दिल्लीत लॉकडाऊनची ऐशीतशी ; दिल्लीला होऊ शकतो ‘हा’ धोका

दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असूनही येथिल नागरिक पाहिजे ती सुरक्षा पाळताना दिसत नाहीत. दिल्लीत लॉकडाऊनची पूर्ण ऐशीतशी झाल्याचे चित्र आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बड़ा हिंदूराव परिसरात रविवारी सायंकाळी लोकांनी खूप गर्दी केली होती. यामुळे दिल्लीत कोरोना संक्रमणाचा धोका वाढवू शकतो. दिल्ली पोलिस तसेच आणि विविध मशिदींचे इमाम व मोलाना … Read more

या’ रूग्णालयात झालेत सर्वात जास्त कोरोना संक्रमित कर्मचारी

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु सर्व डॉक्टर्स वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे पुरवत आहेत. परंतु या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाही लागण होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्लीच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त झाली आहे. आतापर्यंत 65 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. शनिवारपर्यंत ही … Read more

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध 15 पोलिस ठाण्यात तक्रार; ‘हा’ आहे आरोप

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध रायपूरसह भिलाई, दुर्ग, बेमेत्रा आणि बिलासपूर आदी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, अद्याप या तक्रारींवर कोणत्याही पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झालेला नाही. वास्तविक अरुंधती रॉय यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध निंदनीय टीका केल्याचा आरोप आहे. छत्तीसगड येथील सिव्हील सोसायटीच्या कार्यकारिणीने वकील भूपेंद्र जैन यांच्या नेतृत्वात अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध पोलिस … Read more

‘हे’ नऊ राज्य झाले संक्रमण मुक्त 

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. या लढाईत भारताला मोठं यश आलं आहे. देशातली ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत. त्रिपुरा, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, नागालँड, सिक्कीम, दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप हे भाग कोरोनामुक्त झाले आहे. या भागामध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जगाच्या तुलनेत … Read more

पुरुषांच्या बाबतीत राष्ट्रीय गुन्हे विभागाने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती 

नवी दिल्ली : राज्यात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण असले तरी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नुकतीच विवाहित पुरुषांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की महिलांच्या तुलनेत विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट आहे.  तसेच  पत्नीचा मृत्यू झाल्यास किंवा तिच्यापासून घटस्फोट झाल्यास पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले असल्याचे या अहवालात नमूद आहे. … Read more

प्रत्येक वेळी कोरोना बदलवतोय रूप; शास्त्रज्ञांपुढे आव्हान

नवी दिल्ली :- चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाला आपले लक्ष्य केले आहे. या व्हायरसवर वॅक्सीन शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु या 3-4 महिन्यांत या विषाणूने आपले स्वरूप खूप वेळा बदललेले दिसून येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत. अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार कोविड-19 हा आजार वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. सुरुवातीला फक्त … Read more

केस कापल्याने 6 जणांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाने थैमान घालायला सुरवात केली आहे. व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत असून विविध माध्यमातून त्याची लागण होताना दिसत आहे. राजस्थानमध्ये एटीएममधून कोरोनाचं संक्रमण झाल्याची घटना ताजी असतानाच आता सलूनमधून कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या काळात सलूनमध्ये जाऊन केस कापल्याने 6 जणांना … Read more

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरास सोसायटीत नाकारला प्रवेश; गुन्हा दाखल

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरला निवासी अपार्टमेंट सोसायटीतील काही नागरिकांनी सोसायटीत प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे. ही महिला तिच्या भावास भेटण्यासाठी सोसायटीत गेली होती. ही महिला डॉक्टर हैदराबादमधील कोविड -१९ रुग्णालयात कार्यरत आहे. या लोकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत महिला डॉक्टरने असा दावा केला आहे की, बुधवारी अपार्टमेंट रेसिडेन्ट असोसिएशनच्या … Read more

व्होडा-आयडियाच्या ‘या’ प्रोग्रॅम मध्ये दरमहा 5 हजार कमविण्याची संधी

व्होडाफोन- आयडिया आणि पेटीएम यांनी नवीन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘रिचार्ज साथी’ प्रोग्रॅम  सुरू केला आहे. या प्रोग्रॅममुळे वापरकर्त्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना  महिन्याला ५ हजार रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. या प्रोग्रॅमच्या साहाय्याने कोणताही पेटीएम ग्राहक आयडिया वोडाफोनचे रिचार्ज करू शकतो आणि पैसे कमावू शकतो. युजर्सने केवळ पेटीएम अ‍ॅप डाउनलोड करून, नोंदणी … Read more

धक्कादायक : शेतकऱ्याची गोळी घालून हत्या !

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील भूपगढी गावात शुक्रवारी सकाळी शेतीच्या वादातून शेतकऱयाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून शेजारी राहणाऱ्या पिता पुत्रांनी या शेतकऱ्याची गोळी झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भूपगढी येथील 52 वर्षीय संजय पुत्र कृष्णपाल शुक्रवारी सकाळी गावाबाहेर आपल्या … Read more

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर Live24 : लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या सवाईमाधोपूर जिल्ह्यात अडकलेली एक महिला गुरुवारी जयपूरला जाण्यासाठी पायी निघाली होती. रात्री उशीर झाल्याने ती वाटेतच एक शाळेमध्ये मुक्कामास थांबली. रात्री दोन वाजता महिलेला एकटे पाहून तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले … Read more

सर्वात मोठी बातमी : आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास परवानगी !

अहमदनगर :-  दुकानदारांसाठी आणि व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बातमी आज आलीय, आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. देशभरात लॉकडाऊनमध्ये  केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर … Read more

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीदेशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत तर १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सरकारने दिली. बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढून १९.८० टक्के झाल्याचे सांगत सरकारने संसर्गाचा वेग स्थिर ठेवण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. बुधवारी देशव्यापी लॉकडाऊनला एका महिना पूर्ण झाला … Read more

बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 :- बीएसएनएलने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉल नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी येत्या ५ मेपर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान ज्या युजर्सच्या अकाऊंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे … Read more

‘टिकटॉक’वर लाइक न मिळाल्याने तरुणाची गळफास घेत आत्महत्या !

नोएडा :  ‘टिकटॉक’ या व्हिडिओ शेअरिंग ॲपमुळे देशात एका तरुणाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना नोएडामध्ये घडली. व्हिडिओला लाइक्स मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. नोएडाच्या सलारपूर गावातील चांद मशिदीजवळ राहणाऱ्या इकबाल नामक १८ वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती … Read more

२५ वर्षीय युवकावर त्याच्या सहकाऱ्यानेच गोळी झाडली कारण वाचल्यावर तुम्हालाही बसेल धक्का …

नोएडा :- कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने ल्युडो खेळताना खोकणाऱ्या २५ वर्षीय युवकावर त्याच्या सहकाऱ्यानेच गोळी झाडली. ग्रेटर नोएडाजवळच्या दयानगर गावात मंगळवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेने युवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. जखमी युवकाचे नाव प्रशांत सिंग आहे. रात्री मंदिरात चौघे जण ल्युडो खेळत असताना प्रशांतला खोकला लागला. यावेळी इतर तीन सहकाऱ्यांपैकी जयवीर … Read more

लॉकडाऊन नियमावली जाहीर : ‘या’ सर्व सेवा रहाणार बंद,मास्क घालणं अनिवार्य तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 :- देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. MHA issues updated consolidated revised guidelines after correcting the date from 20th May to 20th April 2020, on the … Read more

धक्कादायक : डोक्यावर अक्षता पडण्याआधीच नवरदेवाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम :- देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत 9 हजार 352 लोकांना झाला असून त्यापैकी 8048 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 324 रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.मात्र डोक्यावर अक्षता पडण्याआधीच नवरदेवाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं लग्नमंडपात मोठी खळबळ उडाली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पंजाबमधील फरीदकोट … Read more