४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या पुण्यातील हॉटेल चालकाला लाखाचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लाॅकडाऊन असतानाही हॉटेल सुरू ठेवून ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या पुण्यातील हॉटेल मालकाला महापालिकेने १ लाख रुपयाचा दंड ठोठावला. पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनमध्ये ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल चालकाकडून करण्यात आल्याने, महापालिकेने हॉटेल मालकाकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईची … Read more

घरफोडी चोरी करणा-या आरोपीस २४ तासात गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी २४ तासात जेरबंद केला आहे. आरोपी शाबाज सलीम शहा (वय -२२ रा. काझीबाबारोड वार्ड क्र.२ श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार ह्या घरफोड्या संशयित आरोपी … Read more

जर शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतले तर कारवाई अटळ..! उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर जी छापील किंमत आहे.त्याच किमतीत ती खते विका. जर या किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून अवश्य घ्यावी,गरजेप्रमाणे खरेदी करावी. विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा व दर दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत. अशा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी … Read more

पोलिसांवर जमाव हल्लाप्रकरणी आणखी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संगमनेर शहरातील तीनबत्ती चौकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने गस्ती पथकावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांची जामीनावर सुटका झाली असून आज पहाटे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी एका दिवसाच्या पोलीस कोठडीत केली आहे. … Read more

‘मला पर्यटनाची हौस नाही, आम्ही लोकांना मदत करत असल्याने विरोधक निराश’

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मी पर्यटनमंत्री जरी असलो तरी पर्यटन करण्याची मला हौस नाही. काही लोक फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देतात. आमचा हेतू लोकांना मदत करण्याचा आहे आणि आम्ही मदत करीत असल्याने विरोधक निराश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करत राहावी’, असं प्रत्युत्तर पर्यटन मंत्री तथा मुंबई शहर उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे … Read more

सुजित झावरे यांना कोविड सेंटरमधील महायज्ञ भोवणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. भाजप नेते सुजित झावरे यांनी याच कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता. या वैज्ञानिक प्रकारा विरोधात आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाले असून तक्रार दाखल झाली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कौतुकास्पद उपक्रम : व्हाॅटसअप ग्रुप तयार करुन गाय व म्हशीची ऑनलाईन बाजार !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे एक हजाराहून अधिक म्हशीची विक्री होवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र आता कोरोना संसर्गाची स्थितीमुळे तीन महिन्यापासून बाजार बंद असल्याने हजारोंची रोजीरोटी थांबली आहे. घोडेगावसह, चांदे, सोनई, शनिशिंगणापुर, लोहगाव, झापवाडी, शिंगवेतुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतक-यांनी व्हाॅटसअप ग्रुप … Read more

पोलीस व महसूल पथकाचा वाळू तस्करांवर हल्लाबोल; वाळूच्या तीन गाड्या पकडल्या

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करी सुरु असताना पोलीस व महसूल पथकाने छापा टाकून बाळूच्या गाड्या पकडल्या. मात्र यातील दोन गाड्या अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नायगाव येथे रात्री गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार प्रशांत … Read more

निळवंडे कालवा ! उदघाटन झाले, गुन्हे दाखल झाले मात्र काम ठप्पच

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र कालव्यांअभावी लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या प्रलंबित अंत्य कालव्यांचे गेल्या महिन्यात दोनदा भूमिपूजन झाले. मात्र अद्याप या कामाला सुरवात झालेली नसल्याने लाभधारकांमधुन संताप व्यक्त होत आहे. कालव्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधीची … Read more

आ.रोहित पवार यांनी सांगितली देशातील लसीकरण लवकर होण्यासाठी आयडीया !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठीक ठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या … Read more

शहरात सोमवारपासून ‘या’ व्यक्तींचे लसीकरण सुरू करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लसीचा तुटवडा असल्याने गेल्या दोन दिवसापासून बंद असलेले नगर शहरातील लसीकरण उद्या म्हणजेच सोमवारी सुरु होणार आहे. मात्र उद्या 45वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे. अशांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे. आतापर्यंत नगर शहरांमध्ये … Read more

मराठा समाज आक्रमक ! ५ जूनला पहिला मोर्चा निघणार…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मराठा आरक्षण संदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच’, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व … Read more

चोरटयांनी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  मनमाड रोडवरील देहरें शिवारातील टोलनाक्या जवळील हॉटेल अर्जुन अँड परमिटरूमच्या खिडकीच्या फळ्या तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला आतील सुमारे 62 हजार रुपये किमतीची विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याबाबतची अधिक माहिती अशी की, देहरे येथील अर्जुन नामदेव काळे (वय.33 राहणार पांढरे वस्ती देहरे ) यांचे मनमाड … Read more

असे आहे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण , वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात आज २७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ऊसाच्या शेतात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील कौठा शिवारातील गट नंबर १५८ मधील विहीरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले असून आरोग्य पथकाला घटनास्थळी जाईपर्यंत नवजात अर्भक गतप्राण झाले. आरोग्य विभागाने त्यांस मृत घोषीत केले. या घटनेने कौठा चांदा परिसरात मोठी खळबळ उडाली असून या अमानुष घटनेचा पोलिसांनी तपास … Read more

अहमदनगरकर घरातल्या मुलांना सांभाळा ! चोवीस तासांतील कोरोनाबाधित मुलांचा आकडा वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण … Read more

गॅस वितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-गॅस वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची लसीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच अत्यावश्यक सेवांमधील फ्रंटलाईन वर्करना लसीकरण करणे गरजेचे अाहे. अत्यावश्यक सेवेमध्ये दुर्लक्षित असलेले परंतु अत्यंत महत्त्वाचे कार्य करणारे सर्व जनतेच्या पोटपाण्याची काळजी करणारे गॅस वितरण कंपनीचे कर्मचारी या काळात दुर्लक्षित आहेत. महामारीच्या काळात नेवासे तालुक्यातील … Read more

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी … Read more