सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्याला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींसंदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री … Read more

दुष्काळ मुक्तीची गावाची चळवळ देशातील तरुणाईला प्रेरणादायी- आमदार सदाभाऊ खोत

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार सदाभाऊ खोत यांनी नुकतीच दिनांक २० जून २०२१ रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना आमदार खोत पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीचा हिवरे बाजारचा संदेश देशातील तरुणाईने घेतल्यास … Read more

पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका कोरोनामुक्त करणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शेवगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून, लवकरच गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे, कोरोनाची ही लाट ओसरत असली तरी सर्वांनी सतर्क राहून आगामी तिसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करून तालुका कोरोनामुक्त करावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीजभैया घुले यांनी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-साकत-जामखेड रोडवरील सावरगाव शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात अनुज आजिनाथ लांबरुड (रा. लांबरवाडी, ता.पाटोदा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १८ जून रोजी जामखेड पोलिस ठाण्यात अण्णासाहेब अर्जुन पठाडे (रा. चिंचपूर, ता.आष्टी, जि.बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आजिनाथ काशिनाथ लांबरुड यांनी … Read more

अहमदनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-एमआयडीसीतील दांगट मळ्यात १७ ते १८ जून दरम्यान घरफोडीची घटना घडली. नवीनकुमार पांडे यांच्या घरी ही चोरी झाली. श्री.पांडे यांच्या घरातील २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अण्णा कुऱ्हाडे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), गणेश भगवान कुऱ्हाडे व आकाश डाके या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद … Read more

मुलींनीच केले आईवर अंत्यसंस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हिंदू समाजातील अंत्यसंस्काराच्या पद्धती गरूड पुराण प्रमाण मानून अवलंबल्या जातात. मृत व्यक्तीवर पुत्राने, तो नसेल तर पत्नीने, पत्नी नसेल तर भाऊ, दोघेही नसतील तर भावाच्या पुत्रांनी आणि कोणीच नसेल तर पुरोहिताने अंत्यसंस्कार करावेत, अस म्हटलंय. यात पत्नीचा उल्लेख आहे. पण, नंतरच्या काळात स्त्रियांना अधिकाधिक दपडण्याच्या मानसिकतेमधून ते मागे … Read more

बिबट्याचा शेळीवर हल्ला, ठसे आढळल्याने …

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील सरगडवस्तीवर गुरुवारी रात्री बिबट्याने शेळीवर हल्ला केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जवखेडे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वतावरण आहे. सरगरवस्ती परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी केले आहे. … Read more

लग्नघरातून आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी,सीसीटीव्हीत चोरटे कैद

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कुकाणा येथील शामसुंदर धोंडीराम खेसे यांचे घरातून चोरट्यांनी सोन्याच्या २३ तोळे दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळवला. काल शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. खेसे यांच्या मुलाचे रविवारी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप टाकलेला … Read more

रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर ! आ. काळे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-महाआघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदारसंघातील जिल्हा हद्द रस्त्याच्या (प्रजिमा ५) १६ किलोमीटर अंतराच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. याबाबत पत्रकात आमदार काळे यांनी म्हटले, की कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट … Read more

आ. आमदार विखेंच्या प्रयत्नांनी फळउत्पादकांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्­ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्­या मागणीची मुख्­यमंर्त्यांनी दखल घेतली असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्­याचा निर्णय घेतल्­याने फळपीक उत्­पादकांना दिलासा मिळून या योजनेत सहभाग घेण्­याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्­य सरकारने पुनर्रचीत हवामान आधारित … Read more

मास्क न घालणारे नागरीक व व्यापाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नेवासा शहरात मास्क न घालणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. अजून कोरोना गेलेला नाही, नियमांचे पालन करा, असे आवाहनही नगरपंचायतच्या टीमकडून करण्यात येत होते. मास्क नसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिकारी गुप्ता, वाघमारे, कडपे, कार्यालयीन कर्मचारी … Read more

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी- सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राम्हणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि. १९) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी, कोल्हार, सात्रळ, सोनगाव, पाथरे, हनमंतगाव या प्रवरा पट्ट्यातील … Read more

… तर चालू हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकते

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाचे संकट दूर होत असतानाच शेतकरी राजाला वेध लागलेत ते खरीप हंगामाचे. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टयामध्ये सर्वदूर खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भात,नागली,वरई आदी बियाणे पेरून रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी वरुण राजाची आतुरतेने वाट पाहत आहे. रोपे तयार होण्यासाठी आणि त्यांची … Read more

अगस्तीचा हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अगस्तीचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य म्हणून प्रबोधन मोहिमेला तात्पुरती स्थगिती देत असून व्यवस्था परिवर्तनाची लढाई मात्र नेटाने पुढे घेऊन जाणार असल्याचे समन्वय समितीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा बैठकीत जाहिर केले. येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीस आ.डॉ किरण लहामटे,जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत,बी.जे.देशमुख कारभारी उगले,बाजीराव दराडे,मारुती मेंगाळ,पोपट येवले,विनय … Read more

मराठा आरक्षण : पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सोलापुरात ४ जुलैला उग्र मोर्चा काढणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी सोलापूरात उग्र मोर्चा काढणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढूच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. या मोर्चात मराठा समाजच नाही तर शेतकरीही सहभागी होणार … Read more

चिंता वाढली : महाराष्ट्रात आढळले डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण; पाच रुग्ण एकाच जिल्ह्यातील

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महाराष्ट्रात SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले. यपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले, परण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी … Read more