होणार धमाका ! रिलायन्स जिओ देणार अडीच हजारात 5G मोबाईल

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून एक चांगली धमाकेदार बातमी समोर आली आहे. रिलायन्स जिओ 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5 जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. जेव्हा या स्मार्टफोनचे संचालन वाढेल, हळूहळू त्याची किंमत प्रति युनिट 2,500-3,000 रुपये होईल. सध्या भारतात 5 जी स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत … Read more

म्हणून इंदुरीकर महाराज भाषण न करताच निघून गेले…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या हटके स्टाईलमध्ये कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राजकीय चर्चा असो व इतर विषय महाराजांच्या कृती या सध्या चर्चेचा विषय बनत आहे. नुकतेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. या अनुषंगाने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून मोर्चाचे … Read more

शिवसेना खासदार मुख्यमंत्र्याना विनंती करत करणार हि मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम आहे. यामुळे राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नुकतीच ठाकरे सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली यामध्ये काही गोष्टींना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मात्र मंदिरे बंदच ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. यातच आता शिवसेना खासदार मंदिर … Read more

आयफोनच्या चाहत्यांना खुशखबर; ‘ह्या’ ठिकाणी ‘ह्या’ फोन्सवर मिळत आहे 25 ते 30 हजारांपर्यंत डिस्काउंट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीच्या काळात लोक चांगलीच खरेदी करत असतात. टेक आणि ऑटो कंपन्या या संधीचा फायदा घेण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बरीच सवलत देत आहेत, जेणेकरून विक्री वाढू शकेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उत्सवासाठी विक्री सुरू झाली आहे. जर आपणही या सणाच्या हंगामात नवीन आयफोन विकत घेण्याचा विचार … Read more

‘ह्या’ बँकेत व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार एफडी; सोबत मिळतायेत ‘ह्या’ सुविधाही

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी खास सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेनंतर आता ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर युटिलिटी बिले भरणे, फिक्स्ड डिपॉझिट आणि ट्रेड फायनान्स संबंधित कामे करू शकतात. या सुविधेनंतर लोकांना या सर्व कामांसाठी बँकेत येण्याची गरज नाही. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्यांचे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) खाते उघडू शकतील … Read more

‘नो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय? खरोखरच आपल्याला व्याज आकारले जात नाही कि आपली फसवणूक होते? जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- Amazon व फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात होत आहे. या फेस्टिव सेलमध्ये आपल्याला विविध उत्पादनांवर विविध प्रकारच्या ऑफर मिळतील. याशिवाय विविध बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही विविध प्रकारच्या ऑफर उपलब्ध असतील. बर्‍याच बँका आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑफर करतात. हा जो ‘नो कॉस्ट ईएमआय’चा पर्याय आहे तो फायदेशीर आहे … Read more

‘ह्या’ 5 बँकेतील झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट तुम्हाला देतील स्ट्रॉंग इंटरेस्टसह ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- शून्य शिल्लक बचत खाते अर्थात झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट असे खाते आहे ज्यामध्ये आपल्याला किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नसते. या खात्यांमध्ये तुम्हाला कोणतीही फी भरावी लागणार नाही किंवा ते खाते अकार्यक्षम होण्याची भीती नसते. परंतु काही बँकांचे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आपल्याला अधिक व्याज आणि इतर सर्व बँकिंग सुविधा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 52 हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ ने वाढ … Read more

तेल घेवून जाणार्‍या टँकरला टेम्पोने दिली धडक…. हजारो लिटर तेल गेले वाया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसेवा पुर्वव्रत झाल्या आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था देखील सुरु झाली आहे. यातच महामार्गावर अपघाताच्या घटनां देखील घडू लागल्या आहेत. यातच संगमेनर तालुक्यात एका महामार्गावर तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टेम्पोने धडक दिल्याची घटना आज घडली आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली … Read more

‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट जिल्ह्यात सर्वाधिक

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यामध्ये देखील चांगलीच घट झाली आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यातच जिल्ह्यातील संगमेनर तालुका हा सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेला तालुका म्हणून नावाजला होता. अशा या तालुक्याने स्वतःवरील ठपका पुसत आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने … Read more

जिल्हा वाचनालय या नवीन वेळेमध्ये राहणार सुरु.. जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत राज्यात नवीन नियमवाली जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील ग्रंथालये, वाचनालये सुरु करण्यात आले आहे. यातच शहरातील वाचनालय देखील सुरु करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी आदेशानुसार अहमदनगर जिल्हा वाचनालय सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचकांसाठी खुले राहील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख … Read more

महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार… जाणून घ्या याबाबतची सत्यता

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतची पडताळणी करण्यात आली असून या मेसेजबाबतची सत्यता जाणून घेऊ .. केंद्र सरकारकडून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘पंतप्रधान नारी शक्ती … Read more

खुशखबर! सोनं चक्क साडेपाच हजार रुपयांनी स्वस्त झाले…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावामध्ये चांगलाच चढउतार पाहायला मिळतो आहे. वेगाने भाववाढ होणाऱ्या सोन्याला काहीसा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पाहायला मिळाला. भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं … Read more

मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील नदीला आला पूर

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाची वर्षी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र याच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्यांना, नाल्यांना पूर आला आहे. नुकतीच श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावस कोसळला आहे. पाण्याचा साठा वाढल्याने जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा … Read more

शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागणीसाठी धावली भाजपा; आंदोलनाचा घेतला पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावले आहे. नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा … Read more

कोरोनामुळे मंगल कार्यालय चालक सापडले आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प होते. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात अनेक व्यवसायांना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही व्यवसाय असे आहे कि जे सुरु आहे, मात्र त्यामध्ये दिलेल्या अटी व नियमांमुळे व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यातच जिल्ह्यात मंगल कार्यालये, … Read more

खुशखबर! ‘ही’ बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुष्काळ व चालू वर्षातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतला आहे. त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपये कर्ज शूून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन … Read more

पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरुच; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. बिबट्याकडून बैल, गाय व मेंढीवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये तिन्ही पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून … Read more