अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- नगर तालुक्यातील देहरे येथे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेतला. त्यामुळे देहरे परिसरात कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ कुत्र्याचा शोध घेत आहेत. चावा घेतलेल्या रुग्णांवर देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. देहरे … Read more

चाकूचा धाक दाखवून एकास लुटले!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, अनेक लहान मोठे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यामध्ये करण्याबरोबरच मारहाण देखील केली जात आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील राहाता शिर्डी रोडवरील शिव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत लावलेल्या बस मध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्याला चाकु लावुन पॅन्टच्या खिशात ठेवलेली तिकिटाची अठरा हजार … Read more

‘या’ शहरात सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  कोरोना बाधित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने औरंगाबाद शहरात सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणेने चाचपणी सुरू केली आहे. अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. रविवारी सायंकाळपर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद शहरात गेल्या तीन दिवसांत तीनशेपेक्षा … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : टोल द्या अन् घ्या साईबाबांचे दर्शन…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  शिर्डीत जाणाऱ्या भाविकांना आता टोल देऊन श्रीसाईबाबांच्या दर्शन घेता येणार आहे. तसा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयावर भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर घेण्याच्या नगरपंचायतीच्या निर्णयावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाले आहेत. साईबाबा संस्थान शहर स्वच्छतेसाठी दरमहा नगरपंचायतीला 42 लाखांचा … Read more

एकाच दिवसात ह्या तालुक्यात १३ कोरोना बाधितांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत १३ रुग्ण कोरोना बाधित सापडले, तर बेलापूर येथील एका शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षक कोरोना बाधित झाल्याने काही दिवस हे संकुल बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मागील आठवड्यात मालुंजा येथील दहावीची विद्यार्थिनी कोरोना बाधित सापडली होती.त्यावर स्थानिक शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी सात दिवस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईसह चार मुले बेपत्ता !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, आईसह चार मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी ही तक्रार दिली आहे. बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय … Read more

अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार?

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्हा बॅंकेच्या नव्या कारभाऱ्यांसाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. जिल्हा बॅंकेचे नवे कारभारी कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पावणार? … Read more

शेतात उभी असलेली एक लाखाची तूर चोरली!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेला खर्च आणि मिळणारा अल्प प्रमाणात दर यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला आहे. त्यात परत चोरांनी कहर केला आहे. या एका पाठोपाठ येणाऱ्या अडचणीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता तर शेतात उभे असलेले तुरीचे पीक कापून चोरून नेले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथे घडली … Read more

बापरे..! चाचणी न करताच कोरोनाचा अहवाल आला पॉझिटिव्ह!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- लाळेचा नमुना देताच एका जणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रकार घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये. मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे ,याचा यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्याचे रहिवाशी पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते … Read more

वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन पैशांचीच !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- राज्य सरकारने एक एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट दोन टक्के कपात करण्याचा निण्र्य घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व वीज ग्राहकांचा सरासरी बिल दर ७.२८ रुपयोवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार अाहे. सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन … Read more

अर्बन बँक : ‘त्या’ संचालकांची धरपकड सुरु ;एकजण ताब्यात 

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- येथील नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी   पोलिसानी आता दोषींची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार  पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच सोबत इतर संचालकांचाही शोध सुरू आहे. याबाबत सविस्तर असे की, एका कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोर दरोडेखोरांचेच राज्य ! कारने भरलेला कंटेनरच पळवून नेला…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- सध्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संपली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रोज चोरी,लूटमार,खून, अपहरण या घटना घडत आहेत आणि पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या लोकांचे धाडस प्रचंड वाढले आहे. आतापर्यंत महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून लूटमार केल्या जात असल्याच्या रोज घटना घडत … Read more

 …अन्यथा सोमवारपासून बेमुदत गाव बंद ?

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा जर सोमवारपर्यंत तपास लागला नाही तर सोमवार पासून गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी आज एक दिवसाचा बंद पाळला आहे . याबाबत सविस्तर असे की,  जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपर्णाला तब्बल पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणताच सुगावा पोलिसांना … Read more

विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांना देखील कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील विद्यार्थी कोरोनाच्या जाळ्यात सापडले असल्याची बातमी ताजी असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील एका शाळेतील दोन शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत कोरोना … Read more

कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटकेतील डॉ. शेळकेंच्या अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी फसवणूकीच्या तिसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. डॉ. शेळके सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असताना डॉ. शेळके याला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले होते. वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी … Read more

शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या मुहूर्तमेढ 2000 साली प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली. गेल्या 20 वर्षांत सुमारे 1850 हुन अधिक जोडप्यांना विवाहबध्द करून कन्यादान करण्याचे पवित्र काम कोते दाम्पत्यांनी केले आहे. मात्र यंदाच्या वर्षी करोना पार्श्वभुमीवर शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा … Read more

बेपत्ता व्यापारी प्रकरणाचा मुद्दा थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन आतापर्यंत पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवार दिनांक 6 मार्च रोजी … Read more

फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केला जिल्ह्यातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मुद्दा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- संगमनेरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे अपहरण झाले असून याप्रकरणाचा अद्यापही काहीच धागा दोरा पोलिसांचा हाती लागलेला नाही. यामुळे याचा निषेध म्हणून एकीकडे आज बेलापूरात बंद पुकारण्यात आला आहे, तर दुसरीकडे या गंभीर विषयाबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत निवेदन करताना बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण … Read more