अखेर पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले पण किती ? वाचा इथे क्लिक करून

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुस‍ऱ्या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती कमी झाल्यामुळे मंगळवारी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोल २२ … Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपीवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीस गती दिली असून घरोघर जाऊन ते वीज खंडित करण्याचा धाक दाखवून वीज बिल भरण्यास धमकावत आहेत. अशीच वसुली करताना वीज ग्राहक व महावितरणच्या अधिकाऱ्यां कडाक्याचे भांडण झाल्यावर ते पोलीस ठाण्यात पोहचवून सरकारी कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल अकोल्यातील महालक्ष्मी कॉलनीतील रहीवासी … Read more

आमदार साहेब,शेतकऱ्यांना नादी लावू नका

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना तत्कालीन सरकारने थेट जमीन खरेदीच्या पर्यायात रेडीरेकनरच्या पाच पट रक्कम मोबदला देवून समृद्धी नेच शेतकऱ्यांना समृद्ध केले. जमिनी अधिग्रहणचा कायदा झाल्यामुळे आता बुलेट ट्रेनसाठी जमिनी अधिग्रहित केल्यास त्या शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर मोबदला मिळेल. समृद्धीचा मोबदला माझ्यामुळेच मिळाला आणि आता बुलेट ट्रेन साठी सुद्धा मीच जादा … Read more

चांदबिबी महाल परिसरात पुन्हा बिबट्या !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-चांदबिबी महालाच्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी काही जणांना बिबट्या दिसला. या भागात फिरायला जाणारे नगरमधील सुनील माळवदे यांच्या कारला बिबट्या आडवा पळाला. त्यांनी या बाबत व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सदस्य मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना माहिती दिली. बिबट्याचा या भागात वावर असला … Read more

भाजपकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सत्ता हातातून गेल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न कमी आणि स्वतःचे प्रश्न जास्त उपस्थित करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे. भाजपचे हे वागणे लोकशाहीसाठी घातक आहे. पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो जणू तशीच अवस्था सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपची … Read more

थकबाकी नसलेल्या ग्रामस्थांना मिळणार विनामूल्य दळण

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीमध्ये नव्याने पदभार स्विकारलेल्या सरपंच कमिटीच्यावतीने गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 31 मार्चपर्यंत आतापर्यंतची सर्व व पुढील वर्षाची आगाऊ घरपट्टी व पाणीपट्टी भरा व मोफत दळण दळून न्या, असा कर वसुलीचा अजब फंडा तालुक्यात ग्रामपंचायतीने काढला आहे. सरपंच सागर मुठे यांच्या कमिटीने गावात नाविन्यपूर्ण उपक्रम … Read more

घासाच्या पिकात मृत बिबट्याचा बछडा आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्या सर्वाधिक आढळून आला आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे घासाच्या पिकात मृत बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हनुमंतगाव येथील हनुमंतगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन रामनाथ पाबळे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून … Read more

ह्या ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड लसीचा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राहता तालुक्यात गेल्या महिनाभरापासून करोनाने कहर केला असून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आठ दिवसांत सर्वाधीक रुग्ण बाधित झाले असून सरकारी व साई संस्थानचे कोव्हिड सेंटरबरोबर खासगी कोव्हिड सेंटरही हाऊसफुल्ल झाले आहे. यातच तालुका प्रशासनासमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. राहाता ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून कोव्हिडची लसच … Read more

आगीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीच्या ‘या’ प्रवासात मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्री ११ ते सकाळी ५ यावेळेत मोबाईल, लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग … Read more

लॉकडाऊन असतानाही राहात्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या काही दिवसापासून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला असून सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्यायन राहात्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊन असूनही तालुक्यातील रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाही आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 79 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सर्वाधीक 18 रुग्ण साकुरीत … Read more

आकडेवारीमधील वाढीनंतर नागरिक झाले जागरूक; लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या काही दिवसापासून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला असून सर्वाधिक रूग्ण शिर्डी, राहाता व लोणीत सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राहाता पालीकेने सात दिवस शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. राहाता, साकुरी व पिंपळसमध्ये केलेल्या सात दिवसाच्या लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्वच व्यवसाय, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. करोनाच्या … Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचा विषय अखेर मार्गी लागला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे. जिल्ह्यात नव्याने 316 तर जुन्या 309 शाळा खोल्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नवी खोल्यांसाठी 28 तर दुरूस्तीसाठी 3 कोटी अशा 31 कोटींच्या निधीचा समावेश आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा आहेत. मात्र त्यातील अनेक … Read more

करोनाची दुसरी लाट : काय असेल अहमदनगरची स्थिती?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-‘’लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकिरी प्रचंड वाढतेय. करोनाची दुसरी लाट आली तर आपल्याला सावरायलाही वेळ मिळणार नाही,’’ असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग व संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे. याला अनुसरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे काही आकडे सांगून दक्षतेचा इशारा दिला आहे. – … Read more

सुखद बातमी, दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत झाली ‘इतकी’ घट

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या महिन्याभरापासून सर्वांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत सोमवारी आिण मंगळवारी घट झाली आहे. २४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. दोन दिवसांत या आकड्यात १२ हजारांनी घट झाली आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले … Read more

दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वारावर केला हल्ला….

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढताना दिसून येत आहे. नुकतेच चांदबीबी महाल परिसरात बिबट्या आढळून आला आहे. तर नुकतेच जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये देखील बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सोमठाणा गावाजवळ मेंढी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पाच दिवस आधीच पित्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मुलीचा पहिलाच वाढदिवस त्यामुळे तो थाटामाटात करण्याचा कोणत्याही पित्याचा प्रयत्न असतो. मात्र पारनेर तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीचा वाढदिवस असल्याने किराणा सामान आणन्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघात होवून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनोद पोपट सोबले (वय २७, जामगाव) असे त्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. सोमवारी रात्री … Read more

अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथे झालेल्या अपघातात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे यांचे निधन झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बोधेगाव दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोकॉ. संपत एकशिंगे हे आज मंगळवारी दुपारी बोधेगाव येथून पाथर्डीकडे दुचाकीवरून जात होते. ते पाथर्डी … Read more

महिलेचा विनयभंग करून पतीला केली मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर शहरातील एका उपनगरात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीसह मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात राजू उर्फ राजेश सुखदेव पवार याच्याविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक … Read more