मुरकुटे यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दि 18 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीचा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील अरणगाव येथील चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाले. यावेळी जमलेल्या जमावाने एकमेकांवर दगडफेक केली. घटनेचे गांभीर्य ओळखून नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे. पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. याबाबत समाज माध्यमांवर कोणीही अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर ॲक्टनुसार कारवाई करण्याचा इशाराही … Read more

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासन झाले सतर्क

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आलेल्या विविध तालुक्यांतील 27 पैकी 25 जणांपर्यंत पोहचण्यात प्रशासनाला यश आले आहे. यात श्रीरामपूरात दुबईहून एकाच कुटुंबातील चौघेजण आले असता त्यांचा शोध घेऊन तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप एक तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा तो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नांगरलेल्या शेतात आढळून आले मृत अर्भक ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले काही तरी असल्याची माहिती जमीन मालकांना … Read more

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रुग्णांची होतेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला होता. जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने व या ठिकाणी शस्त्रकिया करण्याची सुविधाही नसल्यामुळे जखमींनी खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मोहटा देवी मंदिर व डॉ. सदावर्ते भागात रविवारी पहाटेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: निवृत्त सैनिकाने केला अंधाधुंद गोळीबार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आर्मी मधून निवृत्त झालेल्या सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केला. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास जामखेड रोड वरील करांडे मळ्यात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी महिलेची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये … Read more

भाजपचा झेंडा पुन्हा एकदा अकोले नगरपंचायत वर फडकविला जाणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी मंत्री वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिकक्य व बहुमताने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायत वर फडकविला जाणार असा विश्वास माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केला. अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन पिचड यांचे नेतृत्वाखाली … Read more