धोका लक्षात घेऊन ‘या’ तहसीलदारांची कार्यतत्परता !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते वादळामुळे भयावह परिस्थिती असून या वाऱ्याचा फटका सहारा शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने संपूर्ण हॉल बंदीस्त करण्याच्या सूचना दिल्यानंतर अवघ्या काही तासात ज्या भागातून वारा आत शिरतो तो भाग ग्रीन शेडने बंदीस्त केल्याने सर्व रुग्णांनी सुटकेचा निश्वास … Read more

बालकांच्या काळजीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठीत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे, तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता … Read more

दोन वर्षांपासून धूळखात पडलेले मशीन लवकर रुग्णांच्या सेवेत दाखल होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-नगर महानगरपालिकेचा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे मनपा रक्तपेढीतील लाखो रुपयाचे प्लाझ्मा निर्मिती मशीन धूळखात पडून आहे. हे मशीन लवकरात-लवकर सुरू करण्यासाठी मनपा आरोग्य समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे. यामुळे लवकरच हे मशीन सुरू होणार आहे. दरम्यान, आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मनपाच्या रक्तपेढीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मशीन … Read more

गुड न्यूज : अखेर कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन … Read more

शिक्षकाने मुलीचा वाढदिवस साजरा केला कोविड सेंटरमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक तन, मन व धनाने आपले योगदान देत असताना, शिक्षकाने आपल्या मुलीचा वाढदिवस कोविड सेंटरमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा केला. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी आपली मुलगी आरवी हिंगे हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व खर्चांना फाटा देत, कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन वाळूंज (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न … Read more

कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- टाळेबंदीचा काळावधी दिवसंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी मोफत देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी जिल्हाधिकारी … Read more

गरजूंच्या दारोदारी व पालावर उदरनिर्वाहासाठी पोहचली युवानची मदत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वाढत चाललेली टाळेबंदी, श्रमिक, कष्टकरी व हातावर पोट असलेल्यांचा गंभीर बनत चाललेला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, दिवस भागवाताना दोन वेळच्या जेवणाची पडणारी भ्रांत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना युवान या सामाजिक संस्थेने १००० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेल्या जीवनावश्यक मदतीने वंचिताच्या चेहर्‍यावर समाधान उमटले. युवान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता असलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे ( वय ३८ वर्षे) याचा मृतदेह आढळून आला. सोपान शिंदेचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सोपान शिंदे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तशी फिर्याद नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी अकरा वाजेच्या सुमारास गावातील एक व्यक्तीला … Read more

तौक्‍ते वादळाचा अहमदनगर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा; मोठ्या प्रमाणात नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे,अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर मध्ये जोरदार सरी बरसल्या. हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस … Read more

तिच्या मोहजालात अनेक अडकले पण दहशतीपोटी कोणी पुढे आलेले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील एका बागायतदाराला प्रेमपाशात अडकवून नाजूक संबंधाचा व्हिडिओ काढणार्‍या तरूणीच्या मोहजालात अनेक जण अडकले आहेत. मात्र तिच्या दहशतीपोटी अद्याप कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे आलेले नाही. यातून बडे हनीट्रॅपचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तरूणीसह एजंट अमोल सुरेश मोरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सरपंचावर अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वर्धापनदिन अंकात रुई ग्रामपंचायतीची शुभेच्छा जाहिरात दिली असता त्याचे पेमेंट मागितले असता देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान रुई गावातील खराब रस्त्याची बातमी छापली असता त्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी रुई ग्रामपंचायतीचे सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी येथील वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाच्या अंकात रुई ग्रामपंचायतीचे … Read more

देशावरील संकटे थांबेनात : कोरोना,चक्रीवादळ आणि आता भूकंपाचे धक्के…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- एकीकडे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळ दाणादाण उडवत आहे. त्यातच देशात दुसरीकडे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. या संकटांच्या काळात अजून एका संकटाचा सामना गुजरातच्या लोकांना करावा लागला आहे. गुजरातच्या अमेरली राजुला भागानजिक सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी … Read more

खासदार राजीव सातव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना शोक अनावर !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर कालच त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. एक तरुण, आश्वासक नेता अकाली गेल्यामुळे सार्वत्रिक हळहळ व्यक्त होत आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी मसोड (ता. … Read more

एकापाठोपाठ एका जीवघेण्या संकटानं दुध धंद्यावर संकटं आणली

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग संकटात सापडले. ग्रामीण भागातील दूध व्यवसायदेखील मरणपंथाला लागला आहे. ढासळलेले दूधदर आणि पाच महिन्यात सुमारे ८०० रुपयांपर्यंत पशूखाद्याचे वधारलेले दर, असे विरोधी चित्र तयार झाल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुर्देवाने या गंभीर प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नाही.दूधउत्पादकांना वाचवण्यासाठी शासनाने दूध उत्पादकांना … Read more

मतदार यादीनुसार लसीकरण करा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन तेथील मतदार यादीनुसार लसीकरण करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील मांजरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २० गावांच्या दक्षता समितीच्या प्रतिनिधींसमवेत ना. तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more

गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला आरोग्य विभाग वैतागला!

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावपुढा-यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला वैतागले असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन गावपुढा-यांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला असुन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्व:ताच्या कुटुंबाचा विचार न … Read more

राजकारण्यांनी देखील स्वत:ची काळजी घ्यावी !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाची दुसरी लाट अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरत असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आरोग्य विभागासह राज्यातील सर्वच पक्षातील नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी या महामारीमध्ये सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेते मंडळींना देखील आपला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वा-याच्या थैमानाने जनजीवन विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातही बसत आहे. या वादळी वा-याच्या थैमानाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर … Read more