ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा पत्रकारितेचा प्रवास अखेर थांबला!

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फसवणूकीचा नवा फंडा; सात जणांनी घातला ७ कोटी ६९ लाखाला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून बिग मी इंडिया कंपनी अंतर्गत फंडपे वॉलेटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून 61 लोकांना सात कोटी 68 लाख 64 हजार पाचशे रुपयाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात कंपनीशी संबंधित सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

बायकोने नवऱ्याला बॅटने धोपटले, पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथा बूक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नूकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने थेट पोलिस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. नंदू लक्ष्मण आघाव वय ४७ वर्षे, राहणार रेल्वे … Read more

५८ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट जवळ आज दिनांक ४ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवर बसलेल्या तांदुळवाडी येथील बेबीताई म्हसे या जागेवरच ठार झाल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेतील मयत बेबीताई सुर्यभान म्हसे वय ५८ वर्षे या आज दिनांक ४ डिसेंबर रोजी … Read more

शिविगाळ करू नका म्हंटल्याचा राग आल्याने एकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-   आमचे घरचे लोक इथे राहतात. तूम्ही आप आपसात शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडलीय. या मारहाणीत देवीदास सरोदे हे जखमी झाले आहेत. राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील भाजपचे हे बडे नेते अडचणीत ! सुनेने केलाय गंभीर आरोप…..

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री … Read more

सौरभ चौरेला न्याय मिळवा या मागणीसाठी शहरात कॅण्डल मार्चचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील लोखंडी कमानीवर जाहिरात लावताना वीजेचा धक्का सौरभ चौरे या युवकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान चौरे युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, संबंधीत जाहिरात ठेकेदार व जबाबदार असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. दरम्यान नालेगाव येथील चौरे यांच्या राहत्या घरापासून या कॅण्डल मार्चची … Read more

महत्वाची बातमी ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज ४ डिसेंबर रोजी एमपीएससी प्रशासनाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एमपीएससी परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे – पूर्व परीक्षा – 2 जानेवारी 2022 … Read more

अवकाळी पावसामुळे पाठीवर बिऱ्हाड घेऊन जगणाऱ्या ऊसतोड मजुरांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  राज्यासह नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, जिल्ह्यात ऊस पीक जास्त असल्याने जोमाने तोडणी सुरू होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊसतोड बंद झाली आहे. जीवन जगण्यासाठी ऊसतोड मजूर इतर राज्यातून आपल्या कुटुंबासमवेत आले आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात … Read more

आपल्या लफड्याची माहिती तुझ्या पतीला देईल म्हणत महिलेवर केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील जेऊरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 20 नोव्हेंबर 2021 रा काळात माझ्या राहत्या घरी गोविंद अण्णा मोकाटे (रा. जेऊर, इमामपूर, ता.नगर) राने … Read more

दैव बलवत्तर म्हणून ३० प्रवासी बालंबाल बचावले !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  राहाता तालुक्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन जबर अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी चार वाजता निघाली होती. नगर मनमाड महामार्गावर राहाता … Read more

नेत्यांनी घोटाळ्यातील पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या अनेक नेत्यांवर त्याच सोबत मंत्र्यांवर घोटळ्याप्रकरणी आरोप करत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे आपण बघत आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी औरंगाबादचा दौरा केला होता, यावेळी त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या … Read more

जे व्हायला नको तेच होतंय ! ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण… आरोग्य विभागात माजली खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- करोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणारा ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये या प्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात माजी सरपंच महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  मांजरी रोडवरील रेल्वे स्टेशन येथे ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या अपघातात तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई सुर्यभान म्हसे (वय ५८) या झाल्याची घटना घडली आहे. उसाचा भरलेला ट्रॅक्टर शनिवारी दुपारच्या वेळी राहुरीच्या दिशेने चालला असता तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई म्हसे नातवासोबत मोटारसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे गेटच्या वळणावर मोटारसायकलचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मोकाटे हा पीडितेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असे, जर तू कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देत होता. त्या भीती पोटी पीडित … Read more

दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्‍यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मंत्रीमंडळात बसलेले मंत्री आम्‍ही शेतक-यांची मुले असल्‍याचे छातीपुढे काढून मोफत वीज देण्‍याची भाषा करीत होते, परंतू आता तेच बांधावर जावून शेतक-यांचे वीज कनेक्‍शन कट करत आहेत. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्‍यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही. पीक विमा कंपन्‍या शेतक-यांना फसवत राहील्‍या तरी सरकार धिम्‍म … Read more

नगरपंचायतचे नगरपरीषदेत रुपांतर होण्याचा निर्णय शिर्डीकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहराच्या भविष्याचा विचार करताना सर्व राजकीय मतभेद विसरून पदाधिकारी ग्रामस्थ एकत्र येतात. या गावाची विकास प्रक्रीयासुध्दा आशाच विचाराने झाली. नगरपंचायतचे नगरपरीषदेत रुपांतर होण्याचा निर्णय देखील शिर्डीकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय आहे, शिर्डी शहराच्‍या भविष्‍यावरच सर्वांचे भवितव्‍य अवलंबून असल्‍याने सर्वांच्‍या संमतीने होणा-या निर्णयाबरोबर राहा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

साताऱ्यातील प्रसिद्ध म्हसवडची यात्रा रद्द… ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे झाला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ अधिक आक्रमक झाल्याने म्हसवड यात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more