लाॅकडाउन संपलेला नाही, फक्त काही अटी शिथिल; मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-कोरोनाअजून संपलेला नाही. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार झालेल्या युवतीने मानसिक त्रासातून केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- बलात्कार झालेल्या एका युवतीने मानसिक त्रासातून स्वत: चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. … Read more

शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प , साई मंदिर खुले करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प … Read more

शिक्षक दांम्पत्यांचा वृक्षरोपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- शिक्षक दांम्पत्यांनी वृक्षरोपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. जुनी पेन्शन योजना संघर्ष समितीचे राज्य सचिव व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे व सविता कार्ले-हिंगे यांनी वाळूंज (ता. नगर) येथे वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर या वृक्षाचा मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचा संकल्प केला. हिंगे दांम्पत्यांनी लग्नाच्या वाढदिवासानिमित्त इतर … Read more

वनस्पती शास्त्र विषयात प्रा.निशा गोडसे यांना पी.एच.डी पदवी प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रा.निशा गोडसे यांना वनस्पती शास्त्र विषयात पी.एच.डी पदवी प्राप्त मुंबई विद्यापीठांतर्गत पी.एच.डी संशोधनासाठी दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या सहकार्याने प्रा.निशा गोडसे यांना वनस्पती शास्त्र विषयात औषध उपचारासाठी उपयोगी वांशिक वनस्पतीच्या प्रजातीचे प्रमाणीकरण यावर नुकतीच पी.एच.डी प्राप्त झाली आहे … Read more

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोणाच्या महामारी मध्ये रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून इगलप्राईड चाणक्य चौक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती … Read more

रेमडेसिविर काळाबाजार : व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने जिल्हा प्रशासनास स्मरणपत्र देण्यात आले. तर या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिव व … Read more

वासुंदे ते खडकवाडी रस्ता दुरुस्ती कामाच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- वासुंदे ते खडकवाडी (ता. पारनेर) रस्ता दुरुस्ती कामाच्या गैरकारभाराची चौकशी जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप करुन सदर प्रकरणाची त्वरीत चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. … Read more

रविवार पासून बत्ती गूल 36 तास लाईट नसल्याने नागरिक संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- शहरातील काटवन खंडोबा व गाझी नगर भागातील लाईट रविवारी रात्री पासून गेलेली असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. रविवारी संध्याकाळी गेलेली लाईट तब्बल 36 तासानंतर मंगळवारी सकाळ पर्यंत आलेली नव्हती. विद्युत महावितरणच्या कर्मचार्‍यांना संपर्क साधला असता डिपी जळाल्याने लाईट गेली असून, डिपीची दुरुस्ती झाल्यानंतर लाईट येणार असल्याचे सांगण्यात आले. … Read more

टायगर ग्रुप च्यावतीने अहमदनगर शहरामध्ये 2 हजार वृक्षारोपण करून केला शिव राज्याभिषेक दिन साजरा.

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- टायगर ग्रुप अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि आज ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 2 हजार वृक्षांचे वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. टायगर ग्रुप चे जिल्हा अध्यक्ष बंटी भिंगारदिवे म्हणाली की समाजात पर्यावरण संबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन … Read more

लेखी स्पष्टता देऊन शिक्षक, शिक्षकेतरांची संभ्रमावस्था दूर करावी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सीएसआरएफ फॉर्म व एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन) योजनेचे खात्यांचे अंतर्गत समस्या सोडवून आणि लेखी स्पष्टता देऊन संभ्रमावस्था दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण आयुक्त … Read more

पारनेरमध्ये दहशत ! बेदम मारहाण करून वृद्धाला…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- पारनेर शहरातून सिद्धेश्वरवाडीकडे, मोपेडवरुन घरी परतणाऱ्या बाबासाहेब गबाजी नरोडे (वय ६५) यांना मोटारसायलवर आलेल्या तीन भामट्यांनी आडवून बेदम मारहाण केली. नरोडे यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम तसेच मोपेड घेऊन ते पसार झाले. जखमी नरोडे यांच्यावर पारनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुुमारास ही घटना घडली. … Read more

जेव्हा ‘रक्षक’च ‘भक्षक’ होतो… अहमदनगर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यातील हेड कन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने रात्रीच्या सुमारास कामावर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर मैत्री करण्याचा दबाव आणून विनयभंग केल्याची तक्रार महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठून केल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. या पोलिस हेड कॉन्स्टेबलने रात्रपाळीत सेवेत कार्यरत असतानाच त्या … Read more

अनलॉक होताच मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अत्यावश्यक सेवा वगळता तब्बल सव्वा दोन महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली राहुरीची बाजारपेठ सोमवारी सकाळी खुली झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. शहरातील बाजारपेठ तसेच नगर-मनमाड राज्य महामार्गावरील दुकानात जमलेली गर्दी पाहता राहुरीकरांना कोरोनाची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. अनलाॅकचा निर्णय होताच सोमवारी राहुरी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. शहरातील … Read more

गोविंदराव आदिक यांनी नेहमी सामाजिक विकासाचे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- स्व.गोविंदराव आदिक यांनी वैयक्तिक फायद्याचे राजकारण न करता सामाजिक विकासाचे राजकारण केले. त्यामुळेच श्रीरामपुरात एसटी कार्यशाळा, टाकळीभान टेलटँक, अनेक पाझर तलाव, एसटी स्टँड, एमआयडीसी, न्यायालयाची इमारत, विविध प्रशासकीय कार्यालये येऊ शकले. मात्र, चितळी टेलटँक आणि बीसी नाला या प्रकल्पाचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. … Read more

भविष्यातील संकट ओळखून ‘या’ घटकांचा समावेश फ्रंटलाइन वर्कर म्हणून करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- सरकार 45 वर्षे वयोगटाच्या पुढील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करत आहेत ही बाब समाधानाची आहे. परंतु फ्रंटलाइन वर्कर म्हणून ग्रामीण भागातील अनेक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ग्रामीण भागामध्ये फ्रंटलाइन वर्कर अनेक घटकांचा … Read more

उपशाखाधिकाऱ्यानेच केली तब्बल दीड लाखाची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- बचत खात्याचे पैसे गोळा करून बँकेत न भरता दीड लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखेचे उपशाखाधिकारी राहुल बाळासाहेब गोडसे (भरीतकरमळा) याच्यावर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखेची शहरातील गणेश नगर येथे शाखा आहे. बचत गटांना या बँकेमार्फत कर्ज पुरवठा होतो. … Read more

व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने लसीकरणासाठी उडाली झुंबड

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी लसीकरण हेच प्रमुख हत्यार बनले आहे. यामुळे कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी धावपळ करत आहे. यातच सोमवारपासून राज्यात अनलॉकला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी व्यापाऱ्यांना लसीकरणाची सक्ती करण्यात आल्याने लसीकरण केंद्रावर व्यापाऱ्यांची लसीकरणासाठी मोठी झूबंड उडाली होती. निगेटिव्ह अहवाल असल्यानंतरच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार … Read more