….. म्हणून ‘त्या’ महिलेचा कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याचा इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   ग्रामसेवकाने पदाचा गैरवापर करून आपल्या जागेची नोंद दुसर्‍याच्या नावाने लावून अन्याय केला आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जर या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याचा इशारा पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील हौसाबाई साळवे यांनी … Read more

कामचुकारपणा केल्यास कारवाई अटळ …. उपमहापौर भोसले यांचा इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पारा पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. यापुढील काळात प्रत्येकाने व्यवस्थित काम करावे, अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, वेळ पडल्यास निलंबित केले जाईल.असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला. नुकत्याच … Read more

बसस्थानकातील प्रवाशाला लुटणारा पारनेरचा एकजण जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बस स्थानकात मध्यरात्री बसस्थानकात प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन संजय जाधव (रा. आळकुटी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी, हिंगोली येथील निलेश जाधव हे नारायणगाव बस स्थानकात त्याचे दोन साथीदार बसची वाट … Read more

अरे बापरे ! सराफ व्यावसायिकाचे हात पाय बांधले अन…..ते देखील भरदिवसा

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  सध्या राज्यात नेमके काय चालले आहे हेच कळायला मार्ग नाही. भर दिवसा चोरी, घरफोडी, अत्याचार, यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. नागपुरात भरदिवसा सोन्या चांदीच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर दुकानदाराला बांधून मारहाण करून ओलीस ठेवत चौघांनी दरोडा टाकला. या दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने … Read more

बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं होतील हे अपेक्षित नव्हतं

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केलं नव्हतं, अशी टीका टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. दोन दिवसांच्या वादळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीबीआय, ईडी यांच्यामार्फत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या कारणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील मोहन बंडू वाघ, वय ७० या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, सून व नातू असा परिवार आहे. मागील आठवड्यात वाघ यांना एका राष्ट्रियकृत बँकेची कर्ज बसुलीबाबत नोटीस आली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले … Read more

माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून…

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. 67 वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने धोब्याने माजी केंद्रीय … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात घोटाळ्याचा उलगडा करा

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- राफेल फायटरजेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. परंतु मोदी सरकारने चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी होते, मग भारतात का नाही, असा सवाल करून सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी … Read more

पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाला मोफत बी बियाणे व खतांचा पुरवठा करावा

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. यातच पावसाची अद्यापही काहीच शक्यता दिसत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्यावर ओढवले आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला असल्याने शासनाने या शेतकर्‍यांना मोफत बी बियाणे व खतांचा पुरवठा करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी … Read more

कर्तव्यात कसूर असलेल्या तलाठी व मंडलधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा…

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे मुरुम-मातीचे बेकायदा उत्खनन करून चोरी केल्या प्रकरणी तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी नंदिवाला समाजाचे लोक व जेऊर हैबती ग्रामस्थ यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तसेच सदरच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी … Read more

बसंतीसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी त्याचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- कुद जाऊंगा मर जाऊंगा असे ऐकले कि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर शोले सिनेमाचा तो सिन लगेच उभा राहतो. असेच एक शोले स्टाईल आंदोलन राजगुरूनगर मध्ये झाले आहे. मात्र हे आंदोलन बसंतीसाठी नव्हे तर लाखोंचा पोशिंदा बळीराजासाठी करण्यात आले होते. जगलो तर तुमचा, नाही तर शेतकऱ्यांचा’ अशी भावना आपल्या पत्नीकडे व्यक्‍त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ९ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून , तपासाची सुई कुटुंबीयांकडे ! प्रमुखाला घेतले ताब्यात..

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   नेवासे तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारीजवळ डोके छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. सोहम उत्तम खिलारी (वय १०, रा. चिखली, जि. बुलडाणा, हल्ली वरखेड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. सोहम हा गेल्या सात वर्षांपासून … Read more

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी … Read more

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती.आता तीही संपली असल्याने लवकरच शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यांची जाहीर केली जाणार आहे. या नव्या विश्वस्तांच्या यादीत कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचेलक्ष लागून आहे. साईबाबा विश्वस्त मंडळातील नव्या विश्वस्तांची यादी … Read more

बँकेकडून तगाद्याची नोटीस मिळताच कर्जदाराने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  एका वृध्द शेतकर्‍यावर बँकेचे आठ लाख रुपये कर्ज होते. बँकेकडून नोटीस मिळाल्यानंतर त्याने पाच दिवसांपूर्वी विषारी पदार्थ सेवन केले होते. काल औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हि घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे घडली आहे. मोहन बंडू वाघ (वय 75) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, … Read more

रुग्णांची ऑक्सिजनसाठीची वणवण थांबणार; शिर्डीचा ऑक्सिजन प्लांट झाला सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने प्रत्येका जरजर करून सोडले आहे. यातच दुसर्या लाइटच्या प्रकोपामुळे राज्यासह जिल्ह्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले. याच धर्तीवर शिर्डीत तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. अखेर रिलायन्स फाउंडेशन यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ … Read more

विद्यार्थ्यांचा परीक्षा फी बाबत विखेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला आहे. यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क हा मुद्दा समोर आला आहे. आता याच मुद्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फी माफीबाबतची मागणी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

घरी परतणाऱ्या तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  शेतातील काम उरकून घरी जात असताना बिबट्याने हल्ला करून एकास ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील झोळेकर वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास घडला आहे. संतोष कारभारी गावंडे (वय 45) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ओकले तालुक्यातील धुमाळवाडी, … Read more