दुकानाच्या छताचे पत्रे कापून चोरटयांनी 50 हजारांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- लॉकडाऊन कार्यकाळ दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आकडेवारी दिसून येत आहे. यातच चोरी, लुटमारी आदी घटना तर सर्रास घडू लागल्या आहेत. यातच नेवासा तालुक्यातील देवगडफाटा येथे एका मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे कापून आत प्रवेश करुन 50 हजार रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक … Read more

मुसळधार पावसामुळे पेरणी पूर्व मशागीच्या कामाला अनकूल स्थिती निर्माण झाली

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले शहर व परिसराला काल रविवारी सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसाने अकोले व परिसराला सुमारे तास दीड तास चांगलेच झोडपले. या मुसळधार पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. शहर व परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील कारखाना रस्त्यावरील वाहणारे पाणी … Read more

मनुष्यबळाचा अभाव; गुन्हेगारीला आळा घालणार कसा?

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे सर्वसामन्यांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासमोर आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येअभावी गुन्हेगारीला आळा बसविण्यात राहाता तालुक्यातील पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. राहाता शहर पोलीस ठाण्याला 22 गावासाठी फक्त 32 पोलीस कर्मचारी आहे. परिणामी … Read more

लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात लसीकरणाचा मुद्दा हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने लस द्यायची, हे धोरण योग्य नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी लसीकरणाच्या पुरवठ्यावरून केंद्राला … Read more

भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे स्थापनेला येत्या 16 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भूजलाबाबत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण व कार्यशाळेद्वारे माहिती देणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील 50 हजार पदवी, पदव्युत्तर भूगर्भशास्त्र, भूगोल, कृषी विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना … Read more

आमदार निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये शुभ मंगल सावधान….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्व निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान आज दोन जोडप्यांनी पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्येच लग्न केले आहे. लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड सेंटरला मदत केली आहे. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी भव्य कोविड सेंटर उभारले … Read more

करंजी घाटातील धोकादायक वळणावर ट्रक उलटला

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कारंजी घाटातील धोकादायक वळणावर एक ट्रक उलटल्याची घटना आज घडली आहे. दरम्यान सुदैवाने या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली आहे. मात्र या अपघातात ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईहून नागपूरकडे सुमारे वीस टन कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला ट्रक … Read more

फडणवीस…संभाजीराजेंपाठोपाठ आता महसूलमंत्री शरद पवारांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणमध्ये विविध घडामोडी पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये सध्या भेटीगाठी सुरु आहे. या भेटीगाठी वाढल्यांमुळे राज्यातील राजकारणात चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीचे सत्र सुरुच आहे. खा. संभाजीराजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ … Read more

राज्यात बंदी मात्र तरीही गुटखा विक्री सर्रास सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री खुलेआम सुरू होती. नुकतेच राहुरी पोलिसांनी राहुरी फॅक्टरी परिसरात छापा टाकून सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख याच्या खोलीमध्ये आरोपी पोपटलाल भंडारी (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) … Read more

शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल’

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी डाळिंब उत्पादकांना दिला आहे. मंत्री तनपुरे यांची तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी, सरपंच अमोल वाघ, राजू शेख, अरुण वाबळे, मधुकर म्हस्के, बापू देशमुख व काही शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब … Read more

गुंतवणूकदार मालामाल ! सेन्सेक्सची घोडदोड सुरु

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यामुळे गेली अनेक दिवसांपासून मार्केट मध्ये अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे दिसताच तसेच अनलॉक झाल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे गडगडला बाजार आता पुन्हा एकदा सावरू लागला आहे. आज सकाळी शेअर … Read more

विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील दामू उंदरू पाटील यांची म्हैस विजेचा धक्का लागून दगावल्याची घटना समोर आली आहे.सदर घटना रविवार दिनांक 6 जून ला सकाळी ८ वा. सुमारास घडली आहे. दामू पाटील यांचा परंपरागत दुग्धव्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास म्हशी माळरानावर चरत असताना अचानक पडलेल्या जिवंत विजेच्या तारेमध्ये … Read more

शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात गुन्हेगारी वाढली आहे. चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुक्तेश शहरातीक दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरातील तपोवन रोडवरील ढवणवस्तीवर बिरोबा मंदिराजवळ असलेल्या निता सुनील आव्हाड यांचे बंद घर फोडून सात हजारांची रोख … Read more

अनलॉक ! शहरातील शुकशुकाट रस्ते पुन्हा गजबजले

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे लॉकडाऊन अनेकदा कठोर निर्बंध लावण्यात आले होते. नुकतेच कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती काहीशी सुरळीत होत असल्याने जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. यामुळे शुकशुकाट असलेली शहरातील रस्ते पुन्हा एकदा गजबजले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा … Read more

गुटखा विकणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र राज्य सरकारचा आदेश न पाळता राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू होती. ५ जून रोजी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख … Read more

मोठी बातमी ! देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मिळणार मोफत लस

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट आणि लसीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवणार असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावेळी मोदी म्हणाले कि, राज्य … Read more

माझ्या दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना देतो… आता तुझा काटा काढतो

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक शिवारात एकाने दुसऱ्या व्यक्तीस डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकाजणाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, परेश माधव मुळे (रा. धांदरफळ बुद्रूक) हा त्याच्या घरासमोर त्याचा मित्र भाऊसाहेब संपत कानवडे … Read more

केंद्राची मोठी घोषणा; 80 कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडकडीत निर्बंध लादले आहेत. या काळात गरीब जनतेला अथवा हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामेरे जावे लागत आहे. या गरीब जनतेसाठी केंद्र … Read more