गरीब कुटुंबांना किराणा वाटप श्री योग वेदांत सेवा समितीचा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- सतत वाढत असलेले लॉकडाउन घराबाहेर पडण्याची सोय नाही. डोक्यावर छप्पर नाही. रस्त्याच्या कडेला पालावर राहणारे असे अत्यंत हालाकीच्या परीस्थीतीत अनेक कुटुंब आहेत. महामारीच्या काळात अनेकांसमोर रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे .अशा परिस्थितीत जायचे कुठे खायचे काय असा प्रश्न हातावर पोट असणा-याना भेडसावतो आहे. हीच गरज लक्षात घेऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा हनीट्रॅप ! क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून मागितले ३ कोटी…

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनीट्रॅप प्रकरणामुळे आता चर्चेत येवू लागला आहे. मागील आठवड्यात नगर तालुक्यातील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर हनीट्रॅप ची वेगवेगळी प्रकारणे समोर येत आहेत. क्लासवन अधिकारी ब्लॅकमेल :- नगर तालुका पोलिसांनी उघडकीस … Read more

संतापजनक : प्रसिध्दीसाठी तहसीलदारांनी तो अंत्यविधी केला, मुलगा व नातेवाईक येत असताना देखील परस्पर अंत्यविधी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील तहसीलदार यांनी कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याने त्यांनी स्वत: अंत्यविधी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यम व वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. पारनेर तहसिलदार यांनी वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ नका सांगून स्वत:च अंत्यविधी उरकून प्रसिध्दी मिळवून त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोडदे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे … Read more

युवकाचा खून केल्याप्रकरणी 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जमिनीच्या वादातून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40 वर्षे) यांना नऊ आरोपींनी मारहाण करून त्यांचा खून केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत आप्पासाहेब मारुती चंदने हे आपल्या घरासमोर असतांना गैरकायद्याची … Read more

चक्रीवादळाच्या तडाख्याने फळबागांचे नुकसान; शेतकरी हैराण!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते चक्रीवादळाचा राज्यातील अनेकभागात फटका बसला आहे. या वादळाचा नगर तालुक्यातील बहुतांशी भागाला देखील तडाखा बसला आहे. यात प्रामुख्याने कांदा व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासुन अनेक भागातील वीज गायब झाली आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेला बळीराजा चक्रीवादळाच्या तडाख्याने पुरता हैराण झाला आहे. पावसाळा तोंडावर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अरबी समुद्रातील चक्री वादळाचा फटका अकोले तालुक्याला बसला.तालुक्यातील कळस बु येथील सुलतानपूर , गणोरे , येथे प्रत्येकी एक तर भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील मुतखेल येथे पाच घरे अवकाळी पावसाने पडले. सुदैवाने मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी … Read more

‘त्या’ सात पोलिस कर्मचाऱ्यांचा काळ आला होता पण वेळ…!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगरहून पुण्याच्या दिशेने सिमेंट घेऊन निघालेला ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील अहमदनगर जिल्हा हद्दीवरील चेक पोस्टजवळून गेल्याने यावेळी बंदोबस्तासाठी असलेले सात पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले. नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे जिल्हा सरहद्दीवर बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत वाहन तपासणीसाठी तात्पुरती … Read more

लसीकरणामध्ये डाक कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या! पोस्टल कर्मचारी संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- डाक विभागाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असून, कोविड काळातही डाक विभागातील सर्व सेवा सुरळीतपणे चालू आहेत. डाक विभागातील कर्मचारी सर्व सेवा पूरवत आहेत परंतु शासनाने फ्रंट लाईन वर्कर मध्ये डाक विभागाचा समावेश न केल्याने कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये  प्राधान्य मिळत नसल्याने लसीकरण करून घेणेसाठी कर्मचाऱ्यांना मोठया त्रासास सामोरे जावे लागत आहे … Read more

श्रीरामपुरात आतापर्यंत 10 हजाराहून अधिक कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरु असला तरी आता कोरोनामागी होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे, यामुळे काहीशी दिलासाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात 168 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1538 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची … Read more

कारवाईसाठी आलेल्या पथकाला पाहून भाजीविक्रेते सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- सांगूनही ऐकत नसल्याने तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात राहाता शहरात करवाईच बडगा उगारण्यात आला आहे. राहता शहरातील चितळीरोड वरील भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांची् धरपकड करून त्यांचे वजनकाटे जप्त करण्यात आले. राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने रोजगार नसल्याने अनेक जण भाजीपाला विक्री करत आहेत. कारवाई मुळे भाजी … Read more

मायेचे छत्र हरपलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स गठित

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जणांनी आपले प्राण देखील गमवाल आहे. यातच काही ठिकाणी अक्षरश कुटुंबे उद्धवस्त झाली. तसेच काही ठिकाणी माता- पिता गमावलेले बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट् शासनाच्या … Read more

धान्याचा काळाबाजार प्रकरणातील सहा जणांची जामिनावर मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अकोले तालुक्यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या चार ट्रक राजुर पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. यातील आरोपीनवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. याच सहा आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात राजूर पोलिसांनी एकामागे एक येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांचा माल वाहतूक करणाऱ्रे चार … Read more

बेजबाबदार सांगूनही सुधारत नसल्याने अखेर प्रशासन उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्याला कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. याला तोडण्यासाठी व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन अहोरात्र सेवा बजावत आहे. एकीकडे हे सगळं असताना काही ठिकाणी नागरिक बेफिकिरी सोडायला तयार नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. यासाठी अखेर प्रशासन पुढे सरसावले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी … Read more

नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच सुरु आहे पशुधनाचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांचे लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. यातच नागरिकांचा जीव जसा महत्वाचा आहे, त्याचबरोबर पशु पक्ष्यांचा देखील जीव महत्वाचा आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात … Read more

मंत्री तनपुरेंना बाकीची कोविड सेंटर दिसली नाहीत का?

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी कोविद सेंटरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. मात्र मंत्री तनपुरेंचा असाच एक दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे. राज्यमंत्री तनपुरे यांनी काही कोविड सेंटरलाच … Read more

चक्रीवादळाचा महावितरणला फटका तब्बल ३ हजार २८६ रोहीत्र पडले बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते या चक्रीवादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह जिल्ह्यात देखील मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून, अनेक भागातील  वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी बहुतांश भागील वीजपुरवठा तात्काळ सुरु करण्यात आला तर अनेक भाग सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. वाऱ्याची … Read more

काय सांगता : या पंपावर रुग्णवाहिकेस मिळतेय मोफत पेट्रोल!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र या सर्व अडचणीच्या काळात देखील जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज ५० लिटर इंधन पूर्णपणे मोफत देण्याचा … Read more

बाहेर विनाकारण फिरले तर पोलिसांकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा प्रसाद !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- विनाकारण घरातून बाहेर पडत असाल तर मग पोलिसांच्या त्या अनोख्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. याकामी राजूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली असून, आता मोकार फिरणाऱ्यांवर कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. राज्यात वाढत्या कोरोना संक्रमांचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.शहरी भागातून आता ग्रामीण भागातही कोरोनाने … Read more