वाढीव वीज देऊन सरकारने सर्वसामान्यांचे खिसे कापले

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीजबिलं टाकून, त्यांची पठाणी वसुली सुरू आहे. वाढीव वीजबिलांवर जनतेला अंधारात लोटणाऱ्या राज्य सरकारची ही मिजासखोरी असल्याची घणाघाती टीका माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले, की वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंर्त्यांनी केला … Read more

मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माझ्या रुपाने राहुरी मतदारसंघाला मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग करून कोरोना काळातून सरकार सावरताच मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या वर्षात मतदारसंघात होणारी विविध विकासकामे हेच विरोधकांच्या टीकेला उत्तर असल्याचे राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत ना. तनपुरे म्हणाले, तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी … Read more

महाआघाडी सरकारने शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय जनतेला भावले म्हणून महाआघाडीला कौल !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून, ३६ गावांत महाआघाडीला यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केला आहे. बिनविरोध पार पडलेल्या खेर्डे व सोमठाणे खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचे पत्रक ढाकणे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी … Read more

जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. २२ जानेवारी रोजी शक्ती प्रदर्शनात कर्डिले सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत. तालुक्यातील १०९ मतदारांपैकी ८० पेक्षा जास्त मतदारांसह अर्ज दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार शोध सुरू आहे. जिल्हा सहकारी बँकेसाठी … Read more

रोहित पवार यांनी हवेत गोळीबार केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकले आहेत, असे असताना आमच्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या, असे दाखवत रोहित पवार यांनी 80 टक्के जागा राष्ट्रवादीने जिंकल्याची सांगत हवेत गोळीबार केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये केली. 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकालाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार … Read more

हे सगळं धक्कादायक, रेणू शर्मांवर कारवाई करा !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असून हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष भाजपकडून … Read more

लालूप्रसाद यादव तातडीने रुग्णालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रांचीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. अचानक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. बहुचर्चित चारा घोटाळाप्रकऱणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये … Read more

मोठी बातमी ! मंत्री मुंडेंच्या विरोधातील तक्रार महिलेने माघारी घेतली

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. आता या अनुषंगाने एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी … Read more

उपोषण नको, मौन आंदोलन करा; पोपटराव पवार यांचा अण्णांना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, केंद्रीय कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता देणे यासाठी अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोपटराव पवार यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच. आपले आंदोलन शेतकऱ्यांसाठीच आहे. … Read more

कोरोना ! पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी कोरोना लस घेणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेला देशात 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरणात सहभागी होणार असल्याचं … Read more

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ 21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणूकी साठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि.6 … Read more

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले मतभेद विसरुन पुन्‍हा एकदा विकासासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गावाच्‍या विकासाची चावी तुमच्‍या हातात आली आहे. सर्वांना विश्‍वासत घेवून नव्‍या गाव कारभा-यांनी मिळालेल्‍या संधीचे सोने करावे, समाजाच्‍या हितासाठी योजनांची अंमलबजावणी करा आणि ‘स्‍वयं: रोजगाराच्‍या निर्मितीतून गावे आत्‍मनिर्भर बनवा’ असे आवाहन भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍यांचा सत्‍कार आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी साधला खासदारांशी संवाद

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी काल संसदेतील खासदारांशी संवाद साधला. आपल्या देशामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी व शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभा राहिल्या पाहिजे. शेतकऱ्यांसाठी भरवशाचे आणि शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक … Read more

डोनाल्ड ट्रम्प नवा पक्ष स्थापन करणार ? नाव असेल…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झालेले डोनाल्ड ट्रम्प हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. निवडणुकीतील पराभवापासून अस्वस्थ असलेले ट्रम्प आपल्या रिपब्लिकन पक्षाला रामराम ठोकत ‘पॅट्रियाट’ नामक पक्ष काढणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राजकारणात कायम राहणार असल्याचे वक्तव्य केले. आपण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात महिलांच्या हाती सत्तेची चावी

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-ढोरजळगावने (ता. शेवगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत जगदंबा ग्रामविकास मंडळाने सावशिदबाबा मंडळाचा ९-० ने पराभव करून दणदणीत विजय मिळविला. जगदंबा मंडळाच्या ८ महिलांच्या हाती सत्तेच्या चाव्या मतदारांनी दिल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज आले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सावशिदबाबा मंडळाचे नेतृत्व करणारे भाऊसाहेब कराड, ॲड. सदाशिव आरगडे, बाबासाहेब कराड यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस व माजीमंत्री पिचड यांची भेट !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेऊन तब्येतीबाबत विचारपूस केली. यावेळी आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते, आता त्यांची तब्येत ठणठणीत असून ते वरळी … Read more

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या वादावरून रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-सध्या राज्यात शहरांच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाद जुंपले होते. नुकतेच आता या विषयावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार … Read more

MPSC संदर्भातील याचिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातंर्गत 2018 पासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलतं होते. … Read more