नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेणे आणि त्या सोडविण्याचा प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणी संदर्भात … Read more

आ.रोहित पवारांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेयं’

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवारांना ते स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय, त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी, १८ जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी कायदा पास करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करा, हल्लेखोर व्यक्तींवरील खटले फास्ट … Read more

घरी रहा, सुरक्षित रहा व सोशल डिन्स्टन्सिंग पाळा : बिपीन कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काेराेना आजाराने थैमान घातलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जीवघेण्या आजाराने तालुक्यातील अनेकांचे बळी घेतले, कोरोना लॉकडाउनमुळे आर्थिक जीवनमान अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा न करता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनतेस घरी रहा सुरक्षित रहा, … Read more

काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा जप्त ! तब्बल ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला रेशनिंगच्या तांदूळ व गव्हाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत … Read more

राजेंद्र नागवडे यांनी सभासद हिताची दखल घेतली नाही…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०१९-२० मध्ये उसाअभावी बंद असल्यामुळे कारखान्याला तोटा झाला. तो झालेला तोटा भरून काढण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम पूर्ण झालेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेली एफआरपी कमी करून द्यावी, अशी मागणी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शासनाकडे करणे … Read more

सरकारी कामात अडथळा, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बागेत मोकाट जनावरे सोडल्याने पिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. ते अधिक होऊ नये म्हणून ती मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात असताना बागेचा रखवालदारास मारहाण करण्यात आली. शिवीगाळ केली गेली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वरवंडी येथील चौघाजणांविरुद्ध नोंदवण्यात … Read more

केवायसी अपडेटच्या नावाखाली सव्वा लाखास गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- केवायसी अपडेटचे आमिष दाखवून बीएसएनएल कंपनीतील निवृत्त टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटला एका भामट्याने सव्वा लाखास गंडवले. रमेश रामराव देशमुख असे फसवणूक झालेल्या निवृत्त असिस्टंटचे नाव आहे. देशमुख हे बीएसएनएल कंपनीत टेलीकॉम टेक्नीकल असिस्टंट म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे एसबीआय बँकेत पेन्शन खाते आहे. १५ जून रोजी रात्री आठ ते … Read more

राणे म्हणतात, सुरुवात केली वाघांना घेऊन, पण शिवसेना संपणार कुत्र्यांमुळे…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे, असं ट्वीट भाजपा नेते निलेश राणे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला. … Read more

फादर्स डे : कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करणाऱ्या ‘पांडुरंगा’ने घेतले १५ अंध मुलांचे पालकत्व…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असतानाही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारले आहे. पांडुरंग उचितकर असे या व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग उचितकर यांचे वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील रहिवाशी आहेत. केकत उमरा येथे पांडुरंग हे पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत … Read more

एकीकडून सात लाखाचा हुंडा घेऊन दुसरी सोबतच थाटला संसार…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- परळी येथील एका मुलीच्या बापाकडून सात लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडाही पार पडला. मात्र संबंधित फसवणूक करणाऱ्या डॉक्टरने सात लाखाचा होंडा घेऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. संदीप वसंतराव मंत्रे असे त्या वैद्यकीय … Read more

जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल सरकारमधील मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता यांनी दिला. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पुण्यात होणाऱ्या शिबिराला २५० ते ३०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारच या शिबिराला कार्यकर्त्यांना उपस्थित … Read more

मंदिरेही असुरक्षित, चोरट्यांनी ‘या’ मंदिराची दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केली. देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बहिरवाडी येथील कालभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडला. त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या मंदिरामागील … Read more

अडचणीत सापडलेल्या विभागनियंत्रकांनी तक्रारदाराची केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत नगरचे एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते यांची चौकशी केली. याचा राग धरून गिते यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांची तक्रार माहिती आयुक्तांकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे … Read more

पैशासाठी विद्यार्थ्यांचा छळ सुरु; ऑनलाईन शाळेसाठी ऑनलाईन पैसे भरा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाची स्थिती असली तरीही शाळांकडून फीची मागणी केली जात आहे. ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने सर्व शाळांनी ऑनलाईनच प्रवेश सुरू केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरावी यासाठीही तगादाही लावला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम केला. एवढे सगळे सुरु असतानाही शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थी व पालकांकडून … Read more

घरातील कपाट उचकटून चोरटयांनी तब्ब्ल नऊ लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- एका घरातील उचकटून चोरटयांनी बावीस तोळे सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा ८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली आहे. याबाबत शामसुंदर धोंडिराम खेसे (रा. कुकाणा, ता. नेवासा) यांनी याबाबत नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीची … Read more

घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर एकाकडून हत्याराने वार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर आरोपी अशोक गुलाब आढाव याने हत्याराने वार करून जखमी केले. दरम्यान ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत देवराम मिखाईल आढाव (रा. मानोरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी अशोक गुलाब … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा गेला बळी

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. अन्न व पाण्याच्या शोधात या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे या घटना सातत्याने घडत आहेत. यातच रस्त्यांमध्ये व्हॅनच्या वर्दीत प्राणी सापडले तर त्यांना जीवाला देखील मुकावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव … Read more