ग्रामपंचायत फिवर : ‘त्यांनाच’ दिले जातंय खास निमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-मागील चार पाच महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात गावागावातील रस्ते बाहेरच्यांसाठी बंद करण्यात आले होते. कोरोनाच्या धास्तीने नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात असलेली मंडळी मूळ गावी परतण्यासाठी धडपड करीत होते मात्र त्यांना गावात प्रवेश दिला जात नव्हता. गावी आले तरी मोकळ्या जागेत,शाळेत काही दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात होते. परंतु, आता ग्रामपंचायत निवडणुका … Read more

बुऱ्हानगरसह ५९ ग्रामपंचायती ताब्यात घेणार प्रा. शशिकांत गाडे यांचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-पंधरा वर्षापासून नगर तालुक्यात महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद आणि  पंचायत समितीत आपलीच सत्ता आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा आपण महाविकास  आघाडी केल्याने ६५ % मतदान महविकास आघाडीच्या बाजूने येते. मग बुऱ्हाणनगरमध्ये सुद्धा आपलाच झेंडा असेल. ग्रामपंचायतला महाविकास आघाडी झाल्याने बुऱ्हाणनगरसह नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत महाविकास आघाडीच ताब्यात घेणार … Read more

नगर तालुक्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोर्चेबांधणी

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्यावतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असताना त्याचवेळी तालुक्यात युवक काँग्रेसने संघटनात्मक बांधणीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी लवकरात लवकर तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या आहेत. … Read more

‘तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती’ संजय राऊत यांना गोपीचंद पडळकरानीं दिले पत्रातून उत्तर !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना फेकूचंद म्हटले आहे. त्यावर आता पडळकरांनी उत्तर दिले आहे. पडळकर यांनी राऊतांना एक पत्रच लिहिलं असून त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर पडळकरांनी भाष्य केले आहे. पडळकरांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे … Read more

अजित पवार यांची ताकद असती तर आमदार त्यांना सांभाळता आले असते..

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जे कुणी भाजपचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील,” असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच भाजपातून महाविकास आघाडीत येणाऱ्यांना पुन्हा निवडून आणू, … Read more

जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  करोना संसर्गाची भीती मात्र कायम असल्याने भविष्यातील गंभिर परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाभरातील15 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केले. झेडपी सदस्य परजणे म्हणाले कि, कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील सुमारे 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होत आहेत. … Read more

गड किल्ल्यांकडे सरकारचे दुर्लक्ष; माजी आमदाराचे मुख्यमंत्र्याना पत्र

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  गड किल्ले, पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. मात्र याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे. तसेच या गड किल्ल्यांच्या संवर्धनसाठी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्रही पाठविले … Read more

धार्मिक कामासाठी निधी मिळवा या मागणीसाठी मुख्यमंत्र्याना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली. पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्‍या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार … Read more

खुशखबर ! टोल नाक्यांपासून सुटका मिळणार; गडकरींची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. रशियाच्या मदतीने केंद्र सरकार Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजी वापर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं टोल उत्पन्न 1 लाख 34 हजार 000 कोटींपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. … Read more

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई  जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा 

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयोगाच्या घोषणेसोबत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता जारी झाली आहे. निवडणूक प्रक्रिये दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल ७६७ … Read more

भाजपनेते चंद्रकांत पाटील म्हणाले कोण संजय राऊत?

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज गुरुवारी साईदर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. साईबाबाच्या दर्शनासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांनी यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विषयी विचारले असता कोण संजय राऊत? असा उपरोधिक सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची चांगलीच खिल्ली उडवली. तसेच … Read more

पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा विकासात्मक कामांवर भर द्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे.मात्र त्यांच्या या घोषणेनवरून लंके यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होण्यासाठी अशा गावांना 25 लाखांचा … Read more

पदवी पास झालेल्यांना मिळणार 50-50 हजार रुपये ; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यातील एक घोषणा राज्यातील महिला विद्यार्थ्यांशी संबंधित होती. नितीशकुमार म्हणाले होते की, राज्यात पुन्हा त्यांचे सरकार स्थापन झाले तर पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून ते 50-50 हजार रुपये देतील. आता त्याच्या … Read more

कर्जतच्या स्वच्छता अभियानाला आता तंत्रज्ञानाची जोड

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  कर्जत शहराच्या कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून कर्जत कचरामुक्त करण्यासाठी आता आमदार रोहित पवारांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी त्यांच्या संकल्पेतून सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.मध्यप्रदेशातील इंदौरच्या धर्तीवर या सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्यावर ही प्रणाली काम करणार … Read more

मंत्री तनपुरेंच्या हस्ते उदघाटन होणारा फलक समाजकंटकांनी तोडला

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे दिघे वस्तीवर जाणारा रस्ता बर्‍याच दिवसांपासून वापरण्यास नादुरूस्त होता रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. नामदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले. ना. प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुरावा आणि निधीतून पूर्ण झालेल्या राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे-दिघे वस्तीवर जाणार्‍या रस्त्याच्या … Read more

मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  मकाचे दर घसरले असताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी, यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे … Read more

शेतकऱ्यांच्या ‘ह्या’ योजनेत घोटाळा; भगवान हनुमानाच्या बनावट खात्यावर पैसे वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   मोदी सरकारने गरजूंना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक वित्तीय योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येतात. 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 पाठविले जातात. परंतु … Read more

मोठी बातमी : सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जाहीर केले आहे. ११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या … Read more