अहमदनगर ब्रेकींग: पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अन्न प्रशासन व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गोवा कंपनीचा गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. बोल्हेगाव उपनगरात आदेश लाॅन जवळ रात्री दोन वाजता ही कारवाई केली. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा असून मोजदाद सुरू आहे. बोल्हेगाव उपनगरात गुटखा असलेला टेम्पो उभा असल्याची माहिती अहमदनगर शहर अन्नसुरक्षा … Read more

धोका वाढला ! महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’ चे एवढे रुग्ण आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचा, ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसत आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात 5 ओमायक्रॉन रुग्ण होते, मात्र आता संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटचे आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची … Read more

शहरात वाहतुक कोंडी मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी दंड वसूल करण्यात मग्न…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहाता शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीमुळे दुचाकीस्वार व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यातच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येतात. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी राहाता शहरातून जाणार्‍या महामार्गावरून जातात. परिणामी अवजड वाहनांमुळे राहाता शहरात मोठ्या … Read more

धक्कादायक! चक्क 27 वर्षीय जावयाने केला 45 वर्षीय सासूवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- सासू-जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राज्यातील ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. 27 वर्षीय जावयावर त्याने त्याच्या 45 वर्षीय सासूवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावई देखील … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील माधव पवार … Read more

तिला नगरला आणले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गिरीश सुनील वरकड (रा. बुरूडगाव रोड, नगर) या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान अधिक माहिती अशी कि, गिरीश … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले..कटकारस्थाने ऐवजी लोकांची कामे करण्यावर भर देतो

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राजकारण म्हंटले कि आरोप – प्रत्यारोप हे होणारच. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून चांगलीच चिखलफेक झाल्याचे देखील पाहायला मिळते. नुकतेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या काही विरोधकांना चांगलाच दम भरलेला इशारा दिलेला आहे. राजकारणात आम्ही कटकारस्थाने ऐवजी लोकांची कामे करण्यावर भर देतो. मात्र, काहीजण पराभवाच्या नैराश्यातून अजून … Read more

एसटीच्या आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना 20 लाखांची मदत द्या

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. यातच राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. दरम्यान अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एसटीच्या ज्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटूंबियांना 20 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड … Read more

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव: महिन्याभरानंतरही सर्वकाही अस्पष्ट

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागण्याच्या दुर्घटनेस आज महिना झाला आहे. मात्र महिनाभरानंतरही रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची परिस्थिती आहे, तशीच आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या चौकशी समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला. मात्र आगीचे कारण काय, त्रुटी कोणत्या?, हा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला की, नाही? हे देखील स्पष्ट … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले आणखी १२ प्रवासी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात १५ प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले हाेते. आता आणखी १२ आंतरराष्ट्रीय प्रवाशी आले असल्याची माहिती समाेर आली आहे. कराेनाच्या नवा ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर देशात काळजी घेतली जात आहे. केंद्र व राज्य सरकार अलर्ट झाले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या … Read more

अवकाळीला मात देत जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अवकाळी पावसावर मात करत जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 4 लाख 8 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 92 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे. यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यावर मोठा परिणाम झालेला आहे. … Read more

जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींकडे ग्रामविकास निधीचे कोट्यवधींचे कर्ज थकीत

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेल्या जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीचे कर्ज थकीत आहे. यात 93 लाखांची मुद्दल, तर 39 लाखांच्या व्याजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्ज 10 वर्षे ते 26 वर्षांपासून थकीत आहे. या 21 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने 1 कोटी 35 लाख 60 हजार रुपयांचे … Read more

याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आम्ही राजकारण व कटकारस्थानाच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो. काहीजण मात्र पराभवाच्या नैराश्यातून अजुन बाहेर पडलेले दिसत नाहीत. म्हणूनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे. पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला, तर … Read more

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका ! ‘त्या’ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मानव विकास परिषदेच्या तालुका महिला अध्यक्ष सारिका बारगुजे यांनी केली. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन चोरणारा आरोपी पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावाच्या शेडमध्ये ठेवलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या ६ क्विंटल (१२ गोण्या) सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना येथे घडली. गुरुवारी( २ डिसेंबर) सांयकाळी बाजार समितीच्या लिलाव शेडमध्ये सुमारे १५० गोण्या होत्या. सदर ठिकाणी डबलसिंग करणशिंग थापा हा रात्री वॉचमन म्हणुन ड्युटीवर होता. बाजार … Read more

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना मदतीसाठी हेल्पलाइन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये अनेक कुटुंबातील नागरिक दुर्दैवी मृत्युमुखी पडले आहे.काहींचा आधारस्तंभ गेल्याने त्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे यांना राज्य सरकारने खारीचा वाटा म्हणून ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तरी दुर्दैवी मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी ऑनलाइन … Read more

२०२२ मध्ये लग्न करतायचे आहे ?जाणून घ्या शुभ मुहूर्त ..

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- सहसा तुळशीचे लग्न आटोपले की लग्नाचे वारे वाहायला सुरुवात होते, पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे.त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल. जर तुमच्या कुटुंबातही यंदा कर्तव्य असेल तर जाणून घ्या २०२२ च्या सर्व १२ महिन्यांत लग्नासाठी कोणते … Read more

खंडित वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा ‘या’ तालुक्यातील शेतकरी घेणार ‘जलसमाधी’

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राज्यातील काही भागांमधे वीज बील न भरता, त्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे.त्यामुळे महावितरणला शेवगाव तालुक्यातील देखील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच किसान महासभा, कम्युनिस्ट पक्ष शेवगाव यांच्यावतीने गुरुवार ९ डिसेंबर रोजी ढोरा नदीत शेतकरी संघटनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकरी जलसमाधी घेणार … Read more