कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यवसायिकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :  ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेवंते (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे अपघात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेवंते हे राहुरी फॅक्टरी येथील सराफ व्यावसायिक असून बुधवारी दुपारी नगर- मनमाड रोडवरील विळद शिवारात पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला. राहुरी फॅक्टरी येथील सचिन शेवंते हे त्यांच्या दुचाकीवरून … Read more

‘इतक्या’ रुपयांत भारतात भेटू शकते कोरोनाची लस जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे,या लसीच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्टही सकारात्मक आला आहे,ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या १,०७७ कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्धा जिल्ह्यातील मनोरुग्ण तरुणीवर कल्याण रोडवर वाहनामध्ये अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- एका मनोरुग्ण तरुणीवर अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली … Read more

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- सरकारी कुमक असलेल्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहू शकत नाही, तर राज्यातील महिलांना हे राज्य सरकार संरक्षण कसे देऊ शकेल, पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असून या घडलेले घटनेमुळे कोरोनाच्या परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त … Read more

‘यांच्या’ अट्टहासामुळे अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन होत नाही !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी … Read more

‘त्याच्या’सोबत पत्नीला रंगेहात पकडले, राग मनात ठेवला आणि कुऱ्हाडीने वार करून खूनच केला…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सयाजी वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली. म्हातारप्रिंप्री येथील राजू बबन शिरवाळे (वय ४२) याने पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत उसाच्या … Read more

उस्मानाबाद-अहमदनगर मार्गे पाकिस्तानातील प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रेमवीराचे पुढे काय झाले, वाचा…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. परंतु या वेड्या आशिकाला भारत-पाक सीमेवरुन सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. झिशान सिद्दिकी असे या तरुणाचे नाव असून उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे … Read more

सावधान अहमदनगरकर : एकाच दिवशी जिल्ह्यात वाढलेत ३४१ रुग्ण,पाच जणांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात चार महिन्यांत प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ३४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार २७ झाली. चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला. गेल्या २२ दिवसांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला. आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी शासकीय रुग्णालयातील कोरोना … Read more

अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही पोहोचला कोरोना,आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या गावातही कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. राळेगणसिद्धी गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे … Read more

फोडाफोडीचे राजकारण करणारे दुध प्रश्नाबाबत गप्प का : सुजित झावरे

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- दुधाचे भाव 32 रुपयांवरून 18 रुपयांवर आले. त्यामुळे दुधावर अवलंबून असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे खुराकाचा भाव मात्र कमी झालेला नाही त्यामुळे पशुधन कसे जगवायचे हा दूध उत्पादक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. सत्तेत गेल्यावर लोकांच्या प्रश्नाचा लगेच कसा विसर पडतो हे आश्चर्य आहे. एरवी फोडाफोडीचे राजकारण करणारे दुधाच्या … Read more

भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलन करत होते. त्याकडे मात्र भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. असं सांगत भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान, भाजपच्या … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै  २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर मनापा, जिल्हापरिषद पाठोपाठ आता जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अहमदनगर पोलीस मुख्यालयातील एका कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा झाली आहे. एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने प्रवेश केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना रिपोर्ट आला वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा अहवाल आल्यानंतर मंत्री गडाख होम क्वारंटाइन झाले होते. दरम्यान पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गडाख यांनी तपासणी करून घेतली होती. रात्री उशिरा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंत्री गडाख यांच्या पत्नी पंचायत समिती माजी … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आमदार व तहसीलदार मटण पार्ट्यांना उपस्थित !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचे अनेक नगरसेवक व मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल हे कन्टेनमेंट व बफर झोनमध्ये आषाढ मटणाच्या पार्ट्यांना उपस्थित राहून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत असल्याचे शुक्रवारी अकोल्यातील नागरिकांनी अनुभवले. अगस्ती कारखाना रोडलगत राष्ट्रवादीच्या नवनियुक्त महिलाध्यक्ष व नगरसेविका स्वाती शेणकर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०२५ झाली आहे. नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर … Read more