भाजपासोबत आम्ही गेलो याचा अर्थ आम्ही निळा झेंडा खाली ठेवलेला नाही…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या … Read more

खुशखबर! ‘ही’ कंपनी 200 लोकांना देणार जॉब

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मामाअर्थ ब्रांड या नावाने पर्सनल केयर उत्पादने विकणारी होंसा कन्झ्युमर प्राइवेट लिमिटेड (एचसीपीएल) ने सांगितले की,  यावर्षी 200 लोकांची भरती करतील. कंपनीने म्हटले आहे की टियर -1 आणि टियर -2 शहरांमधील उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि ऑनलाईन व्यवसायात वेगाने वाढ झाली आहे. एचसीपीएलने सांगितले की यावर्षी त्याचे … Read more

श्रीरामपूरात दर रविवारी कर्फ्यू पाळा !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर मध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मागच्या प्रमाणे दर रविवारी श्रीरामपूर शहरात सर्वांनी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्ष अनुराधा आदिक व ‘मर्चंट’चे अध्यक्ष विशाल पोफळे यांनी केले. तालुक्यात २२ कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वच यंत्रणा सावध झाल्या आहेत. शनिवारी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:ची काळज़ी घ्यावी, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले. आरोग्य सेवा आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत कॅरियर, माय आयडिया कंपनी व स्नेहालय संस्थेच्या वतीने हंगा येथे आयोज़ित मोफत सर्वरोग तपासणी शिबिराप्रसंगी आ. लंके बोलत होते. समुदाय अरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणीत बी. पी. शूगर, … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले राजकारणाचा गुंता आम्ही करत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जागेकरता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही. हे दुर्दैवाने घडले. शेतकरी व बँकेच्या हिताकरिता राजकारणविरहित निवडणूक करण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेच्या … Read more

डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते. … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला भावनिक आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. यात अनेक प्रमुख मंत्री देखील कोरोना बाधित झाले आहेत.यात  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा देखील समावेश आहे. मात्र ते रूग्णालयात असतानाही राज्यातील जनतेला कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवाहन केले आहे. ते म्हणतात की ,वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, … Read more

शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात चौथ्यांदा केली दरवाढ !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाने काल महत्वपूर्ण निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात संघाने गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा वाढ करीत शेतकऱ्यांना १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ३० रुपये प्रतिलिटर तर १ मार्चपासून ३१ रुपये लिटर दर देण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन … Read more

शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- शहरासह जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असून, या गुन्ह्यांतील टोळ्या पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना चेन स्नॅचिंगच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच शहरातील समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी सकाळी ११ वाजण्याच्या … Read more

‘तो’ बायकोला नेहमीच द्यायचा त्रास म्हणून तिने भावासोबत केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पती – पत्नीच्या वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर शनिवारी रात्री एक वाजता घडली. संतोष दत्तु मोरे (वय ४२ रा. वाळुंज ता. नगर) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयत संतोष यांची पत्नी प्रियंका ऊर्फ शारदा संतोष … Read more

दुचाकीवरून पडून एक ठार !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरातील रेल्वे उडड्डानपुलाजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्यामुळे गाडीवरून पडून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली. तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाहनिमित्त निकटवर्तीय नातेवाईक अमोल हरीभाऊ राऊत (वय २३) व तरुण कांदळकर (वय १८) दोघे सामानाची … Read more

महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे टिकेल !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- आदिवासी संशोधन केंद्र हे पुण्यासारख्या शहरात करण्याऐवजी ते आदिवासीबहुल क्षेत्रातच व्हायला हवे. त्यासाठी आपण मोर्चेबांधणी करणार आहोत. टिसचा सर्वेक्षण रिपोर्ट अद्याप सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही. मात्र तो प्राप्त झाल्यानंतर आदिवासी संशोधन केंद्र हे विकासात्मक प्रक्रियेत करण्याबाबत आपण सकारात्मक धोरण स्वीकारू. आमच्यासोबत दोन पक्ष सरकारमधे सत्तेवर असून राज्यातील तीन … Read more

नियम डावलणाऱ्या नागरिकांवर प्रशासनकडून दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव शहर व तालुका क्षेत्रात कोरोना नियमांना डावलणाऱ्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहर व तालुका पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११४ नागरिकांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून एकूण १२ हजार ४०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. दरम्यान; जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा … Read more

व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सकारात्मकता दर्शवली

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- टाकळीभान येथील कमानीपासून घोगरगाव रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण समोपचाराने काढण्यास व्यापाऱ्यांनी साकारत्मकता दर्शविली आहे. दरम्यान उद्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहीम राबवणार होते. टाकळीभान ते घोगरगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रजिमा ६ या मोठ्या वाहतुकीच्या रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी आतिक्रमण केल्याने वाहतुक कोंडी व छोटेमोठे … Read more

रब्बी हंगामातील आवर्तन केले बंद

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  मुळा धरणातून उजव्या कालव्यासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील आवर्तन काल रविवारी (दि.21) बंद करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे आवर्तन शेतकर्‍यांची पाणी मागणी कमी झाल्याने यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. दरम्यान कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे राहुरी तालुक्यातील … Read more

शेतीच्या वादातून भावांमध्ये भांडण; कुऱ्हाडीने केला वार

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-शेतीच्या बांधावरून दोन चुलत भावांमध्ये भांडण झाले. यावेळी प्रशांत गागरे या तरूणावर कुर्‍हाडीचा वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या एकास तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर लोणी येथील रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णालयाच्या अहवालानुसार राहुरी पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा … Read more

शेवगाव तालुक्यात कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मागील काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील कोरोनाची लागण झालेल्या एका ६२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान,वृद्धाच्या मृत्यूनंतरही भगूर आरोग्य उप केंद्राचे कर्मचारी वरुरकडे फिरकले नसल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. … Read more

मुळा नदीत पात्रात 600 क्यूसेकने पाणी झेपावले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-मुळा नदीत अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले आहे. मुळा नदीत पात्रात 600 क्यूसेकने पाणी नदीपात्रात झेपावले. दि. 5 फेबुवारी ला कोतुळ येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे मुळा नदीत धरणाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, उपविभागिय अभियंता … Read more