‘ओमिक्रॉन’ कोरोना व्हायरसने टेंन्शन वाढवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- ‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. हा विषाणू डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या व्हायरसचा धोका लक्षात घेता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या … Read more

‘ओमिक्रॉन’ विषाणू प्रतिबंधासाठी काळजी घेणे आवश्यक ! परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची …

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त श्रीमती वर्मा-लवंगारे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा … Read more

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, गोटुंबे आखाडा (ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मच्छिंद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, कोपरगाव) यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. पोकळे यांनी कोपरगाव … Read more

बिग ब्रेकिंग : हे नेते म्हणाले लवकरच राज्यात सत्तांतर !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  गेल्या दाेन वर्षांत महाराष्ट्र खूप मागे गेला आहे. महािवकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यात अराजकता माजली आहे. प्रत्येक घटक नाराज आहे. त्यामुळे भाजपाला राज्याच्या विकासासाठी पुढे यावेच लागणार आहे. लवकरच राज्यात गनिमी काव्याने सत्तांतर घडवून आणणार असल्याचे विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत … Read more

काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला; सजगता बाळगा, लसीकरण पूर्ण करून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी … Read more

विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर ऍट्रॉसिटीसह रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास विद्यालयातील विद्यार्थी मित्राचा वाढदिवस विद्यालयाच्या … Read more

‘ही’ मुलगी होणार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची सून ! पहिल्यांदाच होतंय असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्याकडून राजकीय सोयऱ्या- धायऱ्यांच्या(सोधा) परंपरेला ब्रेक देण्यात आला आहे. त्यांचा मुलगा अक्षय यांच्यासाठी कर्डीले यांनी बिगर राजकीय सोयरीक केली आहे. कापूरवाडी येथील फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातील मुलगी कर्डीले यांची सून होणार आहे. १ डिसेंबर रोजी अक्षय कर्डिले व प्रियांका कासार यांचा साखरपुडा नगर … Read more

महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती. भ्रष्‍टाचाराने सरकार पूर्णपणे बरबटले गेले आहे. कोणत्‍याही समाज घटकाला हे सरकार न्‍याय देवू न शकल्‍याने या सरकारने माफीनाम्‍याच्‍या जाहीराती प्रसिध्‍द केल्‍या पाहीजेत अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली. महाविकास आघाडीला दोन वर्षे पुर्ण … Read more

आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नगर-कोपरगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर-कोपरगाव महामार्गावर पिंपरी निर्मळ व बाभळेश्वर गावाच्या सिमेलगत हॉटेल सतलजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यु झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ- बाभळेश्वर शिवेजवळ हॉटेल सतलजच्या जवळ कोपरगाव कोल्हार महामार्गाच्या कडेला हे मृत हरण आढळले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या हरणाचा मृत्यु झाला … Read more

कोरोनातील मृतांच्या वारसांना केंद्राने ४ लाखाची मदत द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोरोनात अनेक कुटुंबातील कर्ता, नातेवाईकांचा मुत्यू झाला. त्यांच्या वारसांना ४ लाख रुपये देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. बराच कालावधी होऊनही केंद्राने अद्याप पैसे दिले नाही. केंद्र सरकारने तातडीने ३ लाख तर राज्य सरकारने १ लाख रुपये द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चिकनगुनिया सदृश रुग्ण संख्येत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या घटत असताना आता साथीच्या आजाराने डाेकेवर काढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चिकनगुनिया सदृश्य आजारांच्या रुग्णांत वाढ हाेत आहे. आराेग्य विभागाने मात्र अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत असले तरी ते तुरळक असल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून काेराेना … Read more

अज्ञातांकडून बसवर दगडफेक; गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हाटेल जयराजश्री जवळ शनिवारी सकाळी ९.३० वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ या शेवगाव डेपोच्या बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसचालक बसतो त्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे. ही बस शेवगावकडून नेवासेकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माय-लेकराचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील आदिवासीबहूल भागातील मान्हेरे येथील पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीत विवाहिता गंगुबाई यशवंत गभाले (३१) व विवाहितेचा मुलगा ज्ञानेश्वर यशवंत गभाले (५) या माय-लेकाराचा बुडून मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले … Read more

अहमदनगर शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी कदम यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी कदम यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान बायोडिझेल प्रकरणात नाव आल्यानंतर माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांना शहरप्रमुख पदावरून दूर केले होते. त्यानंतर शहरप्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार यांची चर्चा जोरदार सुरू होती. यापुर्वी ही संभाजी कदम यांनी शहर प्रमुखपद योग्य रितीने सर्वांना … Read more

माझ्या मुलाला का मारले? जाब विचारणाऱ्या महिलेला दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांच्या भांडणावरुन माझ्या मुलाला का मारले असा जाब विचारणा-या विधवा महीलेला काठीने जबर मारहाण केली असल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथे घडली आहे. दरम्यान पोलिस घरी जाताच आरोपी घराला टाळे ठोकुन व पसार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शोभा कारंडे यांची मुले व शेजारीच राहणारा … Read more

गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल – डिझेलचे दर काय आहेत?

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… विना वीजमीटरच शेतकऱ्यास पाठविले लाखोंचे वीजबिल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मीटर नसतानाही अकोले तालुक्यातील राजूर वीज मंडळ अवाच्यासव्वा बिल पाठवत असल्याचे उघड झाले आहे. वीज कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी विनंती करूनही बील भरावेच लागेल असे सांगत आहेत. राजूर येथील शेतकरी हेमंत गणपत देशमुख यांनी विहीर मोटारसाठी मीटर बसवून द्यावे अशी मागणी आठ वर्ष सहायक कार्यकारी अभियंता … Read more