खा.राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन कार्यक्रमाने उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये असंख्य कोरोना योद्ध्यांनी नगर शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीतून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वेंटिलेटर मिळवून देणे, प्लाजमा मिळवून देणे, जेवण पुरविणे, गरजूंना किराणा किट उपलब्ध करून देणे आदी केलेली जनसेवा ही मन भारावून टाकणारी असल्याचे प्रतिपादन शहर … Read more

संपूर्ण नगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कोणत्या प्रभागांमध्ये दोन दिवसानंतर तर कोणत्या प्रभागांमध्ये चार दिवसानंतर पाणी सुटते हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही लाईट पाणी रस्ते व नागरी सुविधा तत्पर देणार व उपनगर असलेल्या सावेडी परिसरात वाढणारी लोकसंख्या पाहता अनेक … Read more

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर जॉगींग पार्कच्या हिरवळीवर नागरिक आले एकत्र

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर जॉगींग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी एकत्र येत योग, प्राणायाम केले. यामध्ये रमा फाऊंडेशन व मानस प्रतिष्ठानचे सदस्य देखील सहभागी झाले होते. आरोग्याप्रती जागृक राहून दररोज व्यायाम व योग करण्याचे आवाहन ग्रुपच्या … Read more

कल्याणमध्ये सापडला पेपरबाँब!.तब्बल एक कोटीचा साठा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- आजची तरुणाई वेगवेगळ्या नशेच्या आहारी चालली आहे. नशेचे वेगवेगळे पदार्थ शोधले जात आहेत. ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याणमधून तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणा-या एलएसडी पेपर अर्थात ‘पेपरबॉम्ब’ या ड्रग्जचा तब्बल एक कोटीचा साठा जप्त केला. ड्रग पेडलर्स पुन्हा सक्रिय :- या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल एक हजार ४६६ … Read more

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मुलीचे लग्न… लाडक्या मुलीला निरोप देताना …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये काल दुपारी पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित … Read more

देशात गेल्या २४ तासांत ५८,५६२ नवे रुग्ण व ‘इतक्या’ रुग्णांच्या मृत्यूची नोंद !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- देशात गेल्या २४ तासांमध्ये ५८,५६२ नवे रुग्ण आढळले. मागील ८१ दिवसांत ६० हजारांहून कमी आढळलेला हा नीचांकी आकडा आहे. तर दिवसभरात ८७,४९३ रुग्ण बरे झाले असून देशात सध्या ७ लाख २४ हजार एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे. दुसरीकडे, गत २४ तासांमध्ये … Read more

पारनेर तालुक्यातील खासगी सावकार लंके विरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबाजी गयाजी लंके यांच्याविरोधात बेकायदा खासगी सावकारी केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. निघोज येथील टपाल कर्मचारी नवनाथ लंके यांनी बाबाजी लंके यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर पुढील १८ महिने दरमहा अडीच हजार रुपये व्याज वसूल करण्यात आले. … Read more

चोरांनी हद्दच पार केली ! नगर तालुक्यात भूईमुगाच्या …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना नागरिकांना आता भुरट्या चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतीच एका शेतकऱ्याच्या शेतातील पाच गोण्या भुईमुगाच्या शेंगा चोरून नेल्याची घटना देहरे येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील देहर येथील शेतकरी विजय विठ्ठल लांगडे यांनी त्यांच्या शेतात भुईमुगाचे पीक घेतले आहे. … Read more

रेशनिंग अवैध धान्यसाठा प्रकरणी आरोपीना ‘इतक्या’ दिवसांची कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर शहरामध्ये रेशनिंगचा गहू व तांदळाचा अवैध साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि.२४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश श्रीनिवास झंवर ,जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, संदीप पागिरे, … Read more

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा एन्काउंटर…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- जम्मूतील सोपोरमधील गुंड ब्राथ येथे लष्कराच्या जवानांनी रविवारी रात्री केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर मुदसीर पंडित याच्यासह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचारी, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांच्या हत्येमध्ये कमांडर मुदसीर पंडित याचा सहभाग … Read more

‘साई संस्थानच्या अध्यक्षपदी अँड . ढाकणे यांची नियुक्ती करा’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सध्या चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांची नियुक्ती करण्याची मागणी आता पुढे आली आहे. पाथर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पक्षाध्यक्ष शरद … Read more

‘विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळू नये; अशी प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- राज्यातील विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा आहे, अनेक वर्षे मराठा नेत्यांकडे मुख्यमंत्रीपद असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. बिगर मराठा नेते देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. संगमनेर तालुक्यातील साकूर … Read more

वादळाने भाजीविक्रेत्याच्या गाडीवर झाडाची फांदी पडली मात्र…!

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहक तारेवर झाडाची फांदी पडली. याच झाडाखाली भाजीपाला विकणारे ज्ञानदेव ताजणे यांच्या गाडीवर झाडाची फांदी पडल्यामुळे भाजीपाल्याचे व गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने इतर कोणाला दुखापत झाली नाही. लॉकडाऊनपासुन आश्वी बुद्रूक गावातील बाजार बंद झाल्यामुळे तसेच ताजणे मळ्यातील भाजीविक्रेते जास्त असल्यामुळे गावातील … Read more

योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेतोय : पंतप्रधान मोदी

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. ते … Read more

परवानाधारक दारू विक्रेत्यांना दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात दारू विकणाऱ्या दुकानांना तसेच डी-सील आउटलेटना त्वरित कामकाज करण्यास परवानगी देण्याचे निर्देश दिले. दुकानांना ऑपरेट करू द्या. तुम्ही कोणतीही कारवाई केली तरीही मागे घ्या, असे न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने सांगितले. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करताना … Read more

अहमदनगर शहरात पार्कींगमधून मोटारसायकल चोरली

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, केडगाव येथील अंबिकानगर परिसरातील आदित्य रेसिडेन्सी मध्ये राहणारे प्रसाद दिनकर खेडकर यांनी त्यांची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १६ बीए ६२७७) पार्कींगमध्ये लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती लंपास केली आहे. ही … Read more

लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नेवासे शहरात नगरपंचायत मार्फत कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या अनुषंगाने आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच शासनाने यासाठी नगरपंचायतीला उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कार्यालयात वाढदिवस साजरा करणे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसीलदारांच्या अंगलट आला आहे. गेल्यावर्षी त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा धाब्यावर बसवत, चक्क नेवासा तहसील कार्यालयातच दणक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस यंत्रणेला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने देण्यात आली. … Read more